प्रस्तावना –
कुठल्याही इंधनाच्या वापराचा
परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होतअसतो. पाणी,हवा,समुद्र, नद्या,वेगवेगळेजीव,तापमान,आर्द्रता, ऋतुमान,पर्जन्यमान,जमिनीचा कस,फळा फुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध
चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे
सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत
कल्पकतेने विचार करू लागलो आहोत. सूर्यप्रकाश, एक केंद्रित सूर्यप्रकाश, वारा, जलप्रपात, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, किरणोत्सर्ग आणि अणू-रेणू, कॉर्न-८५, सेल्युलोसिक-ई-८५, अनेक प्रकारच्या विजेर्या, विशिष्ट प्रकारचे शेवाळे,ब्यूटेनॉल, जैविकइंधनांचेप्रकार, उसापासून बनविलेले इथेनॉल, हायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. भविष्यात आपल्या
पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्चितच.
अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित
करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत
विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतो, हे आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे
लागणार आहे.
हा विषय निवडण्या मागील उद्देश्य म्हणजे आपल्या रोजच्या वातावरण व
आधुनिक माहिती प्रणालीमुळे पर्यावरणात माणसाचे एक महत्वाचे स्थान आहे. बुध्दीच्या
जोरावर तो पर्यावरण -संकल्पनेत महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याचा योग्य किंवा
दुरुपयोग करणे हे त्याच्याच हाती असल्याने तो पर्यावरणाच्या केंद्रस्थानी
आहे.म्हणून मी हा विषय निवडला आहे .
देशात उदंड सूर्यप्रकाश आहे आणि भरपूर वारे
वाहत आहेत. त्यांचा उपयोग करून वीज निर्माण केली तर पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा आदी परंपरागत ऊर्जा साधनांचा वापर कमी
करता येईल. भविष्यात या साधनांच्या अति वापरामुळे त्याचा तुटवडा होणार. म्हणून
आत्तापासूनच जास्तीत जास्त अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर एक काळाची गरज आहे .
अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा उपयोगआजच्या
जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून
आहे. उर्जेच्या पारंपारिक आणि अपारंपरिक साधनांचा समन्वयीत, यथोचित व काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या
उर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. उर्जेचे योग्य व्यवस्थापन, संयोजन, संवर्धन व नियमन केल्यास शेतकऱ्यांचे राहणीमान
सुद्धा वाढेल. आजकाल अपारंपरिक उर्जचलित उपकरणे व योजना जसे सुर्यचुल, सौर उष्णजल संयत्र, सौर पथदीप, सौर फवारणी संच, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, विजेरी प्रभारण, पवन चक्की, जैववायू संयत्र, कृषी अवशेषापासून विद्दुत निर्मिती प्रकल्प
इत्यादी वापरत आहेत.
विषयाची निवड –
उर्जेचा वापर प्रत्येक व्यक्ती करीत असतो .कधी कधी गरज नसताना आपण
उर्जा वापरतो वाया घालवतो ,कार्यालयात घरी इतर अनेक ठिकाणी विविध
स्वरूपाची उर्जा वाया जात असते .हे पटत नसले तरी सत्य आहे ,या सगळ्याचा परिणाम काही प्रमाणात उर्जा निर्मिती निर्माण होण्यावर
होतो ,आपल्या देशात उर्जा टंचाई निर्माण
होण्याचे कारण लोक्संन्ख्या वाढ होय ,लोकसंख्या वाढीमुळे उर्जेचा वापर वाढतो त्या प्रमाणात उर्जा निर्मिती
होतेच असे नाही परिणाम: उर्जेची टंचाई यासाठी उर्जेचा काटकसरीने वापर करण्याची
जाणीव आणि प्रवृत्ती विद्यार्थी दशेपासूनच निर्माण व्हावी ;कारण आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत एकविसाव्या दशकात देश
सामार्त्य वान व्हावा कारखाने ,उद्योग ,कृषी यांची भरभराट व्हावी या साठी उर्जेची बचत करण्याच्या कार्यात
प्रत्येकाने खारीचा वाटा उच्चला तरीआपण फार मोठ्या प्रमाणात उर्जा बचत करू शकतो
उर्जा बचत म्हणजे उर्जा निर्मिती होय ,या घात्मांचा विच्यार करून अपारंपारिक रीत्या तयार होणाऱ्या उर्जेची
आपण व्यवस्थित रीत्या वापर केला पाहिजे या घटकांचा विच्यार करून संबंधित विषयाची
निवड केली आहे .
उद्दिष्ट्ये :
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला
अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक
असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू इ.पारंपरिक इंधन साठे दिवसेंदिवस
कमी होत चालले आहेत. त्यामुळे सध्याच्या मोठ्या प्रमाणात वीज वापराच्या
परिस्थितीमध्ये पारंपरिक ऊर्जेच्या कमीत कमी वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
त्याच बरोबर सौर ऊर्जा स्त्रोताचा वापर मानवाच्या दैंनदिन जीवनात वाढविणे गरजेचे
झाले आहे. भारत हा उष्णकटीबंधातील देश असल्याने प्रतिदिन साधारणत: 4 ते 7 कि.वॅ. उष्णता भारतामध्ये उपलब्ध आहे. भारतात
प्रतीवर्षी जवळपास 50,000 दशलक्ष युनिट इतक्या प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध
आहे जी आपल्या देशाच्या एकूण ऊर्जा वापराच्या कितीतरी पटीने अधिक आहे.
सौर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सौर उर्जेचा वापर
घरगुती, व्यापारी तसेच
औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी तापविणे तसेच वाफ तयार करुन अन्न शिजविणे, विद्युत निर्मिती करणे इत्यादीसाठी होतो.
सौर ऊर्जा संयंत्रामध्ये सूर्याची किरणे सौर
संकलकावर एकत्रित करुन त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. ही औष्णिक ऊर्जा
पाण्याला दिली जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. तापलेले पाणी सर्व बाजूनी
उष्णता रोधक केलेल्या भागामध्ये एकत्रित केले जाते, त्यामुळे औष्णिक ऊर्जेचा अपव्यय टाळता येतो.
मानव हा त्याच्या पर्यावरणाचा रक्षक आणि भक्षकही असतो. त्यामूळे
त्याला भौतिक स्थिरता तसेच स्वत:च्या बौध्दिक नैतिक सामाजिक आणि आत्मिक वृध्दींची
संधी प्राप्त होत असते. मानवजातीच्या प्रदीर्घ आणि अत्यंत खडतर अशा उत्क्रांतीच्या
वाटचालीत, मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या
वेगवान प्रगतीच्या जोरावर पर्यावरणात अनेक प्रकारांनी आणि प्रचंड प्रमाणात
आमूलाग्र बदल करण्याची शक्ती मिळविली आहे. नैसर्गिक आणि मानीव असे दोन्ही प्रकारचे
पर्यावरण माणसाच्या हितासाठी आणि मूलभूत मानीव अधिकारांच्या उपभोगासाठी त्याचां
उपयोग करणे,
महत्व :
पर्यावरणीय महत्व -
सौर उष्णजल संयंत्राच्या संकलकाच्या वरील भागास
काचेचे आवरण असते. संकलकामध्ये तांब्याच्या पत्र्यामध्ये तांब्याच्या नलिका
बसविलेल्या असतात. या नलिकांना वरच्या (आकाशाकडील) पृष्ठभागास काळा रंग दिलेला
असतो यामुळे उन्हाने पत्रा व नलिका तापतात व नलिकांमध्ये पाणीही तापते. पाणी
तापल्यामुळे हलके होऊन वरील गरम पाण्याच्या टाकीमध्ये साठविले जाते व टाकीमध्ये
खालचे गार पाणी नलिकांमध्ये येते. संयंत्र आस्थापित करीत असताना संकलकाचा पृष्ठभाग
दक्षिणेकडे झुकलेला असावा.
पाणी व उर्जा ह्या मानवी जीवनाच्या अविभाज्य
गरजा आहेत. त्याचा जपून व बचत सदृश्य उपयोगच मानव प्राण्यांना तारणार आहे. राज्याच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण
अर्थात महाऊर्जा या संस्थेतर्फे जिल्ह्या-जिल्ह्यात उर्जा निर्मिती, उर्जा साधनांचा वापर व त्यासाठी अनुदान योजना, उर्जास्त्रोत निर्मितीच्या ठिकाणांचा शोध, निरीक्षण आदी योजना राबविल्या जातात.
सामाजिक महत्व -
सौर उष्णता अन्न शिजविण्यासाठी सुद्धा वापरता
येऊ शकेल यामुळे इंधनामध्ये बचत होते. घरगुती इंधनांच्या किंमती प्रती वर्षी वाढत
असल्यामुळे गृहिणींसाठी सौरचुल वरदान ठरत आहे. सौरचुलीच्या वापराने अन्न
शिजविण्यासाठी आवर्तीय खर्च होत नाही. तसेच अन्न पदार्थामधील प्रथिनांचे संरक्षण
होते. दोन प्रकारच्या सौरचुली उपलब्ध आहेत. सदर सौर चूल सर्वसाधारणपणे ॲल्युमिनियम पेटी
सारखी दिसते. यामध्ये मुख्यत्वे बाहेरील पेटी, अन्न शिजविण्यासाठी आतील पेटी, आरसा व ॲल्युमिनीयमची भांडी इत्यादींचा समावेश
असतो.
निष्कर्ष:
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे
पारंपारिक पध्दतीने वीजेचा वापर करणे खर्चिक आहे किंवा भारनियमानामुळे वीजेचा
पुरवठा खंडीत स्वरुपात उपलब्ध होतो अशा विविध ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या
सामुदायिक अभ्यासिका, समाज मंदीर, ग्रामपंचायती कार्यालये, ग्राममंदीर, शाळा याठिकाणी रात्रीच्यावेळी विद्यार्थ्यांना
अभ्यास करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने सौर घरगुती दीप योजना अनुदानावर राबविण्यात
येत आहे.
ग्रामीण आदिवासी क्षेत्रात अद्याप वीज पोहोचली
नाही किंवा 5 ते 7 वर्षापर्यंत पारंपारिक पध्दतीने वीज पुरवठा
करणे शक्य नाही अशा गाव, वस्त्या, तांडयामध्ये सौर घरगुती दिवे व सौर पथदिवे
आस्थापित करण्याचा उपक्रम महाऊर्जातर्फे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रत्येक
लाभार्थ्यांकडे सौर घरगुती दिवे व प्रत्येकी दहा घरांच्या पाठीमागे एक सौर पथदिप
आस्थापीत केले जात आहे. अपारंपरिक उर्जेद्वारे ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम
राबविण्याची योजना सुरु आहे.
निरीक्षण :
विविध कारणांसाठी भरमसाठ वीजेचा उपयोग
करण्यापेक्षा अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर वाढविणे आणि वीजेचा काटसरीने
वापर करणे हे तंतोतंत पाळल्यास उर्जा समस्या भेडसावणार नाही. सौर उष्णजल
सयंत्र, सौर कंदील, सौर घरगुती दिवे, सौरपथदीप, सौरपंप, पवन-सौर संकरीत सयंत्र, बायोगॅस सयंत्र अशी साधने वापरुन उर्जा संवर्धन करता येईल. उर्जा बचत करता येईल
महाउर्जातर्फे उर्जा वाचविणारी आणखी एक योजना
म्हणजे शासकीय इमारतीमध्ये उर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प होय. याअंतर्गत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीमध्ये
पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी एका वित्तीय वर्षात 25 लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केले जाते.
ऊर्जा मंत्रालयाने छोटी
साइटवर वापरण्यासाठी 25 आणि 100 किलोवॅट क्षमतेच्या दोन सौर फोटोव्होल्टाइक ऊर्जा प्रकल्पांची स्थापना केली
आहे. हे असे प्रकल्प होते - ग्रिड टी आणि डी सिस्टिम्स, दुर्गम ग्रामीण भागात आणि दुर्गम ग्रामीण भागातील ग्रिडच्या अखेरच्या भागात
वितरीत केल्या जात आहेत, व्यस्त शहरी केंद्रामध्ये व्यस्त वेळेत बचत करण्याच्या कार्यप्रदर्शनासाठी. या व्यतिरिक्त, 25 किलोवॅट किमिनीच्या के-एस एन च्या दोन प्रकल्पपलाम आणि एस.जी. गावोगामध्ये पलामा सुरू झाला आहे.लक्षद्वीपमध्ये 26 किलोवॅट क्षमतेचा सौर
फोटोव्होल्टेईक पॉवर प्लांट बसवण्यात आला आहे.
समुद्राची लाट तिकडे लांबीची
उंची जास्त असल्यास, ब्रीच महासागराची लाट करून वीज निर्मिती करता येते.महासागरांतील सर्व
प्रकारांत, जीवाश्म ऊर्जामध्ये अधिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. भारतात, तसेच जड-जड ऊर्जेच्या संभाव्य क्षेत्रांत, पश्चिम बंगालमध्ये कच्छ आणि
खंबाटच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि सुंदर भागातील सुंदरबनची ओळख पटली आहे.
विश्लेषण :
मानवाचे जीवन व त्याच्या प्रगतीसाठी ऊर्जा आणि
पाणी अत्यंत आवश्यक आहेत. उपलब्ध असलेल्या स्रोतांचा प्रगतीच्या व अत्याधुनिक
जीवनशैलीच्या नावाखाली भरपूर उपयोग झाला आहे. परिणामी ऊर्जास्रोतातील पारंपरिक
स्रोतांचा अर्निबध वापर होत गेला आणि त्यांची उपलब्धता भविष्यात गंभीर होईल याकडे
दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर उच्च राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या साधनांचे उत्पादन
वाढल्यामुळे प्रदूषणही वाढलं. भविष्यामध्ये हवे तेवढे स्रोत सहजपणे उपलब्ध होणार
नाहीत हे आता खनिज तेलावरून होणाऱ्या जागतिक संघर्षांवरून सहज लक्षात यावं. कोळशाचा
साठा मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे याची जाणीव १९७०च्या दशकात जगभर झाली. त्यासाठीच
ऊर्जेच्या नव्या स्रोतांची गरज भासू लागली. प्रचलित पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या
वापराची कार्यक्षमता वाढवणं व नवीन साधनं, मटेरिअल यांच्या संशोधनावर भर देण्यात आला.
पर्यायी स्रोतांमध्ये आण्विक व अपारंपरिक ऊर्जास्रोत भविष्यातील प्रश्न सोडवू
शकतील असे वारे वाहायला लागले. या पर्यायांच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल ही
यातली एक जमेची बाजू होती.
अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हटलं की सौर, पवन, जैविक ऊर्जा, पाणी हे घटक डोळ्यांसमोर येतात. भूगर्भातील औष्णिक
शक्ती, समुद्रातील
भरती-ओहोटी, लाटा याचा वापर
करूनही वीजनिर्मिती शक्य झाली आहे. पण यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेची उपलब्धता
सारख्याच प्रखरतेने (intesnsity) सतत २४ तास राहात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्या विविध अडचणींवर मात करून
मोठय़ा क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभे राहात आहेत. दरम्यान, १९५० च्या सुमारास अपारंपरिक ऊर्जास्रोतांवरील
संशोधन भारतात सुरू झाले. पण त्यावेळी पारंपरिक इंधनं स्वस्त असल्याने आणि नवीन
यंत्रांमध्ये खूप त्रुटी असल्याने त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. या
संशोधनापूर्वी खेडय़ांमध्ये उपयोगी पडेल असं गोबर गॅस यंत्र विकसित झालं होतं.
बंगलोरच्या प्रयोगशाळेने पवनचक्कीही विकसित केली होती. पाण्याचा उपसा करण्यासाठी
अशा पवनचक्क्य़ा
भारतात अनेक ठिकाणी उभ्या केल्या होत्या, पण या सगळ्या संशोधनाला १९७० नंतर अधिक निश्चित
दिशा मिळाली. देशभराच्या हवामानाच्या माहितीसोबत सौरशक्तीची मासिक उपलब्धता व
वाऱ्याची गती व दिशा ही माहिती देशातल्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये प्रसिद्ध
करण्यात आली. केंद्र सरकारने या स्रोतांवर संशोधन व त्यावर आधारित उपकरणांच्या
वापराला चालना मिळावी यासाठी नवीन ऊर्जास्रोत खात्याची (DNES) स्थापना १९८०च्या सुमारास केली. त्यानंतर
स्वतंत्र मंत्रालयाचीही स्थापना झाली. या मंत्रालयाकडून संशोधन, विकास, पायलट प्रोजेक्ट, डेमॉन्स्ट्रेशन्स यासाठी आर्थिक सहाय्य मिळू
लागलं. देशामध्ये सौरपट्टय़ांचं उत्पादन सुरू होऊन ग्रामीण भागात त्यांचा उपयोग
रस्त्यावरील व घरातले दिवे, पाणी, पंप व टीव्ही चालवण्यासाठी होऊ लागला. घरगुती
आणि स्थानिक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या प्रकल्पांचा उपयोग होतो हे लक्षात
आल्यावर सुरुवातीला काही व्ॉट ते काही किलोव्ॉट विद्युतनिर्मिती करणारे प्रकल्प
राबवले गेले. दिवसात बराच काळ चांगली पवनगती असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवरील भागात
मोठे पवनप्रकल्प उभे राहिले आहेत. ती वीज शेजारच्या ग्रीडमध्ये प्रवाहित केली
जाते. पूर्वी सोलर हीटर कुटुंबांपुरते मर्यादित होते ते आता कारखाने, हॉटेल्स यांसाठी मोठय़ा प्रमाणात वापरले जातात.
सोलर कूकरचा वापरही मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिक पातळीवर व्हायला लागला. ग्रामीण
भागात बायो गॅसही वापरला जात आहे. एकंदरच ऊर्जाशक्तीच्या वापरापैकी १० टक्के ऊर्जा
अपारंपरिक स्रोतांच्या सहाय्याने निर्माण केली जात आहे. पण अपारंपरिक
ऊर्जानिर्मितीलाही नकारात्मक बाजू आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. या स्रोतांचा
नीट वापर करायचा असेल तर भूतकाळात घडलेल्या काही चुका टाळणं आवश्यक आहे.
अभ्यास पद्धती :
निरीक्षण पध्दत -
कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम
निसर्गाच्या सर्व घटकांवरहोतअसतो.,वेगवेगळेजीव,तापमान,आर्द्रता,ऋतुमान,पर्जन्यमान,जमिनीचा कस,फळा फुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता
अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ
लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार
करू लागलो आहोत.
सूर्यप्रकाश, एककेंद्रितसूर्यप्रकाश, वारा, जलप्रपात, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, किरणोत्सर्ग आणि अणू-रेणू, कॉर्न-८५, सेल्युलोसिक-ई-८५, अनेक प्रकारच्या विजेर्या,विशिष्ट प्रकारचे शेवाळे, ब्यूटेनॉल, जैविक इंधनांचे प्रकार, उसापासून बनविलेले इथेनॉल, हायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत.
भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे
भागविणार आहेत हे निश्चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे
असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा
लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा
गाभा असतो, हे आज थोडे
विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.
सोलर फोटोव्होल्टेइक्स (पीव्ही) : या विशिष्ट
प्रकारच्या बॅटरीजनिसर्गात मुबलकसापडणाऱ्या सिलिकॉन मूलद्रव्याच्या बनविल्या असतात.धन आणि ऋण
प्रभारांच्या सिलिकॉनच्या पट्टीवर सूर्यप्रकाश पडला, ती त्या पट्टीमध्ये वीजनिर्मिती होते. ही वीज
आपण इतरत्र वापरू शकतो. घरांच्या गच्चीवर, रस्त्यांच्या कडेला, बागांमध्ये किंवा ओसाड जमिनींवर अशा हजारो
बॅटरीज लावून आपण सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करू शकतो. भारतासारख्या देशाला तर
निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. आपल्याला मिळणाऱ्या मुबलक सूर्यप्रकाशाचे अशाप्रकारे
सोने करून घेण्याची संधी आपण दवडता कामा नये. आज या तंत्रज्ञानात काही त्रुटी
आहेत. ढगाळ, पावसाळी हवेत किंवा
रात्री या बॅटरीज वीज निर्माण करू शकत नाहीत, तसेच त्यांचे तापमान ४५ अंशांपलीकडे गेले तर
फार कमी वीजनिर्मिती होते. परदेशात शेतांमध्ये बसविलेले पीव्ही आज ६०
मेगावॉटपर्यंत वीज निर्माण करीत आहेत. भविष्यात त्यांची क्षमता १५० मेगावॉट
करण्याची योजना आहे. आपण या क्षेत्रात खूपच मागे आहोत.
निष्कर्ष -
भूऔष्णिक उर्जा
- पृथ्वीच्या पोटात, खोलवर वाफेचे आणि गरम
पाण्याचे प्रचंड साठे आहेत. भूऔष्णिक तंत्रज्ञान या वाफेला आणि तप्त पाण्याला
पृष्ठभागावर आणून त्यापासून वीजनिर्मिती करते. बऱ्याचदा भूगर्भातील वाफेचे तापमान १८० ते ३७० अंश असते. अशा ठिकाणी केशनलिका
(बोअरवेल्स) खणून ते पाणी वर आणतात. त्यापासून वीजनिर्मिती झाली की दुसऱ्या
केशनलिकेतून ते पुन्हा भूगर्भात सोडून देतात. या वाफेबरोबर अनेक वायू पृष्ठभागावर
येतात. त्यांना वेगळे करून इतर कामांसाठी वापर करून घेता येईल. आज त्यांना
वातावरणात सोडून दिले जाते. भूऔष्णिक उर्जेचा वापर ज्या भागात अशी वाफ उपलब्ध आहे
अश्याच ठिकाणी करता येते. सध्या आइसलँड या देशात भूऔष्णिक उर्जेवर मोठ्या प्रमाणावर उर्जानिर्मिती
करतात.