मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

 
 
 
 
 
 

 

 

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार

 

प्रस्तावना –

प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरणजल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्येडीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतःजागतिक तापमान वाढGlobal Warming,उश्माघात सारखे धोके निर्माण होतात.

प्रदूषण हे अनेक प्रकारचे असते. यामध्ये ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होते. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -

अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण,

·         अशुद्ध हवा म्हणजे हवा प्रदूषण,

·         मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण

 

             सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.

 

         हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.

 

         पृथ्वीवर वनस्पती, मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात (परिसरात) राहतात त्या पर्यावरणातील विविध घटकांत संतुलन प्रस्थापित झालेले असते. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तू (अपशिष्ट) दुसऱ्या एखाद्या जातीला पोषणासाठी इष्ट असू शकते. अशा परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना सातत्याने टिकून राहते; परंतु सध्याच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे व औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या घटकांव्यतिरिक्त इतर अपायकारक घटक मोठ्या प्रमाणात पर्यावरणात शिरतात.

 

             त्यामुळे पर्यावरणाच्या विविध घटकांतील संतुलन बिघडते व पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी यांच्या जीवनाच्या सातत्याला धोका निर्माण होतो. अशा क्रिया-प्रक्रियांमुळे पर्यावरणी प्रदूषण उद्‍भवते.

 

                         पृथ्वीच्या पर्यावरणात अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैव क्रिया-प्रक्रिया घडून येत असतात. विविध प्रकारचे जीवसमूह व मानव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेऊन राहत असतात. त्यांच्या चयापचयी उत्सर्गामुळे (शरीरात घडून येणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून निर्माण झालेल्या व शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे) बरीच घाण निर्माण होते व हळूहळू सर्व परिसर दुर्गंधीयुक्त व दूषित होतो.

 

       सुदैवाने इतर प्रकारच्या सजीवांच्या काही जाती या नैसर्गिक अपशिष्टांचा स्वपोषणासाठी उपयोग करून घेतात व थोड्याफार प्रमाणात परिसर शुद्ध राखण्यास मदत करतात.

 

       बरीच घाण पाण्याबरोबर वाहून जाते. अशा रीतीने परिसरात मोठ्या प्रमाणात फेरबदल घडून येत नाहीत व जीवनचक्र अव्याहतपणे चालू राहते. अठराव्या शतकापासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

            मानवाकडून परिसरात ढवळाढवळ केली जात आहे; प्रचंड प्रमाणावर जंगलांचा विनाश होत आहे;लोकसंख्या भयानक त्वरेने वाढत आहे; उद्योगधंदे झपाट्याने वाढत आहेत. खनिज इंधनांच्या व अणु-ऊर्जेच्या साहाय्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे विविध प्रकारच्या वस्तूंत, यंत्रांत, उपकरणांत रूपांतर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

 

       जगात अग्रेसरत्व मिळविण्यासाठी प्रगत राष्ट्रांत चुरस निर्माण झाली आहे. यासाठी औद्योगिक उत्पादन वाढविणे हा एकच मार्ग त्यांनी अवलंबिला आहे.

 

       वाढत्या औद्यिगिकीकरणामुळे शहरांची संख्या व विस्तार वाढत आहे. त्याबरोबरच मोटारींची व अनेक प्रकारच्या वाहनांची संख्याही वाढत आहे. अधिक धान्योत्पादनासाठी व ते धान्य टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

 

        या सर्व मानवी व्यवहारांमुळे घातक व रोगमूलक द्रव्यांचे असंख्य कण नद्यांत, महासागरांत, जमिनीत व वातावरणात विखुरले जात आहेत. हे कण पृथ्वीच्या परिसरातील नेहमीचे घटक नसतात; ते उपद्रवकारक प्रदूषकांचे (परिसर प्रदूषित करणाऱ्या द्रव्यांचे) असतात. आधुनिक युगात पर्यावरणी प्रदूषणात्मक ज्या कठीण समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचा उगम अशा प्रकारे वाढत्या लोकसंख्येत,शहरांच्या वाढत्या संख्येत व विस्तारात आणि तंत्रविज्ञानाच्या वाढत्या उपयोजनात आढळतो.

 

प्रदूषणाचे मूलघटक :

       पर्यावरणात मुख्यत्वेकरून शिरणारी प्रदूषके म्हणजे ज्वलनक्रियेमुळे निर्माण झालेले पदार्थ, मानवी उत्सर्ग (मलमूत्र), निःश्वासित केलेले वायू, निरनिराळ्या वस्तूंचे सूक्ष्म धूलिकण, विकृतिकारक सूक्षजीव, विविध पदार्थांचे बाष्प कण, निरनिराळे विषारी वायू, विविध उद्योगांत वापरलेले विद्रावक (विरघळणारे पदार्थ), कृषिकार्यासाठी वापरलेली खते व कीटकनाशके ही होत.

 

      त्यांच्या जोडीला तापमानाच्या अतिरेकी सीमा, अवरक्त प्रारण

(दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग; प्रारण म्हणजे तरंगरूपी ऊर्जा), 

जंबुपार प्रारण

(दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग)

आणि क्वचित प्रसंगी तीव्र दृश्य प्रारण, आयनीकारक प्रारण

(विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणारे प्रारण) किरणोत्सर्गी समस्थानिकांनी (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांनी)

 

बाहेर टाकलेले प्रारण, गोंगाट (अप्रिय आवाज), परा-उच्च कंप्रतेचे ध्वनी(प्रतिसेकंदास होणाऱ्या कंपनांची किंवा आवर्तनांची संख्या अतिशय उच्च असलेले ध्वनी) आणि विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मतरंगलांबीचे विद्युत् चुंबकीय प्रारण यांसारखे अनिष्ट घटक पर्यावरणात प्रदूषक म्हणून प्रवेश करतात. स्थलकालानुरूप ह्या भौतिक, रासायनिक व जैव घटकांचे प्रमाण व उपद्रव सह्य मर्यादांबाहेर गेल्यास प्रदूषण उद्‍भवते.

 

ऋण निर्देश –

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   .” हा माझा विषय आहे ,महाराष्ट्र उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे आम्ही सर्व आभारी आहोत ,करण त्यांनी २०१६ २०१७ ह्या शेक्षणिक वर्षापासून आम्हा सर्वं ११वि आणि 12 वि च्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आमलात आणला ,वेगवेगळ्या प्रकाशनातील “पर्यावरण –शिक्षण “पुस्तक बोर्डाने मंजूर केले .या पुस्तकाना विध्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्गांनी उदंड प्रतिसाद दिला .यामुळे आपले आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकलो ,

   तसेच आम्हाला शाळेतील पर्यावरण ह्या विषयाची ओळख आम्हाला करुण दिली त्या बद्दल ,तसेच हा विषय तयार करून देण्यात माझ्या वर्ग विषय  शिक्षिका सौ ......  यांचे मला म्हत्वाचे अनमोल सहकार्य मिळाले तसेच माझ्या मित्रांनी,पालकांनी ,सहकार्य दिले ,पर्यावरण विषयाची ओळख मला या माध्यमातून करून दिली त्याबद्दल तसेच आम्हाला 11 वी आणि  12 वि या नवीन वर्षाचे पर्यावरणपुस्तकाचे आणि त्याच्या बरोबर प्रायोगिक भूगोल इयत्ता 12 वि या पुस्तकाचे सहकार्य मिळाले .विशेष आभार मानायचे तर ते ,आमच्या विद्यालयाचे  प्राध्यापकाचे तसेच प्रच्याय श्री ............. सरांचे कारण त्यांच्याच प्रयत्नांनी आम्हा सर्व मुलाना पर्यावरण विषय करण्यास संधी देऊन ,आम्हा सर्वांना स्वतःला सिद्ध दाखविण्याची संधी दिली त्या बद्दल फार आभार.

 

विषयाची निवड - मानवाने अवलंबिलेल्या औद्योगिकीकरणामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सहा लक्ष टन अँटिमनी, तितकेच आर्सेनिक,दहा लक्ष टन कोबाल्ट, आठ लक्ष टन निकेल यांसारख्या विषारी मूलद्रव्यांचे कण वातावरणात विखुरले गेले आहेत आणि कोळसा, खनिज तेल व इतर जीवाश्मी (हायड्रोकार्बनयुक्त साठ्यांच्या रूपातील) इंधन जाळल्यामुळे गेल्या शंभर वर्षांत २५,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ३४,००० कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळला गेला, असा अंदाज करण्यात आलेला आहे. 

सादर विषय हा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित आहे प्रदूषण व त्याचे प्रकार व प्रदुषणामुळे होणारे नुकसान या विषयी शालेय विद्यार्थी यानां होणे गरजेचे असल्यामुळे मी सदर विषयाची निवड केलेली आहे .

उद्दिष्ट्ये –

ध्या प्रगत देशांत अनेक वस्तू काही काळ वापरल्यानंतर फेकून देण्यात येतात. त्यांत मुख्यत्वेकरून प्लॅस्टिकची भांडी,पिशव्या, आवरणे, वेष्टने, बाटल्या, टिनचे (कथिलाच्छादित पत्र्याचे) डबे, काचेची तावदाने, व इतर वस्तू आणि कागद यांचा समावेश असतो. थोडेसे नादुरुस्त असलेले दूरचित्रवाणी संच व मोटारगाड्याही फेकून देण्यात येतात. १९६० सालानंतरच्या अंदाजांप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये प्रतिवर्षी ६,००० कोटी टिनचे डबे, ,००० कोटी बाटल्याव बरण्या, ४० लाख टन वजनाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू, एक कोटी टन वजनाच्या लोखंड व पोलादाच्या वस्तू, ८० लक्ष दूरचित्रवाणी संच, ७० लक्ष ट्रक व मोटारगाड्या, ३ कोटी टन कागद व कागदी वस्तू त्याज्य म्हणून फेकून दिल्या जातात. शेतकी उद्योगातील २२८ कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, खनिज उद्योगांतून १७० कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर फेकलेले ११ कोटी टन वजनाचे पदार्थ, शहरी वस्त्यांतून साचणारा २५ कोटी टन वजनाचा कचरा व इतर त्याज्य पदार्थ एकत्रित केले जाऊन शहरांबाहेर टाकण्यात येतात. ह्या टाकाऊ वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर घाण पसरते व प्रदूषण उद्‍भवते. त्यातून उपद्रवी कीटक निर्माण होतात व वनस्पतींचा संहार होतो. अनेकदा टायरसारख्या निरुपयोगी रबराच्या वस्तू, कचरा, कागद वगैरे जाळण्यात येतात व राख नद्यांत किंवा समुद्रात फेकून देण्यात येते. त्यामुळे वातावरणीय व जलीय प्रदूषणाची आपत्ती ओढवते.ते थांबवायला पाहिजे ,निरनिराळ्या प्रकारचे पर्दुषण व त्या प्रदुषणाचे परिणाम हे फार वाईट आहेत ,या पासून सुरक्षित रहायचे असल्यास प्रत्येक मानवाने प्रदूषण आपल्या परीने थाबव्न्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच या प्रकल्पा उद्देश ठरेल असे मला वाटते.

 

विश्लेषण –

आजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या जागतिक तापमान नोंद हरितवायूंचे उत्सर्जन पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे. हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे जवाबदार देश आहेत. याचे मुख्य कारण जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रत्येक न्युज चॅनलवर अधूनमधून या विषयी नवनवीनच माहिती देणं सुरू असतं.

 पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो. 

पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्यावातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून

मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे. हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थानेयुरोपचीनजपान हे जवाबदार देश आहेत. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व या देशाने अजूनही या क्योटो प्रोटोकॉल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे प्रयत्न करणाऱ्या देशांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल या बाबतीत शंका आहेत.

गेल्या'शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६ च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ तेइ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७०च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. 

महत्व / हेतू –

उपाय योजना - जुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरी व्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत.  ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

मुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -

·         ताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-

·         अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-

४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा

 

उपाय योजना  -

उच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक आहे . वृध्द लोकांसाठी हानिकारक आहे.

ध्वनि प्रदूषण बंद करा

1.तुमच्‍या टीव्‍ही आणि म्‍युझिक सिस्‍टमचा आवाज कमी ठेवा.

2.गाडीचा हॉर्न क्‍वचितच वाजवा.

3.लाउडस्‍पीकरच्‍या वापरास प्रोत्‍साहन देऊ नका.

4.लग्‍नाच्‍या वरातीत बॅन्‍ड व फटाक्‍यांचा वापर करू नका.

5.सर्वांना ध्‍वनि प्रदूषणाच्‍या नियमांचे पालन करण्‍यास सांगा.

हवेचे प्रदूषण संपवा कमी करा

1.घरे, फॅक्‍टरी, वाहने यांपासून निघणार्‍या उत्‍सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा.

2.फटाक्‍यांचा वापर करू नका.

3.केरकचरा केराच्‍या कुंड्यांमध्‍ये टाका, जाळू नका.

4.थुंकण्‍यासाठी पीकदाणी किंवा वाहत्‍या गटारांचा वापर करा.

5.सर्वांना हवेच्या प्रदूषणाच्‍या नियमांचे पालन करण्‍यास सांगा.

जल प्रदूषण स्वच् करा

1.कधीही सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नका.

2.पाण्‍याच्‍या सार्वजनिक पाइपांचा गैरवापर करू नका.

3.फक्‍त अधिकृत जागांवरच पवित्र मूर्तींचे विसर्जन करा.

4.सर्वांना जल प्रदूषणाच्‍या नियमांचे पालन करण्‍यास सांगा.

रासायनिक प्रदूषणाची विल् हेवाट लावा

1.रासायनिक खतांच्‍या ऐवजी जैविक खतांचा वापर,पॉलिथिनच्‍या ऐवजी कागदाचा वापर, पॉलिएस्‍टरच्‍या ऐवजी कॉटन, ज्‍यूटचा वापर करण्‍याकडे कल ठेवा.

2.पॉलिथिनच्‍या पिशव्‍यांची विल्‍हेवाट योग्‍य त्‍या प्रकारे लावा.

3.जास्तीतजास्‍त झाडे लावा.

4.सर्वांना रासायनिक प्रदूषणाच्‍या नियमांचे पालन करण्‍यास सांगा

विषयाचे सादरीकरण –

प्रदूषण म्हणजे काय - प्रदूषण म्‍हणजे घातक दूषित किंवा तत्‍सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्‍यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्‍मक ठरतात, तिला प्रदूषण म्‍हणतात.

प्रदुषणाचे प्रकार - पारंपारिक प्रदूषणांच्‍या स्‍वरूपांमध्‍ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्‍सर्गी (रेडियोऍक्टिव्‍ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच ध्‍वनि प्रदूषण ही प्रदूषण ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या आहे

ध्वनी प्रदूषण - आरडाओरड म्‍हणजे नको असलेले आवाज. ध्‍वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्‍याचे आकलन आता जास्‍त चांगल्‍या प्रकारे झालेले आहे.

ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे.

आवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.

 


कचरा आणि जल प्रदूषण - जेव्‍हां विषारी पदार्थ तलाव, ओढा,नद्या, समुद्र आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. परिणामी जलप्रदूषण होते ज्‍यामुळे पाण्‍याच्‍या गुणवत्तेचा ह्रास होऊन जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो. प्रदू‍षक पदार्थ जमिनीखाली देखील जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्‍परिणाम होऊ शकतो.

 

जलप्रदूषण हे फक्‍त मानवांसाठीच नव्‍हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्‍यांसाठीही विनाशकारी आहे.प्रदूषित पाणी हे पिण्‍यासाठी, त्यात खेळण्‍यासाठी,शेती आणि उद्योग ह्यासाठीदेखील अयोग्‍य आहे. ह्याच्‍यामुळे सरोवरे आणि नद्यांच्‍या सौंदर्यात्‍मक गुणवत्तेचा नाश होतो.

 

 

वायू प्रदूषण - वायू प्रदूषण म्‍हणजे हवेमध्‍ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. ह्याच्‍यामुळे वातावरणातील (पृथ्‍वीच्‍या सभोवताली असलेल्‍या वातावरणात) संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे (त्‍या थराचे घनत्‍व कमी झाले आहे) परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्‍या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचल

 

खाली काही मुख्य वायू प्रदूषक घटक व त्यांचे स्रोत दिलेले आहेत –

·         कार्बन मोनोक्साइड (CO) एक रंगहीन, गंधहीन वायू आहे जो कार्बन आधारित इंधने अर्धवट जाळण्‍याने उत्‍पन्न होतो जसे पेट्रोल, डिझेल आणि लाकडे. सिगरेटसारख्‍या नैसर्गिक व कृत्रिम उत्‍पादनांच्‍या जळण्‍यामुळेदेखील हे उत्‍पन्न होतात. आपल्‍या शरीरात प्रवेश करणार्‍या प्राणवायूचे प्रमाण कमी करतो. ह्यामुळे आपली हालचाल मंदावते आणि आपणांस झोप येऊन आपण गोंधळात पडू शकतो.

·         कार्बन डायऑक्‍साइड (CO2) एक प्रमुख हरितगृह वायू आहे. कोळसा, तेल, आणि नैसर्गिक वायू जाळणे ह्यासारख्‍या मानवी क्रियांचा हा परिणाम आहे.

 


 

 

·         क्लोरोफ्लोरोकार्बन्स् (CFC) गॅसेसचे उत्‍सर्जन मुख्‍यत्‍वे एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटर्समधून होते. जेव्‍हां वायूशी ह्यांचा संयोग वायूशी घडून येतो,CFC स्‍ट्रेटोस्फियर पर्यंत वर जातात आणि तेथे त्‍यांचा संपर्क काही इतर वायूंशी घडून येतो, ज्‍यामुळे सूर्याच्‍या हानिकारक अल्‍ट्राव्‍हायोलेट किरणांपासून पृथ्‍वीचे संरक्षण करणार्‍या ओझोन थराचा ह्रास होत आहे.

 

·         शिसे हे पेट्रोल, डिझेल, शिश्‍याच्‍या बॅटर्‍या, पेंटस्, हेयर डाय उत्‍पादने इत्‍यादींमध्‍ये असतात. विशेषत: लहान मुलांवर शिश्‍याचा वाईट परिणाम होतो. काही वेळा ह्याच्‍यामुळे संपूर्ण नाडी तंत्रास हानि पोचू शकते, पचन क्रियेसंबंधी समस्‍या बळावू शकतात आणि काही वेळा कर्करोग देखील होऊ शकतो.

 

·         ओझोन पृथ्‍वी सभोवताली असलेल्‍या वातावरणाच्‍या वरील थरांमध्‍ये नैसर्गिक स्‍वरूपातच असतो. हा महत्‍वपूर्ण वायू सूर्याच्‍या हानिकारक अल्‍ट्राव्‍हायोलेट किरणांपासून पृथ्‍वीचे संरक्षण एखाद्या ढालीप्रमाणे करतो. तथापि, जमिनीच्‍या पातळीवर, हा उच्‍च विषारी प्रभाव असणारा एक प्रदूषण घटक आहे. वाहने व कारखाने हे जमिनीच्‍या पातळीच्‍या ओझोन उत्‍सर्जनाचे मुख्‍य स्‍त्रोत आहेत. ओझोनमुळे डोळ्यांस खाज सुटते, जळजळ होते व डोळ्यांतून पाणीही वाहते. ह्याच्‍यामुळे सर्दी-पडसे आणि न्‍युमोनियाच्‍या विरूध्‍द आपली रोगप्रतिकारक शक्ति कमी होते.

 

 

·         नायट्रोजन ऑक्साइडमुळे (Nox) ह्यामुळे काळे धुके तसेच आम्‍लयुक्‍त पाऊस पडतो. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांसारखी इंधने जाळण्‍याने हा उत्‍पन्न होतो. हिवाळ्यात नायट्रोजन ऑक्‍साइडमुळे मुलांना श्‍वसनसंबंधी आजार होण्‍याची शक्‍यता असते.

 

·         हवेमध्ये तरंगणारे कणस्वरूप पदार्थ (SPM) हवेमध्‍ये धूर, धूळ, आणि वाफेच्‍या स्‍वरूपात खूप वेळपर्यंत तरंगणारे घन पदार्थकण असतात आणि हे धुक्‍याचे मुख्‍य स्‍त्रोत असल्‍याने अंधत्‍वासही कारण ठरू शकतात किंवा अंधुक दिसू लागते. ह्यांतील बारीक कण, जेव्‍हां श्‍वासाबरोबर शरीरात प्रवेश करतात तेव्‍हां ते आपल्‍या फुफ्फुसांमध्‍ये जाऊन बसतात आणि मग फुफ्फुसांना हानि पोचून श्‍वसनसंबंधी त्रास सुरू होतो.

·         सल्फर डायऑक्साइड (SO2) हा वायू प्रामुख्‍याने कोळसा जाळल्‍यावर उत्‍पन्न होतो, मुख्‍यत्‍वे औष्णिक विद्युत केंद्रांतून. काही औद्योगिक प्रकियांमुळे, उदा. कागद तयार करणे आणि धातू वितळविणे इ. मुळे सल्‍फर डायऑक्‍साइड उत्‍पन्‍न होतो. काळे धुके व आम्‍लयुक्‍त पाऊस ह्यांचा हा मुख्‍य कारण घटक आहे. ह्याच्‍यामुळे फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.

 

रासायनिक प्रदूषण - रासायनिक प्रदूषणाचे स्‍त्रोत पुष्‍कळ प्रकारचे आहेत, ज्‍यामध्‍ये समावेश आहे:

·         घरगुती नि:सरण

·         औद्योगिक निचरा

·         अवशेष/कचर्‍यातून होणारी गळती

·         वातावरणीय उत्‍सर्जन

·         घरगुती निर्मूलन

·         समुद्रातील अपघात व फैलाव

·         तेलाच्‍या रिगमधून होणारा संचालनात्‍मक नि:सरण

·         खाणकामातील नि:सरण आणि

·         शेतीसंबंधी निस्सारण

तथापि काही रसायने ही प्रत्‍येकास विचार करायला लावण्‍यासारखी बाब असते कारण हे स्‍थायी प्रदूषण घटक आहेत:असे पदार्थ समुद्री अन्नसाखळ्यांमध्‍ये प्रवेश करतात आणि सरते शेवटी ह्या साखळीतून समुद्री खाद्य भक्षकांमध्‍ये वाढत्‍या प्रमाणात प्रवेश करतात.स्‍थायी प्रदूषण घटकांमध्‍ये कीटकनाशके, उदा.डीडीटी आणि औद्योगिक रसायने, तसेच सध्याच्या जमान्यात पीसीबी ह्यांचा समावेश आहे.

 

निष्कर्ष - गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.

·         प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.

·         आणखी काही सर्वसामान्‍य प्रकारच्‍या प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये क्‍लोरिनेटेड हायड्रोकार्बन्‍स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्‍त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.

·         प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्‍परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्‍या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल-शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.

प्रदूषण वाढवणाऱ्या या दोन गोष्टींमुळे झाडे हळूहळू इतकी कमकुवत होतात की त्यांच्यात कीड व रोगांपासून संरक्षण करण्याची शक्तीच उरत नाही. औद्योगिक प्रगती केलेल्या देशांतील कारखान्यांमुळे जागतिक प्रमाणावर पर्यावरणाला धोका आहे; प्रदूषण पसरत चालले आहे आणि नैसर्गिक संपत्तीचा नाश केला जात आहे. शिवाय, प्रदूषणामुळे पृथ्वी आज गंभीर समस्यांनी पीडित आहे आणि स्वार्थी व संधीसाधू लोक तिच्या साधनांचा आपल्या फायद्याकरता वाटेल तसा उपयोग करत आहेत विसाव्या शतकादरम्यान प्रदूषण ही एक अतिशय बिकट समस्या बनली आहे; आधीच्या शतकांना या समस्येची किंचितही कल्पना नव्हती. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. दुसरीकडे पाहता, मनुष्य हवा प्रदूषित करत आहेत, जमिनीला विषारी बनवत आहेत, पृथ्वीची साधनसंपत्ती नष्ट करत आहेत आणि असंख्य प्राण्यांना नामशेष होण्याच्या वाटेला लावत आहेत.

 


 

 प्रदूषणाचे प्रकार : –. पारंपारिक प्रदूषणांच्‍या स्‍वरूपांमध्‍ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्‍सर्गी (रेडियोऍक्टिव्‍ह) दूषित ... वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण  संपत्तीची हानी होऊ शकते. ....

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...