गुरुवार, २ जानेवारी, २०२०

वन्य प्राण्यांची घटती संख्या कारणे व उपाय




वन्य प्राण्यांची घटती संख्या कारणे व उपाय
























प्रस्तावना

 

                        आपल्या भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना विशिष्ट स्थान देण्यात आलेले आहे. मानवी जीवनाइतकेच वन्यजीवन ही पुरातन आहे. पण आता मानवाचा निसर्गाशी असलेला हा संबंध दुरावल्याचे दिसते लोकसंख्यावाढजंगलतोडऔद्योगिकीकरणप्रदुषण यासारख्या कारणांमुळे जंगले नष्ट झाली. पर्यायाने तेथील समृध्द वन्यजीवनही मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आले. ज्या प्रजाती बचाव करण्यास असमर्थ ठरल्या त्या पूर्णपणे नामशेष झाल्या काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीवन आणि मानवी जीवन यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. असे असले तरी ही या समृध्द नैसर्गिक जीवसृष्टीतील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच वन्यजीवन धोक्यात आले आहे. भक्ष-भक्षक अशा साखळ्यांमध्ये वनस्पतीशाकाहारी प्राणीमांसाहरी प्राणी असे सर्व जीव आवश्यक आहेत अन्यथा एक जरी नष्ट झाला तरी दुसरा आपोआपच नष्ट होणार आहे.

प्राचीन काळी ऋषीमुनींकडून ही वन्यजीवांना अभय दिले जात असे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्येवेदांतही पशुसंरक्षणाची महती सांगितली आहे. गौतम बुध्द व भगवान महावीर यांची ही प्राणीमात्रांवर दया करण्याचीच शिकवण आहे. पूर्वी घनदाट अरण्ये असल्यामुळे ही वन्यजीवांचे आपोआपच रक्षण होत असे. पण हळूहळू मोठ्या प्रमाणावर होणार्‍या जंगलतोडीमुळेवन्यजीवांचे अधिवास संपुष्टात आल्याने वन्यजीवन ही धोक्यात आले. वन्य प्राण्यात मानवाचे गुंतलेले हितसंबंध लक्षात घेवून आज विविध संघटनापर्यावरणप्रेमी संस्था वन्य प्राण्यांच्या संरक्षणजतन व संवर्धनावर भर देत आहेत.

एकीकडे शासन वन्य जीवांच्याधोक्यात असणार्‍या विविध प्रजातींना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करीचोरटी शिकार दुसरी समस्या उभी करीत आहे. वन्यजीव ही एक अनमोल नैसर्गिक संपत्ती आहेतिचा जर आपण असाच अपव्यय करीत राहिलो तर त्यापासून होणार्‍या फायद्यासही आपणास मुकावे लागेल. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील अनेक सस्तन प्राणी आणि पक्षांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. इतकेच नव्हे आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ ही आज संकटग्रस्त आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु ही धोक्यात आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून शासनातर्फे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये घोषित करण्यात आलेले आहेत. वन्यजीवन आणि त्यांचे पर्यावरण यांच्या अभिवृध्दीसाठी अनुकूल प्रदेशाला राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य म्हणून घोषित केले जाते.

                                    पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश राष्ट्रीय उद्याने स्थापनण्यामागे आहे पण आज तो ही तितकासा सफल होतांना दिसत नाही. अशा पार्कस्ना भेटी देतांना आपण काळजी घ्यावीकायद्याचे पालन करावेप्रदुषण रोखणे हे देखील त्यासाठी आवश्यक आहे. पक्षी व प्राणी सुरक्षित व प्रदुषणमुक्त स्थळच प्रजननासाठी निवडतात. तसेच नसेल तर त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होवून ते धोक्यात येतात. काही वेळा ते स्थलांतर ही करतात परिणामी जंगलातील अन्नसाखळी ही धोक्यात येते. विपरीत परिस्थितीत टिकून राहणे अवघड झाल्याने अनेक वन्य जीवांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

 

विषयाची निवड

 

वन्य प्राण्यांच्या शिकारींवर आज बंधने असलीतरी काही वर्षांपूर्वीपर्यंत या शिकारी खुलेपणाने सुरू होत्या. राजे-महाराजांच्या काळात तर शिकार हा छंद म्हणून जोपासला जात असे. समूहाने शिकारीचे कार्यक्रम ठरत आणि उत्कृष्ट शिकार करणाऱ्या सैनिकाचा सन्मानही होत असेपण हौस म्हणून होणाऱ्या या शिकारी कधी हव्यासाच्या आहारी गेल्याते कळलेच नाही. अखेर वन्य प्राण्यांची घटती संख्या आणि निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे दुवे निखळण्याच्या भीतीने कायद्यानेच शिकारींवर बंदी आणावी लागली. माणसाप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्यच होतापण या कायद्याला आज सहा दशके उलटलीतरी दिवसाढवळ्या वन्य प्राण्यांच्या शिकारी सुरू आहे या विषयाचे गांभीर्य माझ्या शालेय विद्यार्थी याना व्हावे म्हणून मी सदर विषयाची माझ्या प्रकल्प विषया ने केलेली आहे.

ऋण निर्देश

वन्य प्राण्यांची घटती संख्या कारणे व उपाय.हा माझा विषय आहे ,महाराष्ट्र उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे आम्ही सर्व आभारी आहोत ,करण त्यांनी २०१६ २०१७ ह्या शेक्षणिक वर्षापासून आम्हा सर्वं ११वि आणि 12 वि च्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आमलात आणला ,वेगवेगळ्या प्रकाशनातील पर्यावरण शिक्षण पुस्तक बोर्डाने मंजूर केले .या पुस्तकाना विध्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्गांनी उदंड प्रतिसाद दिला .यामुळे आपले आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकलो,तसेच आम्हाला शाळेतील पर्यावरण ह्या विषयाची ओळख आम्हाला कऋण दिली त्या बद्दल ,तसेच हा विषय तयार करून देण्यात माझ्या वर्ग विषय  शिक्षिक श्री. गिरासे सर यांचे मला म्हत्वाचे अनमोल सहकार्य मिळाले तसेच माझ्या मित्रांनी/माय्त्रीनिनी ,पालकांनी ,सहकार्य दिले ,पर्यावरण विषयाची ओळख मला या माध्यमातून करून दिली त्याबद्दल,तसेच आम्हाला 11 वी आणि  12 वि या नवीन वर्षाचे पर्यावरण पुस्तकाचे आणि त्याच्या बरोबर प्रायोगिक भूगोल इयत्ता 12 वि या पुस्तकाचे सहकार्य मिळाले .विशेष आभार मानायचे तर ते ,आमच्या शाळेच्या प्राध्यापकाचे तसेच प्रच्याय श्री आर.बी.पाटील सरांचे कारण त्यांच्याच प्रयत्नांनी आम्हा सर्व मुलाना पर्यावरण विषय करण्यास संधी देऊन ,आम्हा सर्वांना स्वतःला सिद्ध दाखविण्याची संधी दिली त्या बद्दल फार आभार.

विषयाची उद्दिष्ट्ये

पर्यावरण रक्षणवन्य प्राण्यांचे संवर्धन पर्यायाने वनसंरक्षण हा सध्या ऐरणीवर आलेला प्रश्‍न. शेती व शहरीकरण यामुळे घटत चाललेली वनक्षेत्रेवनांवरील मानवी आक्रमणवन्य संपत्तीचा र्‍हासत्यातून वन्य प्राण्यांची होणारी उपासमार आणि मग या जीवांचे मानवी वस्तीवर आसरा घेताना अथवा भक्ष शोधताना होणारे मानवी वस्तीवरील आक्रमण’. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा प्रश्‍न प्रामुख्याने भेडसावत आहे. माणसाच्या जीवनाचे मोल तर आहेचपण पाणी आणि भक्ष्य यांच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेणारी ही मुकी जनावरे मात्रमाणसांच्या सशस्त्र हल्ल्यांची शिकार झाल्याचेही आपण जेव्हा ऐकतोतेव्हा आपलाही जीव तळमळतोच. निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक जीव महत्वाचा. ही साखळी अबाधित ठेवण्याची जाणीव तर वाढतेच आहे;

अभ्यास पद्धती

भारत देशात वनसंपदेची खाण आहे. वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान असून त्यांनासुद्धा मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे. पशु-पक्ष्यांची अनेक दुर्लभ जाती समृद्ध वनात आहेत. परंतु काही समाजकंटकांमुळे वन्य प्राणी धोक्यात आले आहे. त्यांचे रक्षण ही काळाची गरज आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला आहे.वाढती लोकसंख्याअवैध शिकारऔद्योगिकरण व प्रदूषणामुळे पशु-पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन करणेआपणही जगा आणि जगू द्या’ यानुसार प्राणीमात्राबद्दल दयाभाव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.भारतासारख्या निसर्ग उपासक देशात मुक्या पशु-पक्ष्यांची शिकार अनेक वर्षापासून सुरू आहे. समुद्ध वनांतील गौरवरंगीबेरंगी पक्ष्यांची शिकार होत असून बाजारात विकायला आणतात. या पशु-पक्ष्यांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. कावळेचिमण्यागिधाड यांची संख्या अल्प झाली आहे. हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. मानवविना पक्षी जिवंत राहू शकतीलपण पक्ष्यांविना मानवाला जगणे कठीण जाईल.जंगलात पाण्याविना आणि शिकाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे. वाढती उष्णता व आगीमुळे वनातील प्राणीवन्यजीव गावांकडे किंवा शहराकडे धाव घेतात. रस्त्यावरील दुर्घटनेत आपले नाहक जीव गमावतात. पाण्यात विष टाकून व विद्यत प्रवाहाने प्राण्यांचा जीव घेतला जातो. याबाबत जनजागृतीची गरज आहे. राष्ट्रांच्या या अनमोल संपत्तीला आज वाचविण्यासाठी अत्यंत गरज आहे. पृथ्वीवर राहायला जागा नसेल म्हणून मुक्या प्राण्यांचे लचके तोडणेत्यांची शिकार करणे हे थांबले पाहिजे नाही तर भविष्यात निसर्ग आपत्ती व महासंकटांशी सामोरे जावे लागणार आहे. हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने न बघताया सर्वात आपला सक्रिय सहभाग घ्यावा लागेल.निसर्ग संरक्षणाबरोबरच प्राणी व वन्य जिवांचेही संरक्षणाकरिता जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांचे रक्षण केले तरच आपले व पुढील पिढींचे भवितव्य सुरक्षित राहील. दि.१ ते ७ आॅक्टोबर विश्व वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनजागृतीत सर्वांनी सहभाग घेणे महत्त्वाचे आहे.

 

महत्व / हेतू

 

आज माणूसच वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्वाची आहे

आपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणीपक्षीकीटक,वृक्ष यांची विविधता खरोखरीच थक्क करणारी आहे.अगदी आजही त्यांच्या नव्या जाती सापडत आहेत! आपण निसर्गाची सतत कत्तल करून त्यांचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत आलो आहोत.पण खरी गोष्ट अशी आहे की ते जगले तरच आपण जगू ! १९७० च्या सुमारालावन्यप्राणी म्हणजे कोणते रे भाऊअसा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते. कारण वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे  कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला.

 

माहितीचे संकलन व सादरीकरण

 

वन व वन्यप्राणी यांचे संरक्षणसंवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनमुबलक पाणीआणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेलेडोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवेसांबररानडुक्करलंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापित्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केलेगेले पाहिजे .यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होईल.

वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.

वन्य जीव रक्षणाच्या पद्धती : भारतात सम्राट अशोकांच्या काळापासून (इ.स.पू. तिसरे शतक) वन्य जीव रक्षणाची जाणीव होती. त्यांनी आपल्या पाचव्या स्तंभांवर वटवाघळेमाकडेगेंडे,साळीवृक्ष खारोट्या इत्यादींची शिकारू करू नये व जंगलात वणवे लावू नयेतअसे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते व हे इतिहासातील पहिले कायदे होत. कौटिलीय अर्थशास्त्रात वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ अभयारण्ये असावीत याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद आणि इतरवेदांतही त्यासंबंधी उल्लेख सापडतात.  

इ. स. १८८०-९०या काळात पश्चिमात्य देशांनी व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी यासंबंधी कायदे करून राष्ट्रीय उद्यानेसंरक्षित नैसर्गिक प्रदेशअभयारण्ये इ. निर्माण करून वन्य जीवांना संरक्षण आणि मानवाला ज्ञान व मनोरंजन मिळवून दिले. त्याचबरोबर त्यांपासून आर्थिक लाभही पदरात पडून घेण्यास सुरूवात केली.  

भारतात १८८३साली ाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीची स्थापना झाली. वरील बाबींमध्ये भारत सरकारने काही कायदे केले व राष्ट्रीय वननीती तयार केली व एक केंद्रीय वन्य जीव रक्षण मंडळ’ नेमले वरीलप्रमाणे कायदे राज्य शासनांनी करून त्यांची अंमलबजावणी करावीअसे आवाहन केले. भारतात सर्व राज्यांत पशू संरक्षण व संवर्धन यांबाबतीत समान कायदे नसलेतरी थोड्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्याचेच फळ म्हणून महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पकर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पआंध्र प्रदेशातील मगर संवर्धन प्रकल्पओरिसातील सागरी कासवांचे प्रजनन व संरक्षण असे निरनिराळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 

वन्य जीवांच्या संरक्षणाच्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार व्हावयास हवा. त्यात आर्थिकशास्त्रीयसांस्कृतिकधार्मिक,सौंदर्यविषयक व सर्वांत महत्त्वाचा म्हणजे विकासात्मक बाबींचा समावेश होतो. आर्थिक बाबींचा विचार करताना मासेमारी,देवमाशांची शिकार व अन्य प्राण्यांपासून मिळणाऱ्या वस्तू या गोष्टी विचारात घ्यावयास हव्यात. आधुनिक साधने उपलब्ध झाल्यामुळे माशांची संख्या घटू लागली. त्यावर निर्बंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती (आयोग)स्थापण्यात आली. १९०१मध्येच शिकारीचे व इतर मासे यांच्यासंरक्षणार्थ कायदे करण्यात आले. त्यांत माशांबरोबर रानटी प्राणीपक्षी यांचाही समावेश केला. ठराविक लांबीपेक्षा कमी लांबीचे देवमासेतसेच पिले व माद्या मारण्यावर बंदी घातलीविशिष्ट ऋतूत व संरक्षित क्षेत्रात शिकारीस बंदी घातलीमाकडांचा उपयोग प्रयोगशाळांत माणसावरील औषधाचा परिणाम पाहण्यासाठी केला गेला. कस्तुरी मृगापासून मिळणारी कस्तुरी अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाते. तसेच वाघची चरबी संधिवातावर उत्तम औषध म्हणून गणली जातेम्हणून त्यांची हत्या होते. यामुळे त्यांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.  

भारतातून नाहीशा झालेल्या व नाहीशा होण्याच्या मार्गाव असलेल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने पुढील जीवांचा समावेश होतो :(काळे हरिण, (चौशिंगा, (बारशिंगा, (कस्तुरी मृग, (जंगली म्हैस, (गवा, (गोरखूर (रानटी गाढव), (गेंडा,  (सिंह, (१०चित्ता, (११हंगुळ. १९५९-६०मध्ये भारत सरकारने ओरिसा व बिहारमध्ये प्रत्येकी एक उद्यान उभारलेतसेच महाराष्ट्रात व राजस्थानात एकएक अभयारण्य उभारले. १९८८९०पर्यंत भारतभर शंभरापेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने उभारण्यात आली होती. 

वन्य जीवांविषयीचे प्रश्न एखाद्या राष्ट्रापुरतेच मर्यादीत नाहीतहे तज्ञांच्या अधिकाधिक ध्यानात येऊ लागले आहे. उदा.सध्या सर्व जगाला भेडसाविणारा सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे झपाट्याने होणार उष्ण कटिबंधी वर्षावनांचा नाशहा होय. १९८०९०दशकाच्या मध्यास दरवर्षी सु. १,५५,०००चौ. किमी. क्षेत्रातील किंवा ऑस्ट्रेलियाच्या सु. दुप्पट क्षेत्रातील वने तोडली जातहोती. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या लक्षावधी जाती त्यामुळे नष्ट होत होत्या. कारण त्या अन्यत्र कोठे जगू शकणार नाहीत. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वॉर्वलरहळदू व इतर पक्षी उन्हाळी हंगामात समशीतोष्ण कटिबंधातील जंगलात व शाद्वलांमध्ये राहतात व दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वर्षावनांत घालवितात.  

परिस्थितिवैज्ञानिक क्षेत्रीय अध्यन : अनेक आश्रयस्थाने व राष्ट्रीय उद्याने यांमधील जातींचा ऱ्हास झाल्यामुळे त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे लक्ष त्या समस्यांशी संबंधित बाबींकडे वळले आहे. मूलतः सृष्टिसौंदर्य टिकविण्यासाठी व काही महत्त्वपूर्ण जातींना आश्रय देण्याच्या हेतूने बहुतांश संरक्षित प्रदेश राखून ठेवलेले आहेत. हे आता लक्षात आले आहे कीसंपूर्ण परिस्थितिवैज्ञानिक प्रणालीत वनस्पतीप्राणी व सूक्ष्मजीव यांचे समूह मृदाखडक व पाणी यांच्या अजैव प्रणालीत किंवा प्रणालीवर जगत असतात. आजकाल एकूण प्रकल्पाच्या वन्य जीव व्यवस्थापनाचे महत्त्वाचे साधन ठरणाऱ्या सविस्तर क्षेत्रीय अध्ययनाचा आस्थापनेत सामान्यतः समावेश करतात. आपल्या परिस्थितीवैज्ञानिक प्रणालीतील अन्य घटकांशी दुर्मिळ किंवा विलुप्ती भवनाच्या मार्गावर असलेल्या जाती कसे वर्तन करतातयाचे शास्त्रज्ञ अध्ययन करतात. अशा सर्वेक्षणात एखाद्या प्राण्याचा उपकरणांच्या मदतीने माग काढणे व संगणकाच्या साहाय्याने त्यांची संख्या पडताळणे ह्या अत्याधुनिक तंत्रांचा समावेश होतो. 

 

क्षेत्र निवड

 

काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदू संस्कृतीनुसार मंदिरांच्या आवारात या कासवांची पूजा केली जात होतीपण आज ही कासवे चवीने खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या कासवांना घरात पाळणे शुभ असतेत्यांचे मांसअंडी खूप चविष्ट असतातत्यांना खाल्ले तर दीर्घायुष्य लाभते... अशा विविध कारणांमुळे आतंरराष्ट्रीय काळ्या बाजारात कासवांना प्रचंड मागणी आहे. त्यांच्या खरेदी-विक्रीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शिकारींमुळे दुर्मिळ होत असलेली स्टार कासवेकाळ्या ठिपक्यांची कासवेसागरी कासवे (ऑलिव्ह रिडले) यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या पुढाकाराने अलीकडे २३ मे हा दिवस 'कासव संवर्धन दिनम्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीदेखील जगभरातविशेषतः सागरकिनाऱ्यांवरील देशांमध्ये या निमित्ताने उपक्रम राबवण्यात आले. त्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आलातो 'ट्रॅफिकया संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून. बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या साखळीतून संस्थेने गेल्या तीन वर्षांत पंधरा महिने केलेल्या कारवाईत काळ्या ठिपक्यांची तब्बल दोन हजार कासवे पकडल्याची माहिती जाहीर केली आहे. 'ट्रॅफिकही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना असूनवन्य प्राण्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठीच ही संघटना काम करते आहे. 

संस्थेच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात कलकत्ता येथील सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५० कासवांची तस्करी पकडली आहे. बांगलादेशपाकिस्तानभारत या देशांमधून कासवांची सर्वाधिक तस्करी होत असूनती बँकॉकहाँगकाँग यांसह पूर्व आशियायी देशांमध्ये पाठवली जात असल्याची माहिती संघटनेला सर्वेक्षणातून मिळाली आहे. भारतामध्ये मुंबईहरिद्वारअलाहाबादबिहारढाका या भागांतून कासवे पुरवली जात असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

 

निष्कर्ष

पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोडवाढते शहरीकरणपशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो ! ही परस्थिती बदलण्यासाठीचे या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहेत. भारतात १९५२ वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत. खरे तर कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर ( अधिवासावर) शेतीरस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव- वन्यजीव असा लढा उद्भवतो. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहेकारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ ’ ची स्थापना पूर्वीच केली आहे.

 

सूचना

 

जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहितीमार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावाज्यामुळे त्यांच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा.

उपाययोजना

पर्यावरणाचा हा समतोल साधण्यासाठी प्रत्येक स्तरावर- व्यक्तीसमाजसंस्था व शासन यांनी सामुदायिकपणे जबाबदारी स्वीकारायला हवी. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील शासकीय संस्थांनी सर्वसमावेशक अशी पर्यावरणनीतीर व त्यासाठी कार्ययोजना तयार करण्याचे महत्वाचे मूलभूत काम करायला हवे. विकसनशील देशांना या संदर्भात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य आंतराष्ट्रीय पातळीवरून होणे महत्वाचे आहेगरजेचे आहेबहुतांशी पर्यावरण समस्यांना राष्ट्रांच्या सीमारेषा माहिती नसतात. या समस्या राष्ट्राराष्ट्रांत आपले हातपाय पसरत असतात. त्या नष्ट करण्यासाठी सगळया देशांमध्ये परस्परसहकार्याची नितांत आवश्यकता आहे.

वन्यप्राण्यांची आणि त्याच्या निवासस्थळांची सुरक्षा आणि योग्य अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी माणसाची आहे. त्यांना आज अनेक कारणांनी धोका निर्माण झाला आहे. म्हणून आर्थिक विकासाया योजना तयार करताना निसर्ग संरक्षण वन्यजीव संरक्षण यांना त्यात योग्य ते स्थान देणे आवश्यक आहे.



शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

अपारंपरिक उर्जा स्तोत्र


अपारंपरिक उर्जा स्तोत्र


प्रस्तावना

कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होतअसतो. पाणी,हवा,समुद्रनद्या,वेगवेगळेजीव,तापमान,आर्द्रताऋतुमान,पर्जन्यमान,जमिनीचा कस,फळा फुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार करू लागलो आहोत. सूर्यप्रकाशएक केंद्रित सूर्यप्रकाशवाराजलप्रपातसमुद्राच्या उसळणाऱ्या लाटाकिरणोत्सर्ग आणि अणू-रेणूकॉर्न-८५सेल्युलोसिक-ई-८५अनेक प्रकारच्या विजेर्याविशिष्ट प्रकारचे शेवाळे,ब्यूटेनॉलजैविकइंधनांचेप्रकारउसापासून बनविलेले इथेनॉलहायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्‍चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतोहे आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.

 

  हा विषय निवडण्या मागील उद्देश्य म्हणजे आपल्या रोजच्या वातावरण व आधुनिक माहिती प्रणालीमुळे पर्यावरणात माणसाचे एक महत्वाचे स्थान आहे. बुध्दीच्या जोरावर तो पर्यावरण -संकल्पनेत महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याचा योग्य किंवा दुरुपयोग करणे हे त्याच्याच हाती असल्याने तो पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आहे.म्हणून मी हा विषय निवडला आहे .

 

देशात उदंड सूर्यप्रकाश आहे आणि भरपूर वारे वाहत आहेत. त्यांचा उपयोग करून वीज निर्माण केली तर पेट्रोलडिझेलगॅसकोळसा आदी परंपरागत ऊर्जा साधनांचा वापर कमी करता येईल. भविष्यात या साधनांच्या अति वापरामुळे त्याचा तुटवडा होणार. म्हणून आत्तापासूनच जास्तीत जास्त अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर एक काळाची गरज आहे .

 

अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा उपयोगआजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादनक्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. उर्जेच्या पारंपारिक आणि अपारंपरिक साधनांचा समन्वयीतयथोचित व काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या उर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. उर्जेचे योग्य व्यवस्थापनसंयोजनसंवर्धन व नियमन केल्यास शेतकऱ्यांचे राहणीमान सुद्धा वाढेल. आजकाल अपारंपरिक उर्जचलित उपकरणे व योजना जसे सुर्यचुलसौर उष्णजल संयत्रसौर पथदीपसौर फवारणी संचसौर सिंचन व्यवस्थासौर गृह प्रकाश प्रणालीविजेरी प्रभारणपवन चक्कीजैववायू संयत्रकृषी अवशेषापासून विद्दुत निर्मिती प्रकल्प इत्यादी वापरत आहेत.

 

विषयाची निवड

उर्जेचा वापर प्रत्येक व्यक्ती करीत असतो .कधी कधी गरज नसताना आपण उर्जा वापरतो वाया घालवतो ,कार्यालयात घरी इतर अनेक ठिकाणी विविध स्वरूपाची उर्जा वाया जात असते .हे पटत नसले तरी सत्य आहे ,या सगळ्याचा परिणाम काही प्रमाणात उर्जा निर्मिती निर्माण होण्यावर होतो ,आपल्या देशात उर्जा टंचाई निर्माण होण्याचे कारण लोक्संन्ख्या वाढ होय ,लोकसंख्या वाढीमुळे उर्जेचा वापर वाढतो त्या प्रमाणात उर्जा निर्मिती होतेच असे नाही परिणाम: उर्जेची टंचाई यासाठी उर्जेचा काटकसरीने वापर करण्याची जाणीव आणि प्रवृत्ती विद्यार्थी दशेपासूनच निर्माण व्हावी ;कारण आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत एकविसाव्या दशकात देश सामार्त्य वान व्हावा कारखाने ,उद्योग ,कृषी यांची भरभराट व्हावी या साठी उर्जेची बचत करण्याच्या कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उच्चला तरीआपण फार मोठ्या प्रमाणात उर्जा बचत करू शकतो उर्जा बचत म्हणजे उर्जा निर्मिती होय ,या घात्मांचा विच्यार करून अपारंपारिक रीत्या तयार होणाऱ्या उर्जेची आपण व्यवस्थित रीत्या वापर केला पाहिजे या घटकांचा विच्यार करून संबंधित विषयाची निवड केली आहे .



 

उद्दिष्ट्ये :

मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसातेलनैसर्गिक वायू इ.पारंपरिक इंधन साठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे सध्याच्या मोठ्या प्रमाणात वीज वापराच्या परिस्थितीमध्ये पारंपरिक ऊर्जेच्या कमीत कमी वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सौर ऊर्जा स्त्रोताचा वापर मानवाच्या दैंनदिन जीवनात वाढविणे गरजेचे झाले आहे. भारत हा उष्णकटीबंधातील देश असल्याने प्रतिदिन साधारणत: ते कि.वॅ. उष्णता भारतामध्ये उपलब्ध आहे. भारतात प्रतीवर्षी जवळपास 50,000 दशलक्ष युनिट इतक्या प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध आहे जी आपल्या देशाच्या एकूण ऊर्जा वापराच्या कितीतरी पटीने अधिक आहे.

सौर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सौर उर्जेचा वापर घरगुतीव्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी तापविणे तसेच वाफ तयार करुन अन्न शिजविणेविद्युत निर्मिती करणे इत्यादीसाठी होतो.

सौर ऊर्जा संयंत्रामध्ये सूर्याची किरणे सौर संकलकावर एकत्रित करुन त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. ही औष्णिक ऊर्जा पाण्याला दिली जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. तापलेले पाणी सर्व बाजूनी उष्णता रोधक केलेल्या भागामध्ये एकत्रित केले जातेत्यामुळे औष्णिक ऊर्जेचा अपव्यय टाळता येतो. 

मानव हा त्याच्या पर्यावरणाचा रक्षक आणि भक्षकही असतो. त्यामूळे त्याला भौतिक स्थिरता तसेच स्वत:च्या बौध्दिक नैतिक सामाजिक आणि आत्मिक वृध्दींची संधी प्राप्त होत असते. मानवजातीच्या प्रदीर्घ आणि अत्यंत खडतर अशा उत्क्रांतीच्या वाटचालीतमानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीच्या जोरावर पर्यावरणात अनेक प्रकारांनी आणि प्रचंड प्रमाणात आमूलाग्र बदल करण्याची शक्ती मिळविली आहे. नैसर्गिक आणि मानीव असे दोन्ही प्रकारचे पर्यावरण माणसाच्या हितासाठी आणि मूलभूत मानीव अधिकारांच्या उपभोगासाठी त्याचां उपयोग करणे,

महत्व :

पर्यावरणीय महत्व -

सौर उष्णजल संयंत्राच्या संकलकाच्या वरील भागास काचेचे आवरण असते. संकलकामध्ये तांब्याच्या पत्र्यामध्ये तांब्याच्या नलिका बसविलेल्या असतात. या नलिकांना वरच्या (आकाशाकडील) पृष्ठभागास काळा रंग दिलेला असतो यामुळे उन्हाने पत्रा व नलिका तापतात व नलिकांमध्ये पाणीही तापते. पाणी तापल्यामुळे हलके होऊन वरील गरम पाण्याच्या टाकीमध्ये साठविले जाते व टाकीमध्ये खालचे गार पाणी नलिकांमध्ये येते. संयंत्र आस्थापित करीत असताना संकलकाचा पृष्ठभाग दक्षिणेकडे झुकलेला असावा. 

 

पाणी व उर्जा ह्या मानवी जीवनाच्या अविभाज्य गरजा आहेत. त्याचा जपून व बचत सदृश्य उपयोगच मानव प्राण्यांना तारणार आहे.  राज्याच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा या संस्थेतर्फे जिल्ह्या-जिल्ह्यात उर्जा निर्मितीउर्जा साधनांचा वापर व त्यासाठी अनुदान योजनाउर्जास्त्रोत निर्मितीच्या ठिकाणांचा शोधनिरीक्षण आदी योजना राबविल्या जातात.

आदिवासी उपयोजना क्षेत्रातीलआश्रमशाळा,वसतीगृहे,ग्रामीण रुग्णालये इत्यादी ठिकाणी पवन व सौर सयंत्र आस्थापित करण्याची योजना महाऊर्जा मार्फत राबविली जाते. अशा ठिकाणी तांत्रिकदृष्टया सर्वेक्षण करुन ही योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्राबाहेरील शासकीय आश्रमशाळामध्ये सौर प्रकाशीय साधने अनुदानावर आस्थापित केली जातात.

सामाजिक महत्व -

सौर उष्णता अन्न शिजविण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकेल यामुळे इंधनामध्ये बचत होते. घरगुती इंधनांच्या किंमती प्रती वर्षी वाढत असल्यामुळे गृहिणींसाठी सौरचुल वरदान ठरत आहे. सौरचुलीच्या वापराने अन्न शिजविण्यासाठी आवर्तीय खर्च होत नाही. तसेच अन्न पदार्थामधील प्रथिनांचे संरक्षण होते. दोन प्रकारच्या सौरचुली उपलब्ध आहेत. सदर सौर चूल सर्वसाधारणपणे ॲल्युमिनियम पेटी सारखी दिसते. यामध्ये मुख्यत्वे बाहेरील पेटीअन्न शिजविण्यासाठी आतील पेटीआरसा व ॲल्युमिनीयमची भांडी इत्यादींचा समावेश असतो.

निष्कर्ष:

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पध्दतीने वीजेचा वापर करणे खर्चिक आहे किंवा भारनियमानामुळे वीजेचा पुरवठा खंडीत स्वरुपात उपलब्ध होतो अशा विविध ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिकासमाज मंदीरग्रामपंचायती कार्यालयेग्राममंदीरशाळा याठिकाणी रात्रीच्यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने सौर घरगुती दीप योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे.

ग्रामीण आदिवासी क्षेत्रात अद्याप वीज पोहोचली नाही किंवा ते वर्षापर्यंत पारंपारिक पध्दतीने वीज पुरवठा करणे शक्य नाही अशा गाववस्त्यातांडयामध्ये सौर घरगुती दिवे व सौर पथदिवे आस्थापित करण्याचा उपक्रम महाऊर्जातर्फे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांकडे सौर घरगुती दिवे व प्रत्येकी दहा घरांच्या पाठीमागे एक सौर पथदिप आस्थापीत केले जात आहे. अपारंपरिक उर्जेद्वारे ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम राबविण्याची योजना सुरु आहे.

निरीक्षण :

विविध कारणांसाठी भरमसाठ वीजेचा उपयोग करण्यापेक्षा अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर वाढविणे आणि वीजेचा काटसरीने वापर करणे हे तंतोतंत पाळल्यास उर्जा समस्या भेडसावणार नाही. सौर उष्णजल सयंत्रसौर कंदीलसौर घरगुती दिवेसौरपथदीपसौरपंपपवन-सौर संकरीत सयंत्रबायोगॅस सयंत्र अशी साधने वापरुन उर्जा संवर्धन करता येईल. उर्जा बचत करता येईल

महाउर्जातर्फे उर्जा वाचविणारी आणखी एक योजना म्हणजे शासकीय इमारतीमध्ये उर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प होय. याअंतर्गत शासकीयनिमशासकीयस्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी एका वित्तीय वर्षात 25 लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केले जाते.



ऊर्जा मंत्रालयाने छोटी साइटवर वापरण्यासाठी 25 आणि 100 किलोवॅट क्षमतेच्या दोन सौर फोटोव्होल्टाइक ऊर्जा प्रकल्पांची स्थापना केली आहे. हे असे प्रकल्प होते - ग्रिड टी आणि डी सिस्टिम्सदुर्गम ग्रामीण भागात आणि दुर्गम ग्रामीण भागातील ग्रिडच्या अखेरच्या भागात वितरीत केल्या जात आहेतव्यस्त शहरी केंद्रामध्ये व्यस्त वेळेत बचत करण्याच्या कार्यप्रदर्शनासाठी. या व्यतिरिक्त, 25 किलोवॅट किमिनीच्या के-एस एन च्या दोन प्रकल्पपलाम आणि एस.जी. गावोगामध्ये पलामा सुरू झाला आहे.लक्षद्वीपमध्ये 26 किलोवॅट क्षमतेचा सौर फोटोव्होल्टेईक पॉवर प्लांट बसवण्यात आला आहे.

समुद्राची लाट तिकडे लांबीची उंची जास्त असल्यासब्रीच महासागराची लाट करून वीज निर्मिती करता येते.महासागरांतील सर्व प्रकारांतजीवाश्म ऊर्जामध्ये अधिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. भारताततसेच जड-जड ऊर्जेच्या संभाव्य क्षेत्रांतपश्चिम बंगालमध्ये कच्छ आणि खंबाटच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि सुंदर भागातील सुंदरबनची ओळख पटली आहे.

विश्लेषण :

मानवाचे जीवन व त्याच्या प्रगतीसाठी ऊर्जा आणि पाणी अत्यंत आवश्यक आहेत. उपलब्ध असलेल्या स्रोतांचा प्रगतीच्या व अत्याधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली भरपूर उपयोग झाला आहे. परिणामी ऊर्जास्रोतातील पारंपरिक स्रोतांचा अर्निबध वापर होत गेला आणि त्यांची उपलब्धता भविष्यात गंभीर होईल याकडे दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर उच्च राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या साधनांचे उत्पादन वाढल्यामुळे प्रदूषणही वाढलं. भविष्यामध्ये हवे तेवढे स्रोत सहजपणे उपलब्ध होणार नाहीत हे आता खनिज तेलावरून होणाऱ्या जागतिक संघर्षांवरून सहज लक्षात यावं. कोळशाचा साठा मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे याची जाणीव १९७०च्या दशकात जगभर झाली. त्यासाठीच ऊर्जेच्या नव्या स्रोतांची गरज भासू लागली. प्रचलित पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची कार्यक्षमता वाढवणं व नवीन साधनंमटेरिअल यांच्या संशोधनावर भर देण्यात आला. पर्यायी स्रोतांमध्ये आण्विक व अपारंपरिक ऊर्जास्रोत भविष्यातील प्रश्न सोडवू शकतील असे वारे वाहायला लागले. या पर्यायांच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल ही यातली एक जमेची बाजू होती. 



अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हटलं की सौरपवनजैविक ऊर्जापाणी हे घटक डोळ्यांसमोर येतात. भूगर्भातील औष्णिक शक्तीसमुद्रातील भरती-ओहोटीलाटा याचा वापर करूनही वीजनिर्मिती शक्य झाली आहे. पण यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेची उपलब्धता सारख्याच प्रखरतेने (intesnsity) सतत २४ तास राहात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्या विविध अडचणींवर मात करून मोठय़ा क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभे राहात आहेत. दरम्यान१९५० च्या सुमारास अपारंपरिक ऊर्जास्रोतांवरील संशोधन भारतात सुरू झाले. पण त्यावेळी पारंपरिक इंधनं स्वस्त असल्याने आणि नवीन यंत्रांमध्ये खूप त्रुटी असल्याने त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. या संशोधनापूर्वी खेडय़ांमध्ये उपयोगी पडेल असं गोबर गॅस यंत्र विकसित झालं होतं. बंगलोरच्या प्रयोगशाळेने पवनचक्कीही विकसित केली होती. पाण्याचा उपसा करण्यासाठी अशा पवनचक्क्य़ा भारतात अनेक ठिकाणी उभ्या केल्या होत्यापण या सगळ्या संशोधनाला १९७० नंतर अधिक निश्चित दिशा मिळाली. देशभराच्या हवामानाच्या माहितीसोबत सौरशक्तीची मासिक उपलब्धता व वाऱ्याची गती व दिशा ही माहिती देशातल्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. केंद्र सरकारने या स्रोतांवर संशोधन व त्यावर आधारित उपकरणांच्या वापराला चालना मिळावी यासाठी नवीन ऊर्जास्रोत खात्याची (DNES) स्थापना १९८०च्या सुमारास केली. त्यानंतर स्वतंत्र मंत्रालयाचीही स्थापना झाली. या मंत्रालयाकडून संशोधनविकासपायलट प्रोजेक्टडेमॉन्स्ट्रेशन्स यासाठी आर्थिक सहाय्य मिळू लागलं. देशामध्ये सौरपट्टय़ांचं उत्पादन सुरू होऊन ग्रामीण भागात त्यांचा उपयोग रस्त्यावरील व घरातले दिवेपाणीपंप व टीव्ही चालवण्यासाठी होऊ लागला. घरगुती आणि स्थानिक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या प्रकल्पांचा उपयोग होतो हे लक्षात आल्यावर सुरुवातीला काही व्ॉट ते काही किलोव्ॉट विद्युतनिर्मिती करणारे प्रकल्प राबवले गेले. दिवसात बराच काळ चांगली पवनगती असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवरील भागात मोठे पवनप्रकल्प उभे राहिले आहेत. ती वीज शेजारच्या ग्रीडमध्ये प्रवाहित केली जाते. पूर्वी सोलर हीटर कुटुंबांपुरते मर्यादित होते ते आता कारखानेहॉटेल्स यांसाठी मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. सोलर कूकरचा वापरही मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिक पातळीवर व्हायला लागला. ग्रामीण भागात बायो गॅसही वापरला जात आहे. एकंदरच ऊर्जाशक्तीच्या वापरापैकी १० टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांच्या सहाय्याने निर्माण केली जात आहे. पण अपारंपरिक ऊर्जानिर्मितीलाही नकारात्मक बाजू आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. या स्रोतांचा नीट वापर करायचा असेल तर भूतकाळात घडलेल्या काही चुका टाळणं आवश्यक आहे.

अभ्यास पद्धती :

निरीक्षण पध्दत -

कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवरहोतअसतो.,वेगवेगळेजीव,तापमान,आर्द्रता,ऋतुमान,पर्जन्यमान,जमिनीचा कस,फळा फुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार करू लागलो आहोत.



सूर्यप्रकाशएककेंद्रितसूर्यप्रकाशवाराजलप्रपातसमुद्राच्या उसळणाऱ्या लाटाकिरणोत्सर्ग आणि अणू-रेणूकॉर्न-८५सेल्युलोसिक-ई-८५अनेक प्रकारच्या विजेर्या,विशिष्ट प्रकारचे शेवाळेब्यूटेनॉलजैविक इंधनांचे प्रकारउसापासून बनविलेले इथेनॉलहायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्‍चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतोहे आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.

सोलर फोटोव्होल्टेइक्‍स (पीव्ही) : या विशिष्ट प्रकारच्या बॅटरीजनिसर्गात मुबलकसापडणाऱ्या सिलिकॉन मूलद्रव्याच्या बनविल्या असतात.धन आणि ऋण प्रभारांच्या सिलिकॉनच्या पट्टीवर सूर्यप्रकाश पडलाती त्या पट्टीमध्ये वीजनिर्मिती होते. ही वीज आपण इतरत्र वापरू शकतो. घरांच्या गच्चीवररस्त्यांच्या कडेलाबागांमध्ये किंवा ओसाड जमिनींवर अशा हजारो बॅटरीज लावून आपण सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करू शकतो. भारतासारख्या देशाला तर निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. आपल्याला मिळणाऱ्या मुबलक सूर्यप्रकाशाचे अशाप्रकारे सोने करून घेण्याची संधी आपण दवडता कामा नये. आज या तंत्रज्ञानात काही त्रुटी आहेत. ढगाळपावसाळी हवेत किंवा रात्री या बॅटरीज वीज निर्माण करू शकत नाहीततसेच त्यांचे तापमान ४५ अंशांपलीकडे गेले तर फार कमी वीजनिर्मिती होते. परदेशात शेतांमध्ये बसविलेले पीव्ही आज ६० मेगावॉटपर्यंत वीज निर्माण करीत आहेत. भविष्यात त्यांची क्षमता १५० मेगावॉट करण्याची योजना आहे. आपण या क्षेत्रात खूपच मागे आहोत.

निष्कर्ष -

भूऔष्णिक उर्जा - पृथ्वीच्या पोटातखोलवर वाफेचे आणि गरम पाण्याचे प्रचंड साठे आहेत. भूऔष्णिक तंत्रज्ञान या वाफेला आणि तप्त पाण्याला पृष्ठभागावर आणून त्यापासून वीजनिर्मिती करते. बऱ्याचदा भूगर्भातील वाफेचे तापमान १८० ते ३७० अंश असते. अशा ठिकाणी केशनलिका (बोअरवेल्स) खणून ते पाणी वर आणतात. त्यापासून वीजनिर्मिती झाली की दुसऱ्या केशनलिकेतून ते पुन्हा भूगर्भात सोडून देतात. या वाफेबरोबर अनेक वायू पृष्ठभागावर येतात. त्यांना वेगळे करून इतर कामांसाठी वापर करून घेता येईल. आज त्यांना वातावरणात सोडून दिले जाते. भूऔष्णिक उर्जेचा वापर ज्या भागात अशी वाफ उपलब्ध आहे अश्याच ठिकाणी करता येते. सध्या आइसलँड या देशात भूऔष्णिक उर्जेवर मोठ्या प्रमाणावर उर्जानिर्मिती करतात.








प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार- Pollution and Types of Pollution

                  प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार   प्रस्तावना – प्रदूषण म्हणजे   जीवन   नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक...