शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

जल पुनर्भरण काळाची गरज याची आवश्यकता स्पष्ट करा




जल पुनर्भरण काळाची गरज याची आवश्यकता स्पष्ट करा




                                   




प्रस्तावना :

                 आजकाल आपण वर्तमानपत्रात, मासिकात, जलतज्ञांच्या भाषणात, आकाशवाणीवर जलपुनर्भरण करण्यासंदर्भातील बातम्या वाचतो, ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र पुनर्भरणाचे काम फक्त थोड्या कुटुंबांनी हाती घेतलेले दिसते. पुनर्भरण करणे म्हणजे नक्की काय करणे, त्याचा मला सर्वसामान्य समाजाला फायदा काय, ते कसे केले जाते, त्यासाठी किती खर्च येतो याबद्दल बराच गैरसमज समाजात दिसून येतो. त्यामुळे याबद्द्ल प्रबोधन करणे हा या प्रकल्पाचा  प्राथमिक उद्देश आहे.
जलपुनर्भरणाचे कार्य निसर्गसुध्दा चुकता, अव्याहतपणे, कोणीही सांगता करीत असतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला म्हणजे पाण्यासाठी आसुसलेली जमीन पाऊस पडल्याबरोबर पाणी प्यावयास सुरूवात करते. जमिनीच्या रंध्रांमधून, फटींमधून पाणी सातत्याने जमिनीत मुरतच राहते. खोल जात जात ते भूपृष्ठाखालील जलसाठ्यात जमा होत राहते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत जाते. यालाच आपण नैसर्गिक पुनर्भरण म्हणू या. वर्षभर होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे ही पातळी खालावत जाते पण या पुनर्भरणामुळे ती पातळी पूर्वस्थितीवर आणण्यात निसर्गाचा मोठा वाटा आढळतो. अशा प्रकारे हे निसर्ग चक्र अव्याहतपणे चालत राहते सर्वसाधारण परिस्थितीत त्यात खंड पडावयास नको.जमिनीत भरले जात असलेले पाणी दरवर्षी उपसले जात असलेले पाणी यात समतोल राहिला तर कोणतीही अडचण येवू नये. पण घोडे इथेच पेंड खाते. जमिनीत भरले जात असलेले पाणी उपसले जात असलेले पाणी यांचेमधील असलेला समतोल बिघडविण्यास मानव कसा कारणीभूत झालेला आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.ज्यावेळी मेणबत्ती दोन्ही बाजुंनी पेटविली जाते त्यावेळी ती लवकर विझणारच. इथेही नेमकी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कमी होत आहे दुसऱ्या बाजूने पाणी उपसण्याचा वेग मात्र सतत वाढतच चालला आहे. याचा दुहेरी परिणाम होवून जमिनीतील पाणी प्रश्नाला उद्याच्या एैवजी आजचेच आमंत्रण देवून आपण मोकळे झाले आहोत. कसे ते आपण थोडक्यात पाहूया.पूर्वी आपण दोर बालटीने, हपश्याने, मोटीने, रहाटगाड्याने पाणी उपसून त्याचा वापर करीत होतो. या सर्वच उपश्याचा वेग अत्यंत कमी होता. मानवी प्राणीमात्रांचे मेहनतीवर ही उपसा पध्दती चालत होती. त्यामुळे माणूस थकला वा बैल थकला तर उपसा बंद होत असे. म्हणजेच उपसा हळूहळू कमी प्रमाणात झाल्यामुळे समाजाकडून कमी पाणी वापरले जात असे.आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आज मानवी प्राणीमात्राच्या शक्तीशिवाय विद्युतशक्ती नावाची शक्ती जन्माला आली आहे तिच्या सहाय्याने विद्युत मोटारी पंप यांचा वापर खूपच प्रमाणात वाढला आहे. बटन दाबले की उपसा सुरू होणार गरज नसली तरी पाणी वेगाने उपसले जाणार! यामुळे कोणतीही तमा बाळगता, बेदरकारपणे पाण्याचा वापर वाढला आहे.वाढती लोकसंख्याही पाण्याचा वापर वाढविण्यात कारणीभूत झाली आहे. 1950 च्या जवळपास 40 कोटीच्या घरात घोटाळणारी लोकसंख्या आज 100 कोटींचा आकडा पार करून बसली आहे. या वाढत्या लोकसंख्येचा ताण आता भूगर्भातील पाण्याला सहन होईनासा झाला आहे.

उद्दिष्ट्ये


सूर्याला आपण आपला मित्र मानतो. कारण तो आपल्याला उष्णता प्रकाश देतो. आपले मित्रत्व पक्के व्हावे म्हणून आपण त्याला देवत्वसुध्दा बहाल केले आहे. सूर्याची जी 24 नावे आहेत, त्यापैकी 'मित्राय नम:' असे म्हणून आपण त्याला शरण जात असतो. पण आपला हा मित्र अत्यंत लबाड आहे बरं का! तो आपणाला आवळा देतो पण त्याच्या बदल्यात भोपळा मागतो. भूपृष्ठावर जेवढे पाणी असते त्यापैकी 60 टक्क्याच्यावर पाणी तो आपल्यापासून हिरावून घेऊन जातो. केवढे मोठे नुकसान हे! हे थांबविण्यासाठी आपल्याजवळ काही मार्ग आहे का? आहेनं. हे पाणी आपण सूर्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याच्यापासून लपवून ठेवू शकतो. आहे आपल्या जवळ तेवढी जागा? आहे नं! भूपृष्ठाचेखाली आपण हे पाणी सहजपणे लपवून ठेवू शकतो. शहाणी माणसे आपल्याला 'पाणी अडवा-पाणी जिरवा' कशासाठी सांगतात? ते नुसतेच सांगत नाहीत तर 'आधी केले मग सांगितले' या तत्त्वाचा वापर करून मगच हे सिध्दतत्व आपल्यासमोर मांडत आहेत. राळेगण सिध्दीचे अण्णा हजारे, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, राजस्थानमधील राजेंद्रसिंग राणा, आपल्याला अत्यंत जवळचे असलेले अण्णा बोराडे यांनी हे तत्त्व मांडण्यासाठी आपले आयुष्य वेचले . त्यांच्या अनुभवावरून आपण शहाणे होणार की नाही? तहान लागल्यावर विहीर खोदणारी माणसं आपण. परिस्थितीचे गांभीर्य अजूनही आपल्या लक्षात आलेले नाही. पाण्यासाठी आक्रोश सुरू झाल्यावर आपण जागे होणार आहोत का?आपल्याला एक वाईट खोड लागली आहे. ती म्हणजे सर्व जबाबदाऱ्या सरकारवर ढकलून देण्याची. इतर प्रश्नांप्रमाणे पाणी प्रश्नही सरकारनेच सोडवावा यासाठी हाकाटी करणारे आपणच आहोत. स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्याचे ऐवजी ते सरकारवर ढकलण्यात कोणता शहाणपणा? सरकराच्या मर्यादा आपण जाणून घेतल्या पाहिजेत. तोकडी यंत्रणा, पैशाचा अभाव दिशाहीन कारभार यामुळे सरकार हा प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेला मदतीचा हात पुढे करून हा प्रश्न सोडविता येणार नाहीका याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.राम म्हणा, अथवा रहिम म्हणा, देव जसा एकच असतो त्याचप्रमाणे जमिनीमध्ये पाणी भरण्याच्या पध्दती जरी भिन्न असल्यातरी सर्वच पध्दतींद्वारे शेवटी जलपुनर्भरणच होते! या सर्वच पध्दतींचे आपण दोन पध्दतीत विभाजन करू शकतो. त्या दोन पध्दती म्हणजे शहरी भागातील पुनर्भरण ग्रामीण भागातील पुनर्भरण सर्वप्रथम आपण शहरी भागातील पुनर्भरणावर आपले लक्ष केंद्रित करू या.

महत्व 

सामाजिक महत्व - माणसाच्या जीवन पध्दतीतही झपाट्याने बदल होत आहेत त्यामुळे पाण्याच्या वापराला नवनवीन दिशा प्राप्त झाल्या आहेत. पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी पाणी, कपडे धुण्यासाठी पाणी, वरकड वापरासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पर्यावरण संतुलनासाठी पाणी, याचबरोबर कारखान्यांसाठी पाणी, कारखान्यातील उष्णता कमी करण्यासाठी पाणी एवढेच नव्हे तर करमणुकीतसुध्दा पाणी वापरले जात आहे. या चौफेर वापरामुळे पाण्याचा उपसा, उपसा आणि उपसा हाच आज परवलीचा शब्द बनला आहे.याचा परिणाम म्हणजे जमिनीतील घसरलेली पाण्याची पातळी हा होय. पूर्वीचे काळी 20 ते 25 फूटावर जमिनीत पाणी लागत होते. पण आजमात्र 500 ते 1000 फूट खोदून सुध्दा बऱ्याच क्षेत्रात बोअरला पाणी लागत नाही. पाण्यासाठी वणवण हिंडायची पाळी माणसावर आली आहे. महिला लहान बालके मैलामैलावरून डोक्यावर पाण्याच्या घागरींची जेव्हा चळत घेवून येतात तेव्हा त्यांचेवर दया आल्याशिवाय राहत नाही. माझे आंगण स्वच्छ दिसावे, आकर्षक दिसावे यासाठी प्रत्येकाने आंगणात फरश्या, टाईल्स, काँक्रीटचा थर इत्यादींचा वापर वाढविला आहे. यामुळे जमिनीची सर्व छिद्रेच बंद झाली आहेत. जमिनीत पाणी मुरण्याचा रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर प्रत्येकच्या कंपाऊंडमधून पाण्याचा लोंढा रस्त्यावर यावयास लागला आहे.रस्त्यांची परिस्थिती अधिकच नाजूक आहे. वाढत्या वाहतुकीमुळे बहुतांश रस्ते वॉल टू वॉल झालेले आहेत. खडीकरण, डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे कंपाऊंडच्या बाहेरही पाणी मुरायला जागाच राहिलेली नाही. त्यामुळे पाण्याचेे मुरणे बंद होऊन वाहणे वाढत चालले आहे. त्यामुळे थोडासा जरी पाऊस आला तरी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हावयास लागली आहे. पाणी मुरण्यासाठी 'धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा' या तत्वाचा वापर करावा लागतो. पण हे करण्यासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही.

पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी करण्यात झाडे वनस्पती फार मोलाची कामगिरी करीत असतात. ज्या ठिकाणी झाडे जास्त प्रमाणात असतात त्या ठिकाणी पाणी वाहण्याचा वेग कमी होत असतो. जमिनीवर गवताचे आच्छादन असेल तर आणखी चांगले! गवतामुळे झाडांमुळे पाणी वाहण्याचा वेग कमी होवून पाणी मुरण्याचा वेग वाढविण्यात ते कारणीभूत ठरतात.
झाडे तर जलपुनर्भरणासाठी आणखी वेगळ्या प्रकारे मदत करतात. झाड जसजसे वाढते तसतशी त्याची मुळे खोलवर जातात. खाली जातांना ती जमिनीचे थर ढिले करतात. एवढेच नव्हे तर कडक मुरूम दगड फोडून ती खोलवर जाण्याच्या प्रयत्नात असतात. यामुळे मुरूमात दगडात फटी निर्माण होतात पाणी मुरण्याचा वेग वाढीस लागतो. पण माणूस किती अभागी बघा. स्वत:च्या हाताने वनराईचा घात करून त्याने पुनर्भरणाचा हाही रस्ता बंद करून टाकला आहे.

बहुतांश नगर महानगर पालिकांत एक महत्वाचा नियम असतो. स्वत:च्या आंगणात पाच झाडे लावल्याशिवाय घराचे भोगवटा पत्रक दिले जाऊ नये असा तो नियम आहे. पण शहरात एक चक्कर मारा तपासून बघा किती घरात अशी झाडे आहेत? थोडयाश्या चिरीमिरीवर घरात झाडे लावली आहेत असे दाखविले जाते भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. अशा परिस्थितीत वनस्पतीत वृध्दी होणार तरी कशी?आतापर्यंत मांडलेल्या मुद्यांमुळे नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कसा खुंटत चालला आहे ही बाब लक्षात येवू शकेल. पुनर्भरणासाठी निसर्ग साथ देत नसेल तर ती तूट भरून काढण्याकरिता माणसाने कृत्रिम पध्दतीने पुनर्भरण करणे अपरिहार्य ठरते. खरे पाहिले असता पुनर्भरण करता जमिनीतून पाण्याचा उपसा करण्याचा माणसाला नैसर्गिक अधिकारच नाही. 

अभ्यास पद्धती

क्षेत्र भेट
पावसाच्या प्रत्येक थेंबाचे कोणत्या पद्धतीने पुनर्भरण होणारहे लातूर जिल्हा परिषदेसमोरचे आव्हान असून लोकसहभागाशिवाय ते पेलणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना निमंत्रित करून जिल्ह्याच्या विकासाच्या आव्हानाच्या विषयावर चर्चा करण्याचा उपक्रम जिल्हा पत्रकार संघाने सुरू केला असल्याची माहिती या वेळी अध्यक्ष अशोक चिंचोले यांनी दिली या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार ही उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील विविध विभागांची माहिती देऊन जिल्हा परिषदेसमोरील आव्हानाची चर्चा करताना नामदेव ननावरे म्हणाले, 'जलपुनर्भरणाच्या कामात जिल्हा परिषदेने काम केले आहेते पुरेसे नाही. जिल्ह्यातील बोअरविहिरी या ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्याने एक हजार ८५ विहिरींचे जलपुर्नभरण केले असून सावरगावकातपूरदर्जा बोरगाव येथील नाले सरळीकरण शिरपूर पॅटर्नप्रमाणे खोलीकरणाचे काम पूर्ण केले आहे. 'पाणी अडवापाणी जिरवा,' या योजनेतुन शेतीची उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे.महात्मा फुले भुमि जलसंधारण अभियानात लोकसहभागातुन तलावातील गाळ काढण्याचा लातूर जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केल्याची आठवणही ननावरे यांनी करून दिली.

मुलाखत 

टंचाई स्थितीवर मात करण्यास भूजलसाठा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी जलपुनर्भरण करावे, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. पाटील यांनी चालू महिन्यात दोन्ही बैठकांमध्ये टंचाईबाबत आढावा घेत असताना टंचाई स्थितीत अनेक िवधन विहिरी, विहिरी इतर पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याचे आढळून आल्याने भूजल साठा वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचाच भाग म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब वाया जाऊ देता त्याचे नियोजनपूर्वक पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे आवश्यक आहे. अवैध वृक्षतोड, अति पाणीउपसा पाण्याचे अयोग्य नियोजन यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भविष्यात टंचाईवर मात करण्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलपुनर्भरण कामाचे नियोजन करून पावसाच्या पाण्याचा अपव्यय होऊ देता त्याचे पुनर्भरण करण्यासाठी वेळेचे नियोजन करणे जलपुनर्भरण कार्यक्रम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले.जिल्हय़ातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय-निमशासकीय सार्वजनिक इमारतीच्या छतावरील पुनर्भरणाची व्यवस्था करावी. सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून त्याचा प्रकल्प अहवाल सादर करावा. कामाचे योग्य नियोजन करावे पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संशोधन 

शहरी भागातील पुनर्भरण :    शहरांमध्ये पाणी पुरविण्याचे तीन महत्वाचे स्त्रोत असतात. विहीरी, बोअर अथवा ट्यूब वेल्स शहराला पाणी पुरविणारे छोटेखानी तलाव हे ते तीन स्त्रोत आहेत. याशिवाय पावसाचे पाणी साठविण्यासाठी तयार केलेल्या टाक्यातसुध्दा जलसंग्रहण केले जावू शकते.
बोअरमध्ये पुनर्भरण : तुमच्याकडे स्वत:चे बोअर असेल तर त्या बोअरमध्ये गच्चीवरील, छपरावरील अथवा जमिनीवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जावू शकते. तुमच्या आंगणाचा उतार तपासून बघा ज्या ठिकाणी पाणी जमण्याची शक्यता आहे त्याठिकाणी पाच फूट लांब, पाच फूट रूंद 8 फूट खोल अशा आकाराच एक खड्डा खणा. या खड्ड्यात छोटे दगड, विटांचे तुकडे जाडी रेती यांचे समान थर टाकून खड्डा भरून टाका. सर्वात वरती बारीक रेतीचा थर टाका. पाऊस सुरू झाल्यावर आंगणात जमा होणारे पाणी जमिनीत मुरायला सुरवात होईल. जमिनीतील पाण्याचे प्रवाह या पाण्याला बोअरकडे घेवून जातील त्यामुळे बोअरची उपश्याची क्षमता वाढावयास मदत होईल.

                    तुमच्या घरी बोअर अथवा विहीर नसली तरीही प्रयोग करावयास हरकत नाही. पाणी जमिनीत मुरविणे हे एक सामाजिक व्रत आहे. त्यामुळे या मुरलेल्या पाण्याचा तुम्हाला जरी नाही तरी कोणालाही त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा परमार्थ करावयास काय हरकत आहे? यासाठी येणारा खर्चही बघा किती कमी आहे. खड्डा खोदण्याची मजुरी अंदाजे रू. 400/- त्यात वर वर्णिलेले मटेरियल भरण्यासाठी तेवढाच खर्च. अशाप्रकारे रू.1000/-चे आत जमिनीत पाणी मुरण्याची कायमची सोय केल्याचे समाधानही थोडके नाही.खड्डा वर वर्णिलेल्या आकारचाच असावा असे बंधन नाही. स्वत:च्या आंगणाचे क्षेत्रफळ, खुली जागा इत्यादींचा आकार बघून खड्डा कसा खणायचा ते ठरवा. खड्डा आंगणातच खणला पाहिजे असेही नाही कंपाऊंडचे बाहेर अशी सोय केली तरी चालू शकते. तो खड्डा पूर्णपणे मटेरियलने भरला जात असल्यामुळे कोणी त्यात पडूही शकत नाही अपघात होण्याचीही शक्यता नाही.जमिनीच्या वरच्या थरात सहसा चिकण मातीचा मोठा थर असतो. ही माती मात्र निघावी या पध्दतीने खड्डा खणावा. काळी माती पाण्याला जमिनीत मुरण्यास मज्जाव करते. त्यामुळे ती जर काढून टाकली तर पाणी मुरण्याचा वेग साहाजिकच वाढू शकतो. मातीचे कण एकमेकाला इतके चिकटले असतात की त्यातून पाणी मुरण्याला संधीच मिळत नाही. पण आपण खड्ड्यात जे मटेरियल भरले आहे त्यात मात्र भरपूर फटी राहणार. त्यामुळे पाणी मुरण्याची क्रीया जलदपणे होवू शकते.आपल्या अंगणात बोअर असल्यास पध्दतीत थोडे फार बदल करावे लागतील. 3 फूट त्रिजा घेवून बोअर भोवती एक गोल आखून घ्या. ती गोलाकार जागा खड्डा खणण्यासाठी वापरा - खड्डा खोदतांना बोअरच्या केसिंग पाईपला धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. हा खड्डा आठ फूट खोदल्यावर त्यात आधीच वर्णन केल्याप्रमाणे दगड, विटा जाडी रेती यांचा भरणा करा. गच्चीवरून खाली आलेला, पावसाचे पाणी खाली आणणारा पाईप तुकडा जोडून या खड्ड्याचा तोंडापर्यंत आणून सोडून द्या म्हणजे बोअरच्या अगदी समीप पाणी मुरण्याची सोय होवून त्याचा बोअरमधील पाणी वाढण्यासाठी निश्चितच फायदा होईल.आतापर्यंत वर्णिलेले दोनही मार्ग अप्रत्यक्ष स्वरूपाचे होते. तिसऱ्या पध्दतीत आपण प्रत्यक्षपणे पाणी बोअरमध्येच सोडणार आहोत. गच्चीवर पडलेल्या पावसाचे पाणी अत्यंत स्वच्छ असते. पहिल्या पावसानंतर गच्ची स्वच्छ धुवून काढा. त्यानंतर गच्चीवरील पावसाचे पाणी रेन वॉटर पाईपने खाली आल्यावर त्या पाईपला फिल्टर बसवा. असा फिल्टर बाजारात तयार विकत मिळतो. त्यामध्ये रेतीचे तीन थर असतात. त्यातून हे पाणी गेल्यामुळे ते अधिक शुध्द बनते. त्या फिल्टरचे दुसरे टोक बोअरमध्ये जोडून टाका. म्हणजे पाऊस आला रे आला की ते पाणी गच्चीवरून पाईपने खाली येईल फिल्टरमधून गाळून ते बोअरमध्ये प्रवेश करेल. अशा प्रकारे शेकडो लिटर पाणी जमिनीमध्ये प्रविष्ट होईल. ही यंत्रणा बसविल्यावर डिसेंबर मध्ये कोरडा पडणारा बोअर पहिल्या वर्षी मार्च पर्यंत पाणी पुरवठा करेल पुढील वर्षी कदाचित तो पुढील पावसाळा येईस्तवर कार्यरत राहील. अशा प्रकारे स्वत: जमिनीमध्ये पाणी भरा मगच त्याचा उपसा करा. आता पर्यंत जलपुनर्भरण कसे करावयाचे याबद्दल आपण विचार केला. यामुळे नक्की किती पाणी जमिनीत मुरते याचा आता आपण थोडक्यात विचार करू. गच्चीवरील पाणी प्रत्यक्षपणे फिल्टर लाऊन बोअरमध्ये टाकण्याचे ठरविल्यास गच्चीचा आकार 1000 चौरस फूट पावसाचे प्रमाण 700 मि.ली मिटर असता अंदाजे 50000 लिटर पाणी जमिनीत जावयास हरकत नसावी. आपलेकडे बोअर नसेल निव्वळ पुनर्भरण खड्डा करून पाणी मुरवायचे असेल तर जवळपास 2 लाख लिटर पाणी जमिनीत मुरू शकते. बरेचदा आपण कपांऊडच्या आत किंवा बाहेर 40 फूटाचे जवळपास चर खणला त्यात पुनर्भरण करावयाचे ठरविले तर त्या चरामुळे 1 लाख लिटरचेवर पाणी जमिनीत मुरू शकेल. खड्ड्यांचे वा चरांचे आकार जागेजागेप्रमाणे बदलू शकतात. आकार कोणतीही का असेना पुनर्भरण करणे महत्वाचे!



1 टिप्पणी:

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...