ग्रंथ माझा खरा मित्र
ग्रंथांच्या वाचनामुळे
माणसाचे आयुष्य सुंदर बनते. पुस्तके सुख, दुःखातही माणसासोबत सावलीसारखे
उभी असतात. पुस्तके नुसती
ऑनलाईन असून चालत नाही, तर ऑनब्रेन झाली
पाहिजेत कारण ग्रंथ हेच माणसाचे खरे मित्र असतात, असे मला वाटते म्हणून मी
माझ्या निबंधाचा विषयच आहे “ ग्रंथ माझा खरा मित्र “
माणसाच्या आयुष्यात सुखाचे सगळे सोबती असतात.
मित्र, नातेवाईक माणसाच्या कठीणप्रसंगी कधीही साथ देत
नाहीत. ग्रंथ मात्र जीवनाच्या कोणत्याही वळणावर माणसासोबतच
राहतात. वाचनातून मेंदूची
मशागत होत असते. कारण पुस्तके माणसाचे मस्तक ठिकाणावर आणतात.
सुदैवाने माझा वाचनाचा वेग प्रचंड आहे.
शाळेतील विद्यार्थिनी असल्यामुळे माझे चांगले वाचन होते. आजही मी पुस्तके घेऊनच प्रवास
करतो. ट्रेनचा दीर्घपल्ल्यांचा प्रवास असला की पुस्तके सोबत असतात. माझ्यावर पुस्तकांचे
संस्कार आहेत. पुस्तके माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुस्तकांनी ज्ञानाबरोबरच
संस्कारही दिले.
वाचन, माझा नेहमीचा विरंगुळा. मन अस्वस्थ असलं कि मनाला आधार देणारे हक्काचे मुके सोबती म्हणजे, पुस्तकं! तशी ती म्हणायलाच
मुकी पण त्यांच्याशी मैत्री झाली कि ते खुप काही बोलतात
आजची तरुण
पिढी वाचनात बराच रस घेते. Crossword मध्ये येणाऱ्या आणि येथे मन लावून वाचणाऱ्या रसिकांमध्ये तरुणच जास्त असतात. TV,
Mobile, Internet अशी Knowledge मिळवण्याची
इतर सोपी साधन असून सुद्धा आजचा तरुण Fiction-Nonfiction, Biographies, etc
etc सगळ आवडीने वाचतो.
भाषेत
सांगायचं तर 'ग्रंथ का वाचायची?'
- 'ज्ञान मिळवण्यासाठी कारण त्या ज्ञानाचा
आपल्याला जीवनात पावलापावलावर उपयोग होतो आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला दिशा मिळते.'अगदी खरंच सांगायचं तर आई वडिलांनी
मुलांना जेवणाआधी हात धुवावेत किंवा नेहमी खरे बोलावे असल्या सवयी
लावतेवेळी दररोज कुठल्याही पुस्तकाची दहा-वीस पानं वाचावीत अशी सवय लावली तर
संस्कारक्षम आणि संवेदनशील समाज घडवण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची
गरज उरणार नाही.
वाचनाची आवड जोपासताना आपण कोणत्या
भाषेतील ग्रंथ वाचतो हा विषय गौण ठरतो. भाषा हि खिडकी असते. मराठी वाचकांनी
हिंदी, इंग्रजी
भाषेत प्रसिद्ध, नावाजलेलं
असं सगळं नाही तर जेमतेम वाचायलाच हवं. मराठीत अनुवादित पुस्तकेही
उत्तम पर्याय आहेत. मराठी लेखकांच्या लेखनात अधून-मधून डोकावणारे रसेल, टॉल्स्टॉय, चेकॉव्ह हे देखील वाचले पाहिजे.
स्पष्ट सांगायचे झाले तर फक्त मराठीच
वाचायचं असं ठरवून अगदी निवडून दर्जेदार तेच वाचायचं असं ठरलं तरी
आपली पुरी हयात संपून जाईल इतकी पुस्तके मराठीत आहेत. प्रत्येकाने गडकरी,
जीएं, नेमाडे, बेडेकर, करुंदकर, वपु, अत्रे, पुलं, अश्या निवडक लेखक मंडळींची एक - दोन
तरी ग्रंथ हमखास वाचायला हवीत. मग, वाचत राहा कारण " वाचाल तर
वाचाल..रात्रीचे जागरण करून वाचणे मला अजूनही आवडते.सगळीकडे शांत आहे रात्र हळूहळू चढत
जात आहे आणि मी मोठमोठे श्वास घेत एका पानामागून
एक पान उलगडत क्वचितच आजू बाजूला पाहत मी ग्रंथ वाचनात
रमून गेलेली
आहे.हा माझा आनंदाचा ठेवा आहे. “म्हणून ग्रंथ माझा
खरा मित्र आहे.”
.!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा