जलयुक्त शिवार
भेट -
प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरून असे दिसले , की 2016 साली फक्त ' नदी-नाल्यांचे खोलीकरण , रुंदीकरण , व सरळीकरण’ या एकाच
गोष्टीवर भर देण्यात येत होता.कारण प्रत्येक गावामध्ये बरीच बंधारे, पाझर तलाव, नाले किंवा ओढे ही नादुरुस्त स्थितीमध्ये
आहेत किंवा गाळाने भरलेली आहेत. सर्व प्रथम अशा नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती व
गाळ काढण्याचे काम करणे आवश्यक आहे. शासन, गाव, कंपनी सीएसआर आणि सामाजिक संस्था या नदी/नाले खोलीकरण व रुंदीकरणावर भर
देतात आणि बाकी ११ कामे विशेष होत नाहीत. त्यामुळे या
क्षेत्रात बरीच वर्षे काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी, कार्यकर्त्यांनी,
गावकऱ्यांनी व राजकारण्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
उद्दिष्ट्ये
–
पावसाचे पाणी गावाचे शिवारातच अडविणे, भूगर्भातील
पाण्याच्या पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित
पाणी, पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे (ठिबक व तुषार), बंद पडलेल्या
पाणीपुरवठा योजना पुनर्जिवीत करणे, पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम
अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्मिती, साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले
व नादुरुस्त झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्न:स्थापित करणे/वाढविणे
(बंधारे/गाव तलाव/पाझर तलाव/केटी वेअर्स/सिमेंट बंधारे), जलस्त्रोतांमधील
गाळ लोक सहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे, पाण्याच्या
ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव/जागृती निर्माण करणे, पाणी
अडविणे/मुरविणे बाबत लोकांना प्रोत्साहित करणे/लोक सहभाग वाढविणे.
विश्लेषण –
पाचवीलाच पुजलेला दुष्काळ.. ही म्हण जिल्ह्यातील
अवर्षणप्रवण भागासाठी तंतोतंत लागू पडते. कमी-अधिक तीव्रतेने पडणारा पाऊस, कमी
कालावधी जास्त पडणारा पाऊस अशा लहरी पावसामुळेही शेतीचे चक्र विस्कटले आहे.
अनार्वषणामुळे हवालदील झालेला शेतकरी.. पाणी नसल्यामुळे डोक्याला हात लावून पावसाची
वाट बघणारा शेतकरी असे चित्र आपण जिल्ह्यामध्ये पहावयास मिळते. मात्र हे चित्र
बदलविण्यासाठी राज्य शासनाने शेत शिवार जलयुक्त करण्याचे ठरविले.
राज्यात लोकचळवळीच्या रूपामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा
प्रारंभ केला. पुढील पाच वर्षात राज्यातील 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच शासनाने जाहीर
केला. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात 330 व
दुसऱ्या टप्प्यात 245 गावांची
निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 80 टँकरग्रस्त
गावे अभियानात प्रामुख्याने निवडली होती. या अभियानातंर्गत जिल्ह्यात जलंसधारण व
मृदसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. या कामांची फलश्रूती आता दिसू
लागली असून संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर गाव शिवारातील विहीरींना पाण्याचे झरे
लागले आहेत.
खारपाणपट्टयात असलेल्या संग्रामपूर तालुक्यात या
अभियानाच्या माध्यमातनू भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने खूप मोठ्या प्रमाणावर
काम केले. या भागामध्ये जलपुर्नभरण चर व गॅबीयन बंधाऱ्यांची कामे घेण्यात आली. या
कामांमुळे खारपाणपट्टयातील लाडणापूर भागात जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढण्यास
चांगलीच मदत झाली. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या कामांमुळे या
भागातील भूजल पातळी कमालीची वाढणार आहे. लाडणापूर येथील गॅबीयन बंधारा व
जलपुर्नभरण चर कामांवर 28 लक्ष
16 हजार 654 रूपयांचा निधी खर्च झाला
आहे. गॅबीयन बंधारे व जलपुर्नभरण चर प्रामुख्याने नाले, ओढ्यांच्या शेजारी खोदण्यात
आले आहे. त्यामुळे यामध्ये जमा झालेले पाणी थेट जमिनीत मुरत आहे. परिणामी, विहीरींना खालपर्यंत झरे
लागल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.

जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानामुळे निश्चितच भूजल
पातळीत वाढ होत असून शेतीकरिता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध होत आहे. जलयुक्तमधील
सर्व प्रयत्नांचा परिपाक आज पहिल्याच पावसात विहीरीला लागलेल्या झरांच्या
माध्यमातून दिसतो आहे. जिल्ह्यातील सिंचनाच्या कामामुळे या पावसाळ्यात मोठा खंड
पडला तरी विहीरीच्या पाण्यावर एखादे ओलीत शेतकऱ्यांना करता येणार आहे. जलयुक्त
शिवारमुळे विहीरीला आले पाणी.. त्यामुळे शेत पिकेल सोन्यावाणी.. एवढे मात्र
निश्चित ...
विषयाची
निवड –
सदर विषय पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित
असून त्यातून जाल्युक्त शिवार या विषयाचा विविध घटकांमधील आतर संबध व्यक्त
करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जल युक्त शिवार या संकल्पने मुले अनेक ठिकाणी
पाण्या साठी महिलांना वन वन भटकावे लागत होते ते आता थांबले आहे ते फक्त आणि फक्त
जल युक्त शिवार झाल्यामुळे त्याच प्रमाणे शेतात हिरवळ दिसुलागली पिक येऊ लागली व
परिसर हिरवागार झाल्यामुळे मी सदर विषय हा माझ्या शालेय प्रकल्प करिता निवडलेला
आहे या प्रकल्प निवडी मागील माझा हाच उद्देश आहे कि माझ्या शालेय विद्यार्थी
,विद्यार्थीनीना जल युक्त शिवार म्हणजे काय व त्या माध्यमातून पाण्याचे महत्व व
सर्वांनी मिळून केलेल्या जल युक्त शिवाराचे उपक्रमाला शालेय विद्यार्थी यांनी
हातभार लावावा जेणे करून त्यांना त्या विषयी चागले ज्ञान मिळेल.
महत्व –
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत ७२७०२ कामांचे नियोजन करण्यात आले
असून, त्यापैकी ४८१५२ कामे
पूर्ण झाली आहेत. अजूनही प्रगतीपथावरील जवळपास २४ हजार कामे पूर्ण करणे बाकी आहेत.
२०१६-१७ या वर्षांसाठी नवीन दीड हजार गावांची निवड पूर्ण झाली आहे. अभियानातील
कामांमुळे विहिरींच्या पाणीपातळीत २.७५ मीटरपर्यंत वाढ झाली असून,
प्रत्यक्षात १.१६ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला
असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. शिल्लक गावांची मोठी संख्या पाहता तत्काळ कामे
पूर्ण होणाऱ्या गावांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून,
या गावामध्ये डेडलाइनपूर्वी कामे पूर्ण करण्यात येणार
आहे.
विषयाचे
सादरीकरण –
राज्यात २०१२ पासून जलसंकट
घोंगावते आहे. दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या जनतेला जलयुक्त शिवार योजनेत आशेचा
किरण दिसला. सर्वसामान्य जनतेच्या मानसिकतेत आजवर नदीजोड प्रकल्प आणि शिरपूर
पॅटर्न होता. त्यात जलयुक्त शिवारची भर पडली. ही योजना मुळात काय आहे आणि तिची
अंमलबजावणी कशी होते आहे याचा आढावा..
महाराष्ट्र सरकारने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान
योजना चालु केली आहे. कार्यक्रमाचा हेतू २५००० गावे पाणी टंचाई मुक्त करणे हा आहे.
राज्यात जवळ जवळ ८२% क्षेत्र कोरडवाहू व ५२% क्षेत्र अवर्षण प्रवण आहे.सन २०१४-१५
मध्ये भुजल पातळीत जास्त घट झालेले १८८ तालुके (२२३४ गावे) आहेत तर २२
जिल्ह्यांतील १९०५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहिर केली आहे. त्या ठिकाणी
प्राधान्याने सदर "जलयुक्त शिवार अभियान" राबविणे आवश्यक आहे. तसेच
भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी
उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.त्याकरिता विविध विभागांतर्गत मंजुर असलेल्या
योजनांच्या मंजुर निधीतून/ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजना/आमदार /खासदार निधी/जिल्हास्तर निधी/अशासकीय संख्या /सी.एस.आर व लोकसहभाग
यांच्या माध्यमातून टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यातील सर्व
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.
निष्कर्ष –
अभियानाच्या
माध्यमातून आज अखेर 791 कोटी लिटर पाणीसाठा तयार
झाला, झालेल्या कामापासून 24572 विहिरींना
फायदा, लाभक्षेत्र - 42200 एकर,
काढलेल्या गाळातून 2300 हे. क्षेत्राचे पडीक क्षेत्रापासून
लागवडीलायक क्षेत्रामध्ये रुपांतर, नाला खोलीकरणाच्या
कामातून निघालेल्या मुरुमापासून 135 कि.मी.
अंतराचे रस्ते निर्माण.
पुण्यातील इंदापूर लाकडी गावातील आणि बारामतीमधील वंजारवाडी
गावातील जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवार पाण्याने भरून गेली आहेत ..
संदर्भ
सूची –
सबंधित विषयावर
माहितीचा आढावा मिळवण्यासाठी मी व माझ्या मित्रांनी वेगवेगळ्या गोष्टीचा वापर केला
.आणि आम्हाला आमच्या विषयाची पुरेशी माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली त्यातील काही
गोष्टी ज्याच आम्ही वापर केला १ वर्तमानपत्र या माद्यमातून संस्काराचे मोती या
सदराखाली मिळालेल्या माहितीमधून तसेच वेगवेगळ्या उपक्रम या मधून ,२ इन्टरनेट
मुलाखत या माध्यमातून तसेच पाठ्यपुस्तकातील आभ्यास्क्मातील पर्यावरण या
पुस्तकामधून ,तसेच मला या विषया संबंधी विशेष मार्गदर्शन माझ्या म्याडम सौ.निकम
यांनी आम्हाला मोलाची माहिती दिली.
अनेक वेबसाईटची कॉपीराईट असणारी माहिती तुम्ही येथे देत आहात. असे करणे कॉपीराईट कायद्याने योग्य नाही. उद्या कोणी तक्रार केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तरी काळजी घ्या. कॉपीराईट असणाऱ्या पोस्ट काढून टाका. अगदी विकिपीडिया तील माहिती घेतली असली तरीही कारण तेथे येणारी माहिती कोणीही भारत असते. त्यामुळे कॉपीराईट माहिती असू शकते
उत्तर द्याहटवा