प्रस्तावना :
आज आपण एका नवीन विषयाकडे वळणार आहोत आधुनिक ज्ञान
आणी पर्यावरण या विषयी चला तर ,सुरुवात करुया मित्रांनो आज काल पार्यावर्ण पर्यावरण हर धोक्यात
आलेले आहे असे सर्वच म्हणत असतात परंतु या पर्यावरणाची बिघडलेली अवस्था याकडे कोणी
खऱ्या अर्थाने बघत नाही.खर्च हि व्यवस्था आपण बदलू शकतो काय हा मोठा प्रश्न आपल्या
सर्वान पुढे आज उभा राहिलेलाआहे.
मित्रांनो म्हणजे
हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. निसर्गामध्ये या
सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की, पृथ्वीवर एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी
वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून
निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला जितकी आवश्यक आहे.
तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत आलेला असतो.
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे
सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात.
आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी
प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो.
पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे
सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट पक्षी, प्राणी, डोंगर, जंगल, शेती, नदी, नाले, गवत, समुद्र, झाडे, आकाश हे
सगळे आपण पाहात असतो, त्याप्रमाणे न दिसणारी परंतु वातावरणात असणारी हवा
आपल्याला जाणवत असते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण शोध घेतला तर आपल्याला
नव्यानव्या आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टीही दिसू लागतात. गावातही नदी
कुठून वाहात आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते आपण पाहीले तर आपल्याला
वेगळी दृश्ये वेगळी माणसे, वेगळे वृक्ष, सगळेच
वेगळे दिसू लागते वेगळे म्हणजे नव्याने नेहमी पाहतो त्यापेक्षा वेगळे आपण जातो. हा
त्या त्या ठिकाणचा परिसर वेगवेगळा असतो, त्या
त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी वैशिष्टयपूर्ण संबंध असतात. आपण त्या
परिसरात राहिलो तर आपलाही इतरांशी संबंध येत असतो. असा परस्परसंबंध असलेले तिथले तिथले वातावरण म्हणजेच पर्यावरण - परिसर परस्परसंबंधित
असलेले घटक आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच परिसर अभ्यास
पर्यावरणाचा अभ्यास.
पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सूर्य, पाणी जमीन, हवा आणि यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व
सजीव सृष्टी.
विषयाची निवड :
हा विषय निवडण्या मागील उद्देश्य म्हणजे आपल्या
रोजच्या वातावरण व आधुनिक माहिती प्रणालीमुळे पर्यावरणात माणसाचे एक महत्वाचे
स्थान आहे. बुध्दीच्या जोरावर तो पर्यावरण -संकल्पनेत महत्वाची भूमिका बजावत असतो.
त्याचा योग्य किंवा दुरुपयोग करणे हे त्याच्याच हाती असल्याने तो पर्यावरणाच्या
केंद्रस्थानी आहे. आधुनिक ज्ञान व पर्यावरण या विषयी शालेय विद्यार्थी यांना
माहिती मिळावी व त्या माध्यमातून जन जागृती होऊन सादर विषयाचे आकलन व्हावे म्हणून
मी आधुनिक ज्ञान व पर्यावरण हा विषय निवडला आहे .
त्याच प्रमाणे सध्या पर्यावरणाचे सौरक्षण करण्या करीता आधुनिक
ज्ञानाच्या माध्यमातून अनेक लोक चळवळी त्याच प्रमाणे अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत
पर्यावरणाचा अभ्यास करीत आहेत,पर्यावरणाची हानी फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.हेही या
लोकांना समजत आहे,आणी म्हणून आता
पर्यावरणातील झालेला बदल जर सुधारायचा असेल तर प्रत्येक अगदी सामान्य माणसाची याला
गरज आहे.
माहितीचे संकलन व सादरीकरण :
पर्यावरण म्हणजे काय, त्याचे महत्वाचे घटक, त्यामध्ये असलेलया साधनसंपती चे महत्व यांचा आपण आतापर्यत विचार केला. त्या पार्श्वभूमीवर मानवाचे
पर्यावरणातील केंद्रस्थान आणि त्याच्या योग्य अयोग्य पर्यावरणावर झालेला परिणाम
यांचा अभ्यास करणे सोपे जाईल.शिकारी ते शेतकरी अशा क्रमाने मानवाचा विकास होत गेला
जीवन अधिकाधिक सूखी व संपन्न करण्यासाठी त्याने बुध्दी आणि कौशल्याचा वापर करायला सुरवात केली.
मानवी उत्क्रांती व विकास यांचा इतिहास घडत गेला.त्याने नवनवीन साधने, तंत्रज्ञान शोधून काढले. यातूनच स्वार्थ, आणि निसर्गावर मात करण्याची महत्वाकांक्षा यांनी मानवाला घेरुन
टाकले.अनेक वैज्ञानिक शोध लावत त्याने सुखसोयींची साधने निर्माण केली.वाढत्या
लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी त्याने औद्योगिक क्रांतीचा आधार घेतला.तेव्हापासून
निसर्गाचे मूळ स्वरूपच विद्रुप आणि भाषांतरांवरूनरष्ट खंडीत होऊ लागले. जंगले कापली जाऊ लागली. त्यातून शेतजमिनी निर्माण केल्या
गेल्या आणि इमारती बांधण्यासाठी त्याच शेतजमिनी नंतर उपयोगात आणल्या जाऊ लागली. कच्चा माल मिळविण्यासाठी, इंधनाची
वाढती गरज भागविण्यासाठी जमिनी मैलमैल खोल खोदल्या गेल्या निसर्गसंपत्तीच्या
बेसुमार वापरामुळे, तिचा झपाटयाने नाश होऊ लागला. ही प्रकिया गेल्या
दोनशे वर्षात अधिकाधिक वेगाने होऊ लागली. या आणि अशा कृत्यामूळे निसर्गाचा नाश तर
होऊ लागलाच, पण त्याचबरोबर माणसाची वृत्तीवरवरही बदलत गेली.
त्याची हाव अधिकच वाढत गेली. निसर्गाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच
बदलला.निसर्गाला आपण अंकित करू शकतो, त्याच्यावर
आपण विजय मिळवू शकतो, आपलाच फक्त उपभोग घेण्याचा अधिकार आहे,बाकी इतर पशुपक्षी, वनस्पती,आपल्यासाठीच निर्माण होत
असते. अशा कल्पनांनी माणूस आत्मकेंदि्रत होत गेला. इतर घटकांना त्याने
स्वार्थापोटी वेठीस धरले एवढेच नाही तर माणसामाणसात देशादेशांमध्ये बळी तो कानपिळी
या न्यायाने जीवघेण्या स्पर्धा सुरु झाल्या ज्या विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करुन
त्याने नवनवीन शोध लावले, त्याच ज्ञानाच्चा आधारे त्याने इतर सजीव
घटकांबरोबरच इतर दुर्बल माणसांना, देशांना अंकित करण्यासाठी संहारक हत्यारे, शस्त्रे, निर्माण केली यामध्ये वेगाने बदल घडवून
अणुबाँबसारखे सारे जगच नष्ट करु शकणारे अस्त्र त्याने तयार करुन जणू
निसर्गाविरुध्द युध्द पुकारले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. निसर्गिक
साधनसंपत्तीची टंचाई तर भासू लागलीच, पण
जीवनाला आवश्यक अशी हवा, जमीन पाणी प्रदूषित होऊ लागली.पर्यावरणाला धोका
निर्माण करणार्या जागतिक स्तरावरच्या यांसारख्या घटनांची दखल काही देश, संस्था पर्यावरणवादी घेत होतेच, परंतु
जागतिक स्तरावर हा प्रश्न तेवढया गंभीरपणे पाहिला जात नव्हता. या प्रश्नाचे
सर्वभक्षक स्वरुप तीव्र होत होते. त्यामूळे संयुक्त राष्ट्रसंघाला या समस्यांकडे
गंभीरपणे पाहण्याची वेळ आली पर्यावरणीय समस्या या त्या त्या देशांच्या समस्या
म्हणून त्यांच्याकडे इतरांनी दुर्लक्ष न करता त्या सगळया जगाला चिंतित करणार्या
आहेत आणि जागतिक हितासाठी त्या सामुदायिक रीतीनेच सोडवायला हव्यात, असा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला.
आधुनिक ज्ञाणामुळे आज आपल्याला माहिती तंत्रज्ञान
तसेच अनेक माध्यमातून मानवाला शिकण्यासाठी खूप आहे. परंतू पर्यावरण व निसर्गाने
दिलेले वरदान विसरून आपण आज्ञाना कडे आपली वाटचाल होतांना दिसत आहे.
उद्दिष्ट्ये :
मानव हा त्याच्या पर्यावरणाचा रक्षक आणि भक्षकही
असतो. त्यामूळे त्याला भौतिक स्थिरता तसेच स्वत:च्या बौध्दिक नैतिक सामाजिक आणि
आत्मिक वृध्दींची संधी प्राप्त होत असते. मानवजातीच्या प्रदीर्घ आणि अत्यंत खडतर
अशा उत्क्रांतीच्या वाटचालीत, मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वेगवान
प्रगतीच्या जोरावर पर्यावरणात अनेक प्रकारांनी आणि प्रचंड प्रमाणात आमूलाग्र बदल
करण्याची शक्ती मिळविली आहे. नैसर्गिक आणि मानीव असे दोन्ही प्रकारचे पर्यावरण
माणसाच्या हितासाठी आणि मूलभूत मानीव अधिकारांच्या उपभोगासाठी त्याचां उपयोग करणे,संपूर्ण जगातल्या मानवाचे हित तसेच त्यांचा आर्थिक विकास यांवर मानवी
पर्यावरणाची सुरक्षा व सुधारणा यांचा निश्चित असा प्रभाव पडत असतोआणि हेच दोन
अत्यंत महत्वाचे व प्रमुख विषय सध्या जगातील सर्व लोकांची अत्यावश्यक आणि तातडीची
आकांक्षा आहे आणि ती पूर्ण करणे सर्वच राष्ट्रांचे कर्तव्य आहे.सभोवतालच्या
परिस्थितीत बदल करण्याची माणसात क्षमता असते आपल्या विवेकबुध्दीने त्याने या
क्षमतेचा उपयोग केला, तर लोकांचा विकास आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याची
संधी उपलब्ध होऊ शकेल. पण अविवेकी आणि अनुचित मार्गाने या क्षमतेचा वापर माणूस करु
लागला की, हीच शक्ती मानवजातीचे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे
प्रचंड नुकसान करू शकते आणि हे नुकसार पुन्हा भरुन न येणरे असू शकते. जल आणि हवेचे
भयानक प्रदूषण, पक्षी- प्राणी, वनस्पती
यांचा प्रचंड विनाश, परितंत्राच्या संतुलनात मोठया प्रमाणातील मानवी
हस्तक्षेपामूळे निर्माण झालेला असमतोल पुन्हा उत्पन्न होऊ न शकणार्या अनेक
संसाधनांची टंचाई आणि विनाश, मानवाच्या भौतिक मानसिक अशा अनेक स्तरांवर नुकसारन
वाढतच जाते आहे. यावरुन हे लक्षात आणणे आवश्यक आहे की माणूस आपल्या बुध्दीचा आणि
शक्तीचा उपयाग अविवेकी आणि अनुचित पध्दतीनेच करीत असून त्यामुळे तो त्याचे स्वत:चे
आणि पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करीत आहे.
निरीक्षण :
या आधुनिक ज्ञाना चा उपयोग आपल्या पर्यावरणाला
जीवदान देणे हि काळाची गरज आहे.या उद्दिष्टांना समोर ठेवून पर्यावरण विभागतर्फे
अनेक योजना तयार करण्यात आल्या. प्रदूषण नियंत्रणांच्या दृष्टीने 'जल आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायदा' बनविला
गेला. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ हा पूर्वीच्या कायद्यांना अधिक पुष्टी-शक्ती
मिळावी म्हणून करण्यात आला. वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने
राष्ट्रीय उद्याने, वन प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने
राष्ट्रीय उद्याने, वन अभयारण्य यांची देशभर ठिकठिकाणी स्थपना करण्यात
आली. १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर' स्थापना झाली १९८२ मध्ये राष्ट्रीय पातळीवर दोन
विशेष कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.
१) गंगा शुध्दीकरण प्रकल्प
२) देशभर वृक्षारोपण
(प्रकल्प) मोहिमा.
यांच्या आधारे गावागावांतून स्वच्छता मोहिमा, प्रदूषण नियंत्रण मोहिमा तसेच वृक्षारोपणाच्या कार्याना आरंभ करण्यात
आला. सगळया देशभर जनजागृती होऊन सर्व स्वरांवर उत्साहाने कामे सूरु झाली.
परंतु आपल्या देशाचे दुर्दैव हे की इथे कोणतेही
कार्य सुरु करताना प्रारंभी जो उत्साह. जी जिद्द असते, एकदिलाने काम करण्याची जी इच्छाशक्ती असते ती नंतर पुढे कमी होत
जाते. म्हणूनच देशाची अत्यंत महत्वाची आणि जनहिताची ही पर्यावरण योजना कार्यवाहीत
आणताना पुढे तिच्यात शिथिलता आली. प्रदूषण रोखण्यासाठी असलेल्यानियमाचा फारसा
परिणाम झाला नाही. त्यांची अमलबजावणी करण्यात शिथिलता आली. वाढत्या लोकसंख्येमुळे
सार्वजनिक स्वच्छता नाहीशी होऊन प्रदूषणाचा जोर वाढला गरजा भागविण्यासाठी बेसुमार
जंगलतोड होत गेली. पिण्याचे पाणी आणि अन्न यांची टंचाई भासू लागली काही प्रमाणात
वस्तुस्थिती होती आणि त्यात भर म्हणून काही पर्यावरण भयावह आणि निराशाजनक पर्यावरणाचे एकूणच चित्र उभे केले. आशावादी
दृष्टिकोनाऐवजी सगळीकडेच निराशेचेच वातावरण निर्माण झाले.
जगण्यासाठी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा, या
मूलभूत गोष्टींची कमतरता भविष्यात भासणार आहे आणि त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि
श्र्वास घेण्यासाठी प्राणवायू यांची टंचाई होणार आहे व त्यामुळें सर्व जीवनच
संकटात सापडणार आहे असे आपल्याला वाटते का ? जर तसे वाटत असेल तर ती निराशा आपण झटकून टाकायला हवी आणि त्याचबरोबर
बिघडत चाललेल्या पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी आणि त्याचे सतुलन राखण्यासाठी
प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.
महत्व :
विकसनशील देशातील बहूतेक पर्यावरणीय समस्या या
त्या देशाचा विकास न झाल्यामुळे उदभवलेल्या असतात. स्वत:च्या प्राथमिक गरजा
भागविण्याइतकी ज्यांची आर्थिक कुवत नाही असे कोटयावधी लोक अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांपासून वंचित आहेत म्हणूनच विकसनशील
देशांनी या लोकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता आणि पर्यावरण विकास यांना
केंद्रस्थानी ठेवूनच आपल्या विकास योजना आखायला हव्यात. यासाठी विकसित आणि
विकसनशील देशांतील दरी कमी केली पाहिजे. विकसित देशांच्या पर्यावरणीय समस्या या
त्यांच्या औद्योगिकविकासाच्या संदर्भात निर्माण झालेल्या असतात.
वेगाने वाढणारी लोकसंख्या पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक
समस्या निर्माण करीत आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर योजना
राबविणे आवश्यक झाले आहे. वैश्र्विक पर्यावरणाच्या परिणामांच्या दृष्टिने आपण
आपल्या कृतींमध्ये बेफिकीरी यांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचे कधीही भरुन न येणरे
प्रचंड नुकसान आपल्याकडून होत आहे. भविष्यातही होऊ शकते याउलट परिपूर्ण माहिती आणि
बुध्दी वापरुन कार्य केले गेले तर आपण आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढयांसाठी एका
आशादायक जीवनासाठी अनुकूल असे पर्यावरण निर्माण करु शकतो. चांगल्या जीवनासाठी आणि
पर्यावरणीय गुणवज्ञ्ल्त्;ाा वाढविण्यासाठी काही
सिध्दांत असतात. निसर्गात स्वतंत्र बुध्दीने राहण्यासाठी माणसाने निसर्गाबरोबर
राहून चांगले वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेचा उपयोग करून घ्यायला हवा.
मानवी पर्यावरणाची सूरक्षितता आणि सुधारणा हेच आता सार्या मानवजातीचे एकमेव
उद्दिष्ट बनले आहे.
पर्यावरणाचा हा समतोल साधण्यासाठी प्रत्येक
स्तरावर- व्यक्ती, समाज, संस्था व शासन यांनी सामुदायिकपणे जबाबदारी
स्वीकारायला हवी. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील शासकीय संस्थांनी सर्वसमावेशक
अशी पर्यावरणनीतीर व त्यासाठी कार्ययोजना तयार करण्याचे महत्वाचे मूलभूत काम
करायला हवे. विकसनशील देशांना या संदर्भात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक
ते सर्व प्रकारचे सहकार्य आंतराष्ट्रीय पातळीवरून होणे महत्वाचे आहे, गरजेचे आहे, बहुतांशी पर्यावरण समस्यांना राष्ट्रांच्या
सीमारेषा माहिती नसतात. या समस्या राष्ट्राराष्ट्रांत आपले हातपाय पसरत असतात.
त्या नष्ट करण्यासाठी सगळया देशांमध्ये परस्परसहकार्याची नितांत आवश्यकता आहे.ही
परिषद जगातील सर्व लोक आणि त्यांच्या पिढयांच्या हिताच्या दृष्टिनें मानवी
पर्यावरणाचे सक्षण आणि सुधारणा करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व
देशांना आणि लोकांना करीत आहे.या घोषणांच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत
एकूण २६ सुत्रे करण्यात आली. या सूत्रांचे स्वरूप असे आहे.
अभ्यास पद्धती :
ज्यामध्ये
माणूस सुखी आणि मर्यादाशील जीवन जगु शकेल, जिथे, स्वातंत्र्य, समता, असणि अन्न, वस्त्र, निवारा यांची पुरेशी सुविधा उपलब्ध असेल अशा
पर्यावरणात माणसाला जगण्याचा मूलभुत अधिकार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या
स्वत:साठी व भावी पिढयांसाठी, सुरक्षित आणि सुधारलेले पर्यावरण उपलब्ध करुन देण्याची महत्वाची
जबाबदारीही त्याच्यावर आहे. या संदर्भात रंग- भेद, जात, धर्म, भेदभाव अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तीवरवरची
निंदा केली पाहिजे आणि त्यांना (दूर ठेवले पाहिजे) नष्ट केले पाहिजे.
विचारपूर्वक केलेल्या योग्य त्या उपाययोजना आणि
त्यांची अंमलबजावणी करुन नैसर्गिक साधने, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, जीवमात्र, आणि विशेषत, नैसर्गिक पारिस्थितिकी व्यवस्था ही आताच्या आणि
भावी पिढीच्या कल्याणासाठी सुरक्षित ठेवली पाहिजे, पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपतीची पुनर्मिती करु
शकणारी क्षमता सांभाळून ठेवायला हवी आणि त्यांची शक्यतो पुरस्र्थापना करायला
हवी.वन्यप्राण्यांची आणि त्याच्या निवासस्थळांची सुरक्षा आणि योग्य अशी व्यवस्था
करण्याची जबाबदारी माणसाची आहे. त्यांना आज अनेक कारणांनी धोका निर्माण झाला आहे.
म्हणून आर्थिक विकासाया योजना तयार करताना निसर्ग संरक्षण वन्यजीव संरक्षण यांना
त्यात योग्य ते स्थान देणे आवश्यक आहे.
ज्यांची पुर्ननिर्मिती होत नाही अशा नैसर्गिक
साधनसंपतीचा उपयोग काटकसरीने करायला हवा. ती संपूर्णपणे नष्ट होणार नाही याची
काळजी घ्यायला हवी या संपत्ती चा लाभ संपूर्ण मानवजातीला कसा होईल याकडे लक्ष
ठेवायला हवे.विषारी रसायने, पदार्थ, तसेच उष्णतेचे उत्सर्जन पर्यावरणाला हानी पोहचवत
असतात. म्हणूनच त्यांचे प्रमाण वाढू न देण्याची काळजी घेतली पाहिजे प्रदूषण
रोखण्यासाठी सगळयाच देशांत चालणार्या लोसंघर्षाला न्याय मिळायला हवा.सागरी प्रदूषण
रोखण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने कडक उपाययोजना करायला हवी. जलचरांचे जीवनच अशा
प्रदूषणामूळे नष्ट होते. माणसाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. असे पदार्थ
समुद्रात मिसळून प्रदूषण निर्माण करणार नाही. याची प्रत्येक राष्ट्राने काळजी
घेतली पाहिजे.
माणूस जिथे राहतो आणि जिथे काम करतो तिथले वातावरण
चांगले राहण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती आवश्यक असते. त्याचा जीवनस्तर
उंचावण्यासाठी आणि सुयोग्य पर्यावरणासाठी आर्थिक आणि सामाजिक अनुकूल वातावरण
निर्माण करणे आवश्यक असते.विकासाला वंचित राहिल्यामुळे आणि वारंवार येणार्या
नैसर्गिक संकटांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असतो. पर्यावरणाची ही हानी भरून
काढण्यासाठी विकसित देशांकडून आर्थिक व तांत्रिक साहाय्य उपलब्ध केले गेले पाहिजे.
विकसनशील देशांसाठी वस्तूंच्या किमती स्थिर असणे
आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कच्च्या मालाला योग्य किंमत मिळणे महत्वाचे आहे. कारण
अर्थव्यवस्था आणि पर्यावरण व्यवस्था यांचा परस्पर संबंध असतो सर्व देंशांची
पर्यावरणनीती ही सतत उन्नतशील असायला हवी विकसनशील देशांच्या सध्याच्या भविष्यातील
विकास योजनांवर त्या नीतीचा अनिष्ट परिणाम होणार नाही यासाठी पर्यावरणनीती तयार
करतानाच काळजी घेणे आवश्यक आहे.विकसनशील देशांना त्यांची स्थिती पाहून व आवश्यकता लक्षात घेंऊन
त्याप्रमाणे पर्यावरण सुधारणा व सुरक्षा कार्यायासाठी साधनसामग्री आणि आर्थिक मदत
उपलब्ध करुन द्यायला हवी. त्यामुळे आपल्या विकास योजना तयार करताना ती राष्ट्रे त्यात
पर्यावरण संरक्षणाला महत्वाचे स्थान देतील.पर्यावरण संवर्धनात नैसर्गिक
साधनसामग्रीची व्यवस्था विवेक दृष्टिने व्हावी यासाठी राष्ट्रांनी आपल्या
विकासयोजना तयार करताना समग्र आणि व्यापक अशी दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे मानवी
पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास यांचा योग्य मेळ घातला जाऊ शकेल.लोकसंख्या आणि
शहरीकरण यांवर अशा तर्हेची योजना तयार केली गेली पाहिजे. की ज्यामुळे पर्यावरणाला
हानी न पोहोचता सगळयांना जास्तीत जास्त तर्हेने सामाजिक, तसेच आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ मिळू शक्तील. या संदर्भात वंशवादी
आणि वसाहतवादी प्रवृत्तीच्या फायद्यासाठी केलेल्या योजना प्रकल्प बंद करावे
लागतील.विकास आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनाची गरज, यांमध्ये
निर्माण होणारा कोणताही वाद विवेकपूर्ण पध्दतीने सोडविला जाऊ शकतो, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.काही क्षेत्रांमध्ये वाढत्या
लोकसंख्येमुळे पर्यावरण व विकासावर अनिष्ट परिणाम होतो. तर काही क्षेत्रांमध्ये
अपुर्या लोकसंख्यमुळे पर्यावरण संवर्धन व विकास गती घेत नाही, त्या ठिकाणी मुलभूत मानवी अधिकांरांसाठी नि:पक्षपाती, डेमोग्राफर्सने सुचविलेली नीती राष्ट्रांकडून अंगिकारली जावी.
आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणारे विज्ञान
आणि तंत्रज्ञान पर्यावरण संकटाचे निदान करण्यासाठी तसेच त्यावरच्या उपाययोजना आणि
संकट नियंत्रित करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी उपयोगत आणले पाहिजे.आर्थिक आणि
सामाजिक विकासासाठी काम करणारे विज्ञान, आणि
तंत्रज्ञान पर्यावरण संकटाचे निदान करण्यासाठी तसेच त्यावरचा उपाययोजना आणि संकट
नियंत्रित करण्यासाठी आणि लोककल्यासाठी उपयोगात आणिले पाहिजे
निष्कर्ष :
मानवाच्या हितासाठी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन
या हेतूने व्यक्ती आणि संस्था तसेच मुले, तरुण आणि
वृध्द यांच्यासाठी पर्यावरण आणि शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. प्राथमिक
सुविधांचा अभाव असलेल्या व्यक्ती आणि समाज यांना पर्यावरण शिक्षण देऊन त्याचे
महत्व पटवून दिले जाणे आवश्यक आहे. कारण अशा शिक्षणामुळेच त्यांच्यात पर्यावरण
जागृती निर्माण होईल. आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धाच्या कामात त्यांचाही सहभाग
लाभेल, तसेच प्रसार माध्यमांकडूनही पर्यावरण
शिक्षणासंबंधी जनजागृती होणे आवश्यक आहे.
पर्यावरण समस्येसंबंधी विशेषत. विकसनशीलन
देशांमध्ये , राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण
समस्यांवर वैज्ञानिक संशोधन चालू राहिले पाहिजे. नवनव्या संशोधनांची माहिती
त्यांना सातत्याने मिळाली पाहिजे. या देशांना कोणताही आर्थिक बोजा न पडता
पर्यावरणीय माहिती उपलब्ध होत राहणे आवश्यक आहे.संयुक्त राष्ट्राचे घोषणापत्र आणि
आंतराष्ट्रीय कायद्याच्या आधारे, कोणत्याही राष्ट्राला त्याच्या प्रदेशातील
साधनसंपतीचा, पर्यावरण नीतीला धरुन उपभोग घेण्याचा अधिकार आहे.
मात्र त्यामुळे इतर कोणत्याही देशाला हानी पोहोचणार नाही याची त्या राष्ट्राने
काळजी घेऊनच उपभोग घ्यायचा आहे.एखाद्या, राष्ट्रात
चाललेल्या कामामुळे जर त्या राष्ट्राबाहेर प्रदूषण निर्माण होत असेल किंवा
पर्यावराणाला धोका निर्माण होत असेल तर तिथल्या लोकांच्या नुकसानीची जबाबदारी आणि
नुकसान भरपाई देण्यासाठी तरतूद असणारा आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्यासाठी
राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.आंतराष्ट्रीय स्तरावर स्वीकारली गेलेली किंवा राष्ट्रीय पातळीवर
निर्धारित केलेली गुणवज्ञ्ल्त्;ाा मानके लागू करण्यापूर्वी विविध देशांच्या
प्रचलित सामाजिक व्यवस्था आणि त्या मानकांची त्या देशातील उपयुक्तता लक्षात घेऊनच
लागू करणे योग्य ठरेल. कारण विकसित देशांच्या दृष्टिने जी मानके उपयुक्त कायदेशीर
किंवा यथायोग्य असतील तीच मानके विकसनशील देशांच्या दृष्टीने निरुपयोगी तसेच
सामाजिक मूल्यांच्या दृष्टीने अनिष्ट, अयोग्यही
होऊ शकतात.लहान आणि मोठया पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांसंबंधीचा आंतरराष्ट्रीय
स्तरावरील सर्व प्रकरणे समान पातळीवर, परस्पर
सहकार्याने सोडविली गेली पाहिजे, सगळीकडे,चालू असलेल्या घडामोडींमुळे
बिघडणार्या पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे, ते
पूर्वस्थितीवर आणणे याची योग्य ती व्यवस्था द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय स्वरुपात
सहकार्यच्या भावनेचे करणे आवश्यक आहे. ती व्यवस्था करताना त्या त्या देशाचे हित व
सार्वभौमत्व लक्षात घेऊनच करायची आहे.
विश्लेषण :
सजीवांना अनुकूल असलेले पर्यावरण मानवी
हस्तक्षेपांमुळे सजीवांना प्रतिकूल बनले. हाच या मागचे विश्लेष असे संबोधले जाते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता
करण्यासाठी मानव पर्यावरणातील विविध घटकांचा वापर करतो. वाढती लोकसंख्या आणि
औद्योगिकरण यांमुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. शेती, वस्त्या आणि उद्योगंधद्यांच्या विस्तारासाठी मानवाने वृक्षतोड केली.
औद्योगिकरणामुळे सजीवांना निरूपयोगी किंवा घातक वायू, द्रव्ये, पर्यावरणात सोडली. त्यामुळे हवा, पाणी, भूमी दूषित झाले. सजीवांवर त्याचा विपरित परिणाम
झाला.
पर्यावरणात वनस्पती, मानव व
इतर प्राणी इत्यादी सजीव घटक आणि हवा, पाणी आणि
भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील सजीवांची वाढ व विकास सजीव-निर्जीव
अशा दोन्ही प्रकारच्या घटकांवर अवलंबून असल्याने या घटकांपैकी कोणताही घटक दूषित
किंवा सजीवांना निरूपयोगी ठरल्यास त्याचा सजीवांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
हे टाळण्यासाठी, पर्यावरणाची गुणवज्ञ्ल्त्;ाा टिकविण्यासाठी मानव, वनस्पती
व प्राणी या सजीवांचे परस्परांशी असलेले पर्यावरणातील नैसर्गिक प्रमाण कायम राहणे
तसेच या सजीवांना अनुकूल अशी हवा, पाणी आणि भूमी या निर्जीव घटकांची नैसर्गिक
शुद्धता कायम राखणे अत्यावश्यक आहे.
उपाय योजना :
भारतात १९७२ पासून पर्यावरण क्षेत्रात योनाबध्द कार्यक्रम सुरु
झालेला होता. देशाच्या पर्यावरणासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी नॅशनल कमिटी फॉर
एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग अॅण्ड कोऑर्डिनेशन या समितीची स्थापना झाली आणि
त्याचप्रमाणे औद्योगिक प्रदूषणाला (आळा) प्रतिबंध (निर्माण) करण्यासाठी केंद्रीय व
राज्यस्तरीय प्रदुषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली. या कमिटीने काही सूचना
मांडल्या त्यानुसार १९८० मध्येच केंद्रामध्ये पर्यावरण विभाग स्वंतत्र रितीने
स्थापण्यात आला. नंतर राज्यांमध्येही विभाग उघडण्यात आले. या कमिटीचे रुपांतर नंतर
नॅशनल कमिटी फॉर एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग मध्ये करण्यात आले. या कमिटीने पर्यावरण
क्षेत्रातील सर्वप्रथम संरक्षणाची, संवर्धनाची
गरज टाळून चालणार नसल्याने स्पष्ट केले. त्या प्राथमिक मूलभूत बाबी अशा-
(१) औद्योगिक प्रदूषणाचे नियंत्रण-
(२) नष्ट होत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांच्या परजातीचे संरक्षण
(३) पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि किमान
स्वच्छता आरोग्य व्यवस्था.
(४) देशातील जमीन, पाणी आणि वनस्पती या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण
आणि योग्य व्यवस्थापन करणे .
सूचना –
पर्यावरणाची गुणवता वाढविण्याची गरज आहे हे
ध्यानात घेऊन पर्यावरणीय संसाधनांच्या सुनियोजनाचे, त्यांच्या
व्यवस्थापनाचे आणि नियंत्रणाचे काम राष्ट्रीय संस्थांकडे सोपविण्यात यावे. माणूस
आणि पर्यावरणाला परमाणू हत्यारांच्या परिणामांपासून तसेच जनसंहाराच्या इतर
साधनांपासून वाचवले पाहिजे. अशा संहारक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याच्या आणि ती
संपूपणे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या राष्ट्रांनी तात्काळ करार केले
पाहिजेत. आंतराष्ट्रीय संघटना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी एका कुशल
समन्वकाची गतिशील भूमिका पार पाडत आहे.(हे राष्ट्रांनी पटवून दिले पाहिजे ) याची
खात्री राष्ट्रांनीच द्यायला हवी.
*धन्यवाद *
Thank you so much sir.....I am looking for this project.....this is very easy to understand and very useful to me as well as students..
उत्तर द्याहटवाThank you 😊
can i get this project about pawan urja
उत्तर द्याहटवानिष्कर्ष please help me
उत्तर द्याहटवाRead my blog to agriculture information blog link:https://omkaragri.blogspot.com/?m=1 plz visit my blog thank you
उत्तर द्याहटवाVery nice sir
उत्तर द्याहटवा