शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का ?

 

ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का ?



प्रकल्पाची निवड

आज मी जो विषय प्रकल्प निवडीसाठी घेतलेला आहे.त्या विषयाचे नाव आहे ”ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?" असा आहे.

        ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे.या विषया संदर्भात जमिनीतील असलेले पाणी आपण विहिरीच्या माध्यमातून शेतातील पिकांना देतो त्याचा परिणाम असा होतो कि, ठिबक सिंचन नसल्यामुळे साधारण पणे पिकाला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ज्यास्त होत असल्याने,शतकरी बांधवाना पाण्याचे नियोजन करता येत नाही. जमिनीत जो पर्यंत पाणी आहे तो पर्यंत आपण त्याचा उपभोग घेतो व कालांतराने विहिरीचे पाणी संपते व शेतकरी बांधवाना तेव्हा पाण्याची मोठी गरज आपली पिके वाचविण्यासाठी लागते त्या वेळेस पाण्याचे महत्व कळते.विहिरीतील पाणी संपल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही शेतकरी बांधवांना तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना ठिबक सिंचन या विषयी माहिती मिळावी व त्या माहितीच्या आधारे या प्रकल्पाचे महत्व त्यांना कळावे या करीता सदर विषयाची निवड मी केलेली आहे.


               हाच विषय मला निवडावासा का वाटला ? तर याचे कारण मी असे सांगेल की,भारत हा कृषी प्रधान देश आहे,व शेती हि पाण्यावर आधारित आहे.जर पाण्याचेच नियोजन नसेल तर,शेतामध्ये काहीही पिकणार नाही या माझ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची बचत,त्याच प्रमाणे पिकांना लागेल तेव्हढेच पाणी,व वर्षभर पाण्याची बचत ठिबक सिंचनाच्या साह्याने शेतकरी बांधवांनी जर केली तर त्यांचे उत्पन्नात वाढ होईल व शेतकरी राजा सुजलाम सुफलाम होईल.म्हणून मला हाच विषय माझ्या प्रकल्पा करीता निवडा असे वाटले. 

             या मागील माझी प्रेरणा अशी आहे की,आजच्या डिजिटल युगात आपण शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून जर ठिबक सिंचनाच्या माध्यमाद्वारे आपण जमिनीतील पाणीसाठा वाचवू शकतो जेणे करून विहिरीतील पाण्याची बचत होवून वाचवलेल्या पाण्याने बाकीची जमीन आपण सिंचनाखाली आणून जमिनीची सुपीकता व त्यातील ओलीताचा भाग वाढवू शकतो त्यामुळे वर्षभर पाण्याची बचत करूशकतो.त्याच प्रमाणे जमीन सिंचित करून पिकांची वाढ जोमात होते व जितके पाणी या पिकांना आवश्यक आहे तेव्हढेच पाणी ठिबक शिन्च्नाच्या माध्यमातून आपल्याला पिकांना देता येते.याचा फायदा आपल्याला शेतकरी बांधवाना असा होतो की, त्यांच्या पिकवलेल्या परिपक्व धान्याला भाव चांगला मिळेल.म्हणून मला हा विषय माझ्या प्रकल्पा करीता घ्यावासा वाटला.


उद्दिष्ट्ये –

1) ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ३० ते ६० टक्के विहिरीतील पाण्याची बचत करू शकतो,त्याच प्रमाणे मिळणार्या उत्पादनात ३० टक्क्यापर्यंत वाढ करू शकतो. ठिबक सिंचन केल्याने जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली जाते,त्यामुळे उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर ठिबक सिंचनची योजना करता येते. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

2)  गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे विदर्भ,मराठवाडा या ठिकाणचे शेतकरी अडचणीत आहे.त्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे,जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेनदिवस खालावत जात आहे,त्यामुळे विहिरीतल पाणी साठा लवकर संपत असतो,म्हणूनच शेतकरी बांधवांनी आता ठीबक सिंचन योजनेच्या माघ्यमातून आपल्या पाण्याची बचत करणे,व शासनाने सुद्धा या योजने करीता ५ टक्के अनुदान देत आहे.व शासन ठिबक सिंचन हे बंधन कारक करीत असल्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होत आहे.

3) ठिबक सिंचन योजनेचा अभ्यास करीत असतांना असे दिसून आले की,पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचन योजना  कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन योजनेचाच  उल्लेख करावा लागेल; या योजनेचा उपयोग करीत असतांना पण पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा काढणे, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देवू नये पाणी देण्याचे वेळापत्रकानुसार पाण्याचे नियोजन करावे नाहीतर, अशीचांगली ठिबक सिंचन योजना उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. ज्या वेळेस विहिरीतील पाण्याचे प्रमाण कमी होईल अशा परिस्थितीत पिकांमध्ये बदल करावा किंबहुना कमी पाण्यात येणारे भाजीपाल्याची पिके आणि फळपिके यांच्यामध्ये तापमानाच्या चढ-उतारानुसार पाण्याच्या साठ्यात होणारे बदल, पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून पिकांची निवड करावी. जेणे करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्याची वीस टक्क्यांपर्यंत कपात करता येते. अशा वेळेस डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी फळबागा दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहतात.

4) ठिबक सिंचन योजना हि ज्या ठिकाणी फळ बाग आहे किवां केळीची,कपाशीची बाग किवां शेती केली जाते अशा जमिनी मध्ये रुंद व लांब अंतरावरील फळबागा करीता फार उपयोगी ठरलेली आहे.कोकणातील शेती जमीन हि चढ उताराची असल्यामुळे त्याचा फायदा तेथील शेतकरी बांधवाना घेता येत आहे.

5) पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना  सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला दिले जाते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.त्यामुळे पाण्याची, विजेची,आणी मजुरांची टंचाईभासत नाही, त्याच प्रमाणे ठिबक सिंचन योजने मुळे होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो पैशाची बचत होते त्याचा फायदा हा शेतकरी बांधवाना होतो.म्हणून ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते.

6) ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून,रात्री सुद्धा आपल्याला शेताला पाणी देता येते त्यामुळे त्यावर होणारा मजुराचा खर्च वाचतो.. या पद्धतीत पाट, बांध ह्यांची गरज नसल्याने जमीन वाया जात नाही, खते व किटकनाशके काही प्रमाणात फवारण्यांतून देता येतात. ही पद्धत भुईमूग, सोयाबीन सूर्यफूल, गहू, कापूस, मका इत्यादींसाठी उपयुक्त आहे. ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करता येते व हंगामातील पाण्याचे व्यवस्थापन क्ल्यामुळे वर्षभर म्हणजेच पौसाल्या पर्यंत विहिरीतील पाण्याची बचत करण्यास मदत होतांना दिसत आहे.


विषयाचे महत्व

         पर्यावरणीय दृष्टीकोनातून प्रकल्पा मधून ठिबक सिंचन योजनेचा उपयोग केल्यामुळे जमिनीतील पाण्याचा समतोल राखला जात आहे.त्याचे कारण सिंचन पद्धतीचा वापर,त्यामुळे पर्यावरणाबाबत महत्वाचे म्हणजे जमिनीतील पाणी साठा सुरक्षित करता येईल.उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही,त्याच प्रमाणे ठिबक सिंचना करीता लागणारे पाणी हे नळीच्या साह्याने पिकांना देण्यात येते,त्याचा फायदा पाणी इतरत्र वाया न्जाता फक्त पिकांच्या बुंध्याला जाते,व पाण्याची नासाडी होत नाही.पाण्याची बचतच होते.

 

           स्थानिक पातळीवर परिसरातील लोकाना ठिबक सिंचन मुळे होणारे फायदे कळाले.त्याच बरोबर ठिबक सिंच्नाश्या माध्यमातून पाण्याचा अतिरिक्त होणारा वापर थांबला,त्यामुळे पाण्याची बचत करण्यास स्थानिक नागरिक शिकले आता त्यांना आपल्या विहिरीतील पाण्यावरच पूर्ण हंगामात शेती करता येवू लागली.ठिबक सिंचन मुळे पाण्याची बचत तर झालीच पण त्यांच्या उत्पादन श्म्तेत वाढ झाली. व संपूर्ण देशात, पाणी व खते ठिबक सिंचनाच्या सह्याने थेंबा थेंबाने पिकांच्या मुळाशी पाण्याचे नियोजनबद्ध आखणी करण्यास  करण्यास देश पातळीवर या ठिबक सिंचन योजनेचा स्वीकार झाला.

 

         या माध्यमातून समाजाला व राष्ट्राला होणारा फायदा असा झाला की,ठिबक सिंचन केल्यामुळे खरच आपण पाणी वाचवू शकतो यांची शास्वती समाजाला झाली ठिबक सिंचन हि पाण्याच्या दबावाखाली चालणारी यंत्रणा असल्याने एका बाजूस १८० ते २२० फुटा पर्यंत अगदी बांधा पर्यंत आपण ठीबकच्या नळ्या आंथरू शकतो.त्यामुळे मजुराचा खर्च कमी झाला फवारणीसाठी किवां खते,कीटकनाशक,इतर फवारणीचे कामे सुद्धा ठीबकच्या साह्याने करता येऊ लागले. याचा फायदा असा झाला की,जमिनीची मशागत कमी प्रमाणात झाली,पिकामध्ये होणारे कुरण,गवताची वाढ कमी प्रमाणात झाली.त्यामुळे मशागतीचा खर्च कमी झाला. ठिबक सिंचन योजनेमुळे पिकांची वाढ ही निरोगी झाल्याने पिकांवर कीटकनाशक फवारणे चा खर्च कमी झाला.त्यामुळे पर्यावरणात पाण्यामुळे पसरविले जाणारे केमिकल्स पसरत नाही त्यामुळे पान्यादारे पसरले जाणारे रोग टाळता येतात.किवां त्याचे प्रमाण कमी करण्यात या ठिबक सिंचनाचा फार मोलाचा वाटा आहे. 

 

         कोणते नुकसान टाळता येईल उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. यासाठी पाणी शक्यतो पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी व संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर देणे संयुक्तिक ठरेल.कारण असे केल्याने पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही व पाणी वाया ण जाता पाण्याची बचत करता येईल.  

 

अभ्यास पद्धती

सदर प्रकल्प विषय “ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?” हा सर्वेक्षण संशोधन पद्धतीमध्ये मोडतो,या पद्धतीचा उपयोग करूनच पुढील माहिती मांडलेली आहे.

        जेव्हा आम्ही सर्वेक्षणासाठी पाहाणी कली असता असे दिसून आले की,शेती करीता पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्यापिक पद्धतीची निवड शेतकरी बंधूनी कलेली आहे.पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचे एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने नियोजनाचा वापर करण्यात आलेला दिसला. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी देण्यात आले. तसेच विहिरीतील पाण्याच्या पाण्याची उपलब्धतेनुसार लागवडी साठी पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी हे ठिबक सिंचन या तंत्राचा वापर करण्यात आला.

 


         उपलब्ध पाण्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे फार महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुळाच्या खाली झिरपून,तर जातेच तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून जमिनीमध्ये मुळाच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्याचा पिकाच्या वाढीसाठी काहीच उपयोग होत नाही. उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमरित्या उपयोग होण्यासाठी शेतात येणाऱ्या प्रवाहाची योग्य अशी वितरण व जमिनीचे सपाटीकरण हे फार महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

 

ठिबक सिंचन म्हणजे काय? –   ठिबक सिंचन म्हणजे काळ्या रंगाच्या नळीला तोट्या लावून पाण्याच्या नळीला प्रेशर देऊन पिकांच्या बुंध्याला तोट्या द्वारे मुळासी थेंब थेंब पाणी देण्याची पद्धत यालाच ठिबक सिंचन असे म्हणतात.

 

         ठिबक सिंचनचा शोध कोणी लावला.- ई.स.१९६० मध्ये इस्त्राईल सर शिमचा ब्लास यांनी ठिबक सिंचन या पद्धतीचा शोध लावला हि काळ्या रंगाची नळी असते त्यांना तोट्या बसविलेल्या असतात.काला रंग या साठी असतो कार्बन ब्ल्याक लावलेला असतो त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगावर सूर्याचां परिणाम होऊ नये म्हणून. 

           राज्य शासनाने या योजने करीता सबसिडी दिलेली आहे,प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही योजना आपल्या शेतामध्ये राबवावी जेणे करून पाण्याची बचत होईल. पारंपारिक पद्धतीने पिकांना दिले जाणारे पाणी की जे,पिकांना कमी व बेकामी जास्त प्रमाणात वाया जाते.त्यामुळे पाण्याची बचत होत नाही. 

निरिक्षणे

ठिबक सिंचन योजना या महत्वाकांक्षी अभियानामुळे निश्चितच भूजल पातळीत वाढ होत असून शेतीकरिता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध होत आहे. ठिबक सिंचन मधून सर्व प्रयत्नांचा परिपाक आज आपल्या समोर पाण्याची वाढलेली पातळी यामुळे दिसत आहे. जिल्ह्यातील ठिबक सिंचनाच्या कामामुळे या पावसाळ्यात मोठा खंड पडला तरी विहीरीच्या पाण्यावर एखादे ओलीत शेतकऱ्यांना करता येणे शक्य झाले आहे. त्याचे मुख्य कारण ठिबक सिंचनामुळे पिकांना आवश्यक असेल तेव्हढेच पाणी दिले जाते त्या मुळे पूर्वी जे अतिरिक्त पाणी वाहून जायचे त्या पाण्याची या मुळे विहीरीत साठवणूक करण्यामध्ये म्हणजेच पाण्याची बचत करण्यामध्ये त्याचा फायदा होतांना दिसत आहे.कमी पाणी जरी असले तरी शेती करता येऊ लागली.शेतकरी उत्पादन प्रक्रियेत पुढे आले व त्यांच्या आर्थिकदृष्ट्या असलेल्या अडचणी दूर झालेल्या दिसून येतात.

शासनाने ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणा अंतर्गत एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यासाठी तसेच टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पंच वार्षिक योजनेमध्ये 25 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आलेली आहे.


विश्लेषण

ठिबक सिंचन म्हणजे काय? –   ठिबक सिंचन म्हणजे काळ्या रंगाच्या नळीला तोट्या लावून पाण्याच्या नळीला प्रेशर देऊन पिकांच्या बुंध्याला तोट्या द्वारे मुळासी थेंब थेंब पाणी देण्याची पद्धत यालाच ठिबक सिंचन असे म्हणतात.

 

         ठिबक सिंचनचा शोध कोणी लावला.- ई.स.१९६० मध्ये इस्त्राईल सर शिमचा ब्लास यांनी ठिबक सिंचन या पद्धतीचा शोध लावला हि काळ्या रंगाची नळी असते त्यांना तोट्या बसविलेल्या असतात.काला रंग या साठी असतो कार्बन ब्ल्याक लावलेला असतो त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगावर सूर्याचां परिणाम होऊ नये म्हणून. 

           राज्य शासनाने या योजने करीता सबसिडी दिलेली आहे,प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही योजना आपल्या शेतामध्ये राबवावी जेणे करून पाण्याची बचत होईल. पारंपारिक पद्धतीने पिकांना दिले जाणारे पाणी की जे,पिकांना कमी व बेकामी जास्त प्रमाणात वाया जाते.त्यामुळे पाण्याची बचत होत नाही.  

पाण्याचे व्यवस्थापन व ठिबक सिंचन पद्धत –

सध्या पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून पिकांची निवड करणेही आवश्यक आहे. उदा.मक्याच्या पिकाला एकरी 5.5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते तर त्याच्या निम्म्या पाण्यात सूर्यफुलाचे पीक येऊ शकते. आपल्याकडे घेतली जाणारी ऊस, केळी अशांसारखी पिकेही प्रचंड प्रमाणात पाण्याची मागणी करतात. पाण्याची बचत करायची असेल तर अशा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारी पिके लावणे आणि त्यांचीही दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणारी वाणे वापरणे हाच उपाय शिल्लक राहतो. जमिनीतून पाणी शोषणे आणि सेंद्रिय पदार्थांची निर्मिती म्हणजेच पिकांच्या बाबतीत उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग या गोष्टीची कार्यक्षमता ठरताना पीक वनस्पतीच्या पानांचे एकूण क्षेत्रफळ, मुळांचा प्रकार आणि संख्या, खोडातील पाणी वहन क्षमता, पानांवरील पर्णरंध्रांची संख्या, पानांची प्रकाश ऊर्जा आणि हवेतील कार्बन वायू खेचून घेण्याची क्षमता इत्यादी घटक महत्त्वाचे असतात. पानांचे एकूण क्षेत्रफळ, खोलवर जाणारी किंवा उथळ असलेली मुळे यावरूनही कुठल्या पिकाला कमी पाणी लागेल हे ठरवता येते.

निष्कर्ष

ठिबक सिंचन योजने मुळे खालील फायदे दिसून येतात,या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे सर्व पिकांना सारखे पाणी दिले जाते.पाणी इतरत्र वाया जात नाही,पाणी जमिनीला जात नाही ते फक्त पिकाला दिले जाते,पिकांना ठरविलेल्या वेळापत्रकानुसार नियमित पाणी दिले जाते.त्यामुळे पिकांची वाढ जोमात होतांना दिसते.

       सिंचनामुळे पिकांच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी ,माती,हवामान यांचा समन्वय साधला जातो.पिकांना पाणी कमीत कमी वेगाने दिल्यामुळे ठिबक सिंचनाच्या या प्रक्रीयेमुळे पिकांची वाढ,त्यांची गुणवत्ता चांगली दिसून येते,त्याचा परिणाम शेतकरी बांधवाना दर्जेदार पिक उत्पादन घेता येणे शक्य झालेले आहे.

ठिबक सिंचनच्या माध्यमातून गर्जे नुसार देण्यात येणारे पाणी दिल्यामुळे पिकामधील किवां रोपातील हरितद्रव्य तयार करण्याची क्रिया खंडित होत नाही.उत्पादन वाढीची प्रक्रिया २०ते २०० टक्के पर्यंत जलद गतीने वाढून पाण्याचे पण नियोजन होते व त्या माध्यमातून पाण्याची बचतच होतांना दिसून येत.

ठिबक सिंचनामुळे क्षारयुक्त जमिनी मघ्ये याचा चांगला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो कारण पारंपारिक पद्धतीने दिलेले पिकांना पाणी यामुळे जमीनित मुरणारे पाणी त्यातून निर्माण होणारे क्षार हे जमिनी साठी धोकादायक असतात,परंतु ठिबक सिंचनामुळे जमीन खराब होत नाही उलट, जमिनीत क्षार असल्यावर सुद्धा पिके वाढतात व उत्पादन घेता येऊ लागले.

कोकणातील खाली वर असलेल्या जमिनची लेव्हल लागवडी खाली आणता आल्या,कोरड वाहू शेतजमिनीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिके घेणे शक्य झाले.यामुळे कोकण किनारपट्टी असलेल्या शेत जमिनीत ठिबक मुळे पिके घेता आली त्यामुळे तेथील नागरिक फार संतुष्ट झालेले दिसतात.

प्रकल्पाचे सादरीकरण –

विद्यार्थी मित्रानो प्रकल्पाचे सादरीकरण लिहित असतांना खालील बाबींचा उल्लेख करणे फार महत्वाचे आहे. ते पुढील प्रमाणे आपण लिहाल अशी अपेक्षा करतो,

प्रकल्पाचा विषय निवडल्या नंतर सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींची आवश्यकता भासली

आपण लिहित असलेला प्रकल्प जर ग्रुप प्रकल्प या स्वरूपाचा असेल तर,या प्रकल्पात आपल्याला मिळालेल्या ग्रुप सदस्यांनी प्रकल्प पूर्ण होईल तो पर्यंत कोणकोणती जबाबदारी पार पाडली गे नमूद करावे.

प्रकल्प लिहित असतांना आपल्याला आलेल्या समस्यांची माहिती आपण आपल्या विषय शिक्षकांनी सदर प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे माहितीच्या स्वरूपात मार्ग्दर्ष्ण केले या विषयी थोडीफार माहिती लिहिणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे कोणत्या प्रकारच्या समस्या आपल्या समोर आल्या या विषयी समस्यांचे निराकरण विषय शिक्षकांनी केले त्यांच्या विषयी आभार मानायला विसरू नका.?

विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अ आपण मिळविलेल्या माहितीच्या आधारे सर्व बाबींचा समावेश करून सदर प्रकल्प सादर करण्यात येत आहे हि शेवटची ओळ लिहायला विसरू नका.

 

प्रकल्प अहवाल

 

विद्यार्थी मित्रानो प्रकल्पाचा अहवाल सादर करणे हा प्रकल्प लेखनाचा अंतिम टप्पा आहे,हा अहवाल किमान चार पाने  असावा या वरूनच बाह्य परीक्षक आपल्या प्रकल्पाचे मूल्यमापन करीत असतात. एकंदरीत प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचा सारांश असतो या चार पाणी अहवाल लेखनामध्ये प्रकल्प लेखना प्रमाणेच सहा मुद्दे येतात.ते मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

1 प्रकल्पाचे नाव 

आज मी जो विषय प्रकल्प निवडीसाठी घेतलेला आहे.त्या विषयाचे नाव आहे ”ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का? असा आहे,

        ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे.या विषया संदर्भात जमिनीतील असलेले पाणी आपण विहिरीच्या माध्यमातून शेतातील पिकांना देतो त्याचा परिणाम असा होतो कि, ठिबक सिंचन नसल्यामुळे साधारण पणे पिकाला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ज्यास्त होत असल्याने,शतकरी बांधवाना पाण्याचे नियोजन करता येत नाही. जमिनीत जो पर्यंत पाणी आहे तो पर्यंत आपण त्याचा उपभोग घेतो व कालांतराने विहिरीचे पाणी संपते व शेतकरी बांधवाना तेव्हा पाण्याची मोठी गरज आपली पिके वाचविण्यासाठी लागते त्या वेळेस पाण्याचे महत्व कळते.विहिरीतील पाणी संपल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही शेतकरी बांधवांना तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना ठिबक सिंचन या विषयी माहिती मिळावी व त्या माहितीच्या आधारे या प्रकल्पाचे महत्व त्यांना कळावे या करीता सदर विषयाची निवड मी केलेली आहे.

2 उद्दिष्ट्ये 

या ठिबक सिंचन योजनेचा उपयोग केल्याने जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली जाते,त्यामुळे उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर ठिबक सिंचनची योजना करता येते. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.हे तंत्र सर्व शेतकरी बंधूनी वापरावे जेणे करून येणाऱ्या नवीन पिढीला या माध्यमातून पाण्याची बचत कशी करावी हे शिकायला मिळेल.

पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना  सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला दिले जाते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.त्यामुळे पाण्याची, विजेची,आणी मजुरांची टंचाईभासत नाही, त्याच प्रमाणे ठिबक सिंचन योजने मुळे होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो पैशाची बचत होते त्याचा फायदा हा शेतकरी बांधवाना होतो.म्हणून ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते.

 

3 अभ्यास पद्धत

सदर प्रकल्प विषय “ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?” हा सर्वेक्षण संशोधन पद्धतीमध्ये मोडतो,या पद्धतीचा उपयोग करूनच पुढील माहिती मांडलेली आहे.

        जेव्हा आम्ही सर्वेक्षणासाठी पाहाणी कली असता असे दिसून आले की,शेती करीता पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य पद्धतीची निवड शेतकरी बंधूनी कलेली आहे.तसेच विहिरीतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडी साठी पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी हे ठिबक सिंचन या तंत्राचा वापर करण्यात आला.

या प्रकल्पांचे सदरीकरण करीत असतांना, संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करताना मला या प्रकल्पासाठी पर्यावरण या विषयात प्राविण्य मिळविलेले माझ्या क्लास टीचर सौ./श्री. .........................   तसेच माझे विद्यालयाचे प्राचार्य श्री .....सर. यांनी तसेच माझ्या विद्यालयातील  इतर सरांनी या प्रकल्पासाठी मला मोलाची  मदत हा प्रकल्प बनविण्या करिता केली. पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचनप्रणाली कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन प्रणालीचाच उल्लेख करावा लागेल. तसेच या प्रकल्पासाठी माझ्या सोबत असलेल्या ग्रुप मधील ईतर मित्रांनी/ मैत्रिणी यांनी  जी मदत केली त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या प्रकल्पा साठी मला माझ्या सरांनी अनेक म्हत्वाची  पर्यावरण   विषयी काही पुस्तके अभ्यासासाठी दिली त्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

 

4 निष्कर्ष

औद्योगिकरणाच्या वाढीमुळे त्याच प्रमाणे वाढणाऱ्या उष्णतेमुळे वातावरणात बदल घडताना आपल्याला दिसून येत आहे,त्या बदलाचा परिणाम येणाऱ्या भविष्यकाळात पाण्याची कमतरता भासण्याचे संकेत आता पासूनच आपल्याला दिसू लागलेले आहेत

पावसाळ्यात पडणारा पाउस नेमका खरिपाच्या हंगामात हुलकावणी देताना दिसत आहे, काही ठिकाणी पाऊस कमी पडतो किंवा काही भागात तो मुसळधार पडतो. परंतु ठिबक सिंचन योजना अशाच वेळेस महत्वाची मानली गेली आहे की,कमी प्रमाणात जरी विहिरीला पाणी असले तरी पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा या प्रणाली मुळे समतोल राखला जातो.म्हणून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग करून पाण्याची बचत करणे,त्याच प्रमाणे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचन करताना पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देण्याचे अनियंत्रित वेळापत्रक यांमुळे अशी चांगली प्रणाली उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते.ती दूर केली पाहिजे.

 म्हणून सदर योजनेचा उपयोग हा पाण्याच्या उपलब्धतेनुसार वापराचे बदल करावे लागतील.त्यामुळे या केलेल्या नियोजनबद्ध केलेल्या बदलामुळे, उन्हाळ्यात पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणाऱ्या पाण्याची बचत करता येते. जर नियोजित पाणी देण्याचे तंत्र वापरले नाही तर,पाण्याची बचत होऊ शकत नाही.

        पाण्याचे प्रमाण कमी असतांना सुद्धा ठिबक च्या साह्याने ईतर फळ बाग म्हणजेच डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी पिके ठिबक सिंचनाद्वारे संध्याकाळच्या थंड वेळेत उघड्यावरील भाजी आणि फळपिकांना पाणी दिले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढू शकते आणि पाण्याच्या पाळ्या कमी होऊन पाण्याची बचत होऊ शकते.

5 उपाययोजना

पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचनप्रणाली सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी पिकाला दिले जाते व पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो.पाण्याची टंचाई, विजेची टंचाई आणि मजूरांची टंचाई ह्यावर ठइबक सिंचन शिवाय दुसरा पर्याय नाही.

महाराष्ट्रातील शेती ही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे व पावसाचे प्रमाण हे अनियमित असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नाही. त्याकरिता जेवढे पाणी उपलब्ध आहे. त्याचा काटकसरीने व योग्य उपयोग करण्याकरिता शास्त्रोत्क पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. केवळ पाणी नियोजन करून जमणार नाही तर पाण्याच्या उपलब्धते नुसार पिकांचे नियोजन करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यंदाच्या जलसंकटाला तोंड देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि कार्यकुशलतेने वापर करून पीक उत्पादन घेण्याचा आणि भविष्यात वाढणाऱ्या अशा प्रकारच्या संभाव्य संकटाची तिव्रता कमी करण्याचा प्रत्येक शेतकऱ्याने गांभिर्याने विचार केला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आपल्या अनुभवांप्रमाणे, निवडलेल्या पीक पद्धतीप्रमाणे आणि योजलेल्या सिंचन प्रणालीप्रमाणे विविध उपायांचा वापर केला तर त्यांच्याकडील पाण्याची पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होऊन पीक उत्पादनातील कार्यक्षमता टिकून राहील.

6 संदर्भ सूची

सबंधित विषयावर माहितीचा आढावा मिळवण्यासाठी मी व माझ्या मित्रांनी सदर प्रकल्प विषयाचे विभाग प्रमुख तसेच इतर तज्ञ व्यकी यांचे मार्गदर्शन घेतले.त्याच प्रमाणे ठिबक सिंचन योजना राबवीत असलेले साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.वेगवेगळ्या गोष्टीचा वापर केला .आमचे विषय शिक्षक त्याच प्रमाणे मुख्यध्यापक यांनी आम्हाला आमच्या विषयाची पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली त्यातील काही माहितीचा आम्ही वापर केला. या माहितीच्या माद्यमातून तसेच पाठ्यपुस्तकातील आभ्यास्क्मातील पर्यावरण या पुस्तकामधून मोलाची माहिती मिळाली,तसेच मला या विषया संबंधी विशेष मार्गदर्शन माझ्या शिक्षक वृन्दानी आम्हाला मोलाची माहिती दिली.त्या बद्दल सर्वांचे आभार. 

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम

 



“प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम”

प्रस्तावना :

 प्लास्टिक निर्माण किवां याचा शोध हा १९ व्या शतकात न्यूयार्क या देशाने लावला. करण्यासाठी जे रसायन वापरले त्याचे नाव आहे, बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर करूनच प्लास्टिक बनविले जाते. आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय.पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत.

विषयाचे महत्व :

                    स्वस्तात मिळत असल्याने व जवळच याची निर्मिती होत असल्यामुळे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल जागतिक पातळीवर घसरत म्हणजेच बिघडत आहे.शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यावर सुद्धा काही व्यापारी वर्ग बिनदिक्कत पणे याचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहे.  सना सुदिच्या वेळी व्यापारी आपला माल,वस्तूत्याच प्रमाणे खाद्य पदार्थांची पॅकींग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात.मोकळ्या जागेवर अस्ताव्यस्त पसरल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याचा परिणाम सभोतालीअसलेल्या परिसरातील लोकांवर त्याचा गंभीर आजाराचे परिणाम दिसत आहे. 

          प्लास्टिक वर बंदी घालून याचा कोणताच फायदा जनतेमध्ये झाला नाही,परंतु   फायदा मात्र व्यापाऱ्याचा  झाला.कारण प्लास्टिक उत्पादन वाढत असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात या प्लास्टिकचा  वापर होतांना दिसत आहे.यांचाह अर्थ प्लास्टिकवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील व जनते मघ्ये या विषयी जन जागृती करून प्लास्टिक पासून येणाऱ्या भविष्य काळातील धोक्या विषयी लोकाना जागृत करणे फार महत्वाचे आहे.        

विषयाची निवड :

सदर विषय हा शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील आहे ,हा विषय संकलनासाठी असल्यामुळे मला माझ्या आवडीचा विषय “ प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम “ पर्यावरण अभ्यासाविषयी विषयी असल्यामुळे मी हा सेमिनार म्हणून निवडलेला आहे .

 

विषय निवडीचे उद्दिष्ट्ये :

सदर विषय पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित असून त्यातून प्लास्टिक पिश्व्यापासून प्रदुषणाचे  विविध घटकांमधील आंतर संबध व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, या विषयाची निवड करताना पर्यावरण क्षेत्रातील तज्ञाननचा या विषयावरील अभ्यास ,चिकित्सा सर्वांनी अभ्यासली पाहिजे  त्याच प्रमाणे  मी  “प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम “हा विषय निवडला आहे, या विषया संबधी जागृती यावी व त्याचे पुढील भविष्य कालीन पिढीला योग्य मार्गदर्शन व्हावे जेणे करून विकासा संबधी प्रश्नाची उकल करण्यासाठी तयार असणारे उत्तम नागरिक तयार करणे हे या मागील उद्दिष्ट्ये आहे.

 

विषयाचे सादरीकरण :

             प्लास्टीक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक पासून तयार झालेल्या द्रोण,वाट्या,ग्लास,चापिण्याचे कप,विविध प्रकारचे,जेवणाचे ताट,प्लास्टिक डबे,ईतर अनेक वस्तू आपल्याला दिसून येतात. अल्प काळासाठी या वस्तूंचा समारभ पुरता उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली.

               मात्र, बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. पण चॉकलेटचे वरचे वेस्टन,अनेक प्रकारचे नमकीन,लहान मुलांचे बिस्कीट,विविध प्रकारचे मसाला पाऊचमध्ये,तेल देखील पाउच मध्ये,मिळते त्याचा परिणाम अनेक पदार्थांच्या पॅकींगमध्ये येत असलेल्या प्लास्टीक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरुन पॅकींग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही.

           या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टीक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मृत पावल्या आहेत. तर काही प्लास्टीक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.

             शासनाने प्लास्टीक पिशव्यावर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टीक पिशव्यांना यातून वगळण्यात आलेले आहे. या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकींग टिकावू दर्जेदार प्लास्टीक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकींगचे प्लास्टीक बदलून कागद मिश्रित प्लास्टीकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत आहे. मात्र संबंधित विभागाने काही व्यवसायिकांना प्लास्टीक पिशव्यांच्या वापराची मुभा दिली असल्यामुळे पर्यावरणासह नागरिकांनाही त्रास सहन करावे लागत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा श्वासच कोंडल्याचे चित्र आहे.       

पर्यावरणावर झालेला परिणाम :

          प्लास्टिक वजनाने हलके व वापरण्यासाठी सोपे झाल्याने लोकांचा कल या कडे जास्त झुकलेला आपल्याला पहावयास मिळतो.नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आता सोबत कापडी पिशवी नेण्याची सवय राहिली नाही.जो तो,निघतो सरळ मार्केट मघ्ये जातो हवे ते घेतो व भरपूर प्रमाणात प्लास्टिक आपल्या घरी घेऊन येतो,त्यानंतर या पिशव्या जेव्हा खाली होतात तेव्हा इतर सर्व मोकळ्या जागेत हवेने पसरलेल्या आपल्याला दिसतात,काही गटारीच्या मघ्ये जाऊन अडकता.काही गुरे खातात.तर काही सर्व परिसरामध्ये पसरतात.

         जल वाहिन्यामघ्ये अडकून अनेक जलमार्गउदा.पाईप,ड्रेनेज,गटारी,बंद होतात.अ त्याचा परिणाम पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणी या तून पास होतनाही त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये हे घाण पाणी शिरते.नदी नाल्यांना पूर येतात,नालेच जर या प्लास्टिक मुळे बंद झाले तर पाणी जाणार कोठून,या पाण्यामुळे परिसरात रोगराईचे प्रमाण वाढते,परिसरात दुर्गंधी पसरते,त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.  

            पावसाच्या पाण्याबरोबर नदी,नाल्यांच्या मार्गाने सर्व प्लास्टिक हे समुद्रात फेकले जाते.त्यामुळे समुद्रामध्ये प्लास्टिकचे माहाकाय बेटे निर्माण झाली, जल प्रदूषण झाले,त्यामुळे समुद्रातील अनेक माशे,जलचरप्राणी आपल्याला नाहीसे झालेली दिसून येतात.जगातील पशू पक्षी त्याच प्रमाणे गुरे यांच्यावर याचा गंभीर परिणाम झाला.चारा नसल्यामुळे ते प्लास्टिक पदार्थाला चिटकलेला अन्नधान्य यामुळे प्लास्टिक खातात त्यामुळे अन्नधान्य कमी व प्लास्टिक जास्त प्रमाणात त्यांच्या पोटात जाते त्यामुळे जनावरांचे आयुष्यमान कमी झाले व त्यांना वेगवेगळ्या आजारामुळे मृत्युमुखी पडावे लागत आहे.याचा परिणाम असा झालेला आहेकी,समुद्रामघ्ये प्लास्टिक फार मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसते,त्याच प्रमाणे जमिनीवर सुद्धा हाच प्रकार आपल्याला बघायला मिळतो.

           प्लास्टिक विशव्यांचा वापर हा लोकांच्या वापराचा अविभाज्य भाग झालेला आहे तो सहजा सहजी बंद होणार नसल्याचे दिसून येत आहे,किंबहुना पृथ्वी वरील हे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे.प्लास्टिक हे मानवाने निर्माण कलेले आहे ते घातक आहे हे त्यास माहिती आहे,परंतु तेच प्लास्टिक इतर अन्य प्राण्यांची जीवन यात्रा संपवत आहे याकडे मानवाचे लक्ष्यवेधी कधी होणार हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो.

            या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.

            शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या कच-याचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो.

              याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार र्वष लागतात. खरं तर प्लास्टिक पिशव्यांच्या जन्मापूर्वी मनुष्य इतर प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचा आवरण किंवा थैली म्हणून उपयोग करत होता. परंतु प्राणीहत्या व निसर्गाचा नाश थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला तो आजतागायत. तो इतका वाढलाय की जणू त्यानेच आपल्याला विळखा घातलेला आहे.

निष्कर्ष :

            प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो, प्लास्टिकचे हे प्रदूषण केवळ भूभागापुरते मर्यादित नसून ते सागरातही मोठय़ा प्रमाणावर आहे असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. दरवर्षी ८८ लाख टन प्लास्टिक जगातील महासागरांमध्ये येते व त्याचे प्रमाण अंदाजापेक्षा खूपच जास्त निघाले आहे असे सांगण्यात आले. जॉर्जिया विद्यापीठातील पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापक जेना जॅमबेक यांनी हा संशोधन निबंध सादर केला असून त्यांनी म्हटल्यानुसार सागर किनारी प्रत्येक फुटावर साधारण पाच धान्याची पोती भरतील इतके प्लास्टिक जगातील किनारपट्टीवर आहे. विकसनशील देश हे या प्लास्टिक प्रदूषणास जबाबदार असून प्लास्टिकचा हा भस्मासूर रोखला गेला नाही तर इ.स. २०२५ पर्यंत महासागरांमध्ये १७० दशलक्ष टन प्लास्टिक साठेल असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.


प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवावं :  यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे. या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व तितकाच पर्यावरणाला धोका पोहोचवण्याची वेळ टाळता कशी येईल हे देखील पाहिलं जातं. तसंच पिशव्या गोळा करून त्यांचं पुनíनमाण करून त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात १ बिलियन टन इतकं प्लास्टिक निर्माण झालं व आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच हे उत्पादन पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याची नोंद सायंटिफिक अमेरिकनया संशोधन मासिकानं केली आहे.

समारंभात प्लास्टिकच्या वापर : समारंभ कोणताही असला तरी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर हा वेळे पुरता लोक करताना दिसतात वापरा व फेकून द्या ही वृत्ती आता बंद केली पाहिजे.व लग्न समारंभात कायम टिकणारी स्टील,पिटली,ताब्याची,भांडीकुंडी वापरायला सुरुवात करायला पाहिजे.

सामाजिक संस्थानी सहभागघ्यावा : आता अनेक सामाजिक संस्थाने त्याच प्रमाणे शासन आपल्या स्तरावर  सर्वच देशांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घातलेली आहे. यामध्ये भारतासह अनेक देशांचा समावेश आहे. प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी असलेल्या प्रदेशात प्लास्टिकची पिशवी वापरल्यास दंड आकारला जातो. हा दंड प्रत्येक देशात वेगवेगळा आहे. दंड आकारण्याच्या नियमानंतर काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं. तसंच यामध्ये पर्यावरणवादी व काही गरसरकारी सामाजिक संस्थानी केलेल्या लोकप्रबोधनाचाही मोठा वाटा आहे.

प्लास्टिक वापरावर जास्तीचा कर लावणे : म्हणजे प्लास्टिक पिशवी वापरायचीच असल्यास ती कर भरून वापरावी. कारण अनेक उद्योग व संस्थांना प्लास्टिक पिशव्यांची वेष्टन इ.करिता गरज असते. या करामुळे लोकांनी प्लास्टिक पिशवी वापरण्याची गरज का आहे या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. विनाकारण कर का भरावा म्हणून लोकांनी मग प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केला. या उपायामुळेही प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाली.

कापडी /कागदाची पिशवी : आज आपल्याकडेही छोटी छोटी गावं व शहरं पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणताना दिसत आहेत. त्याजागी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. लोकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मॉल, मोठी दुकानं इ.सारख्या अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी हवी असल्यास वेगळी किंमत भरून घ्यावी लागते. यामुळे त्यांच्या वापराचं प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे. ज्यांचं जैविक विघटन शक्य होतं. अशा पिशव्या वापरण्यासाठी अनेक देशात नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे.

जास्त प्रमाणातील निर्मिती थांबवावी : प्लास्टिक हे जाड असो की बारीक याचा पर्यावरणावर जो परिणाम होणार आहे तो कोणीही थांबवू शकत नाही या उलट जे व्यापारी आपले कारखाने रात्रंदिवस चालवून जास्तीचे प्रमाणात प्लास्टिक ची निर्मिती करतात अशांवर अंकुश लावणे फार म्हत्वाचे आहे.जेणे करून पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आपण कमी करू शकतो.

आपण काय करायला पाहिजे : प्रवासाला जातांना पाणी पिण्या करता प्लास्टिकची बाटली न घेता एखदी स्टीलची बाटली जवळ ठेवावी जेणे करून तीच बाटली आपल्याला पुन्हापुन्हा प्रवासात कामी येईल.बाजारात जाताना कापडी पिश्विचाच वापर करा.व त्यात वस्तू घेताना सुद्धा वस्तू ही प्लास्टिक पिशवी मध्ये घेवू नका.जेवणाचे पार्सल घेण्याचे असल्यास घरूनच एखादी स्टीलचा दबा घेऊन जावा. नारळपाणी, सरबत, थंड पेय पिताना प्लास्टिक स्ट्रो चा वापर करणे टाळा.मुलांचे शाळेचे डबे घेताना स्टीलचे घ्यावे.कडधान्य खरेदी वेळी ते सुती बारदान यामध्येच घेण्याचा प्रयत्न करा.व ते धान्य साठवून ठेवण्या साठी लोखंडी कोठीचा वापर करा. फ्रोजन पदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेली असतात म्हणून त्यांचा वापर टाळावा.किचनमध्ये इतर मसाल्याचे पदार्थ,खाऊ ठेवण्याकरिता स्टील किवां आल्युमिनीअम च्या भांड्यांचा वापर करावा.घरातील प्लास्टिकच्या बनलेल्या शोभेच्या वस्तून घेता त्यावर पर्यायी व कायमस्वरूपी टिकणारी स्टील,पितळी,तांब्याची,कांस्य या पासून बनविलेल्या वस्तूंचा आपल्या घ्रामाघ्ये उपयोग करा.व सर्वात महत्वाचे म्हणजे प्लास्टिक पिशवी पासून पृथ्वी वरील  पर्यावरणाला व त्याच प्रमाणे परिसराला यापासून होणाऱ्या नुकसानीची लोकाना माहिती द्या जेणे करून जन जागृती होईल व प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम थांबवन्यास आपला हातभार लागेल.


प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...