जागतिक तापमान वाढ
प्रस्तावना :
आजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या जागतिक तापमान
नोंद हरितवायूंचे उत्सर्जन पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली
होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची
तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या
वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याचे
तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे.
क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी
मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन
इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु
केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे.
हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती
याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे जवाबदार देश आहेत. याचे मुख्य कारण जिव्हाळ्याचा
झाला आहे. प्रत्येकन्युजचॅनलवरअधूनमधून, याविषयी नवनवीनच माहिती देणंसुरूअसतं पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रया आहे.याचबरोबरसहसाहवामानातीलबदल व
भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.
उद्दिष्ट्ये :
जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सियस ( ३.६ अंश फॅरनहीट)
मर्यादेत ठेवण्यासाठी वेळ निघून चालली असून सध्याचे कार्बन उत्सर्जन बघता त्यातून
मोठा धोका होऊ शकतो, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान
तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ या संस्थेच्या (आयपीसीसी)
अहवालाचा आढावा घेतल्यानंतर असे सांगण्यात आले की, गेल्या आठ लाख वर्षांत तीन
प्रमुख हरितगृह वायूंचे प्रमाण एवढे कधीच नव्हते. पृथ्वी आता इ.स. २१०० पर्यंत ४
अंश सेल्सियसने तापमान वाढण्याच्या उंबरठय़ावर असून त्यामुळे काही ठिकाणी सागरी
पातळी वाढेल, प्राणी-वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतील, पूर येतील, दुष्काळ पडतील.आयपीसीसी या
नोबेल विजेत्या संस्थेने या अहवालाचा प्रथमच आढावा घेतला. पुढील महिन्यात लिमा
येथे हवामान बदलांवर बैठक होत आहे. त्यात इ.स.२०१५ मध्ये जागतिक तपमान वाढ २ अंश
सेल्सियसच्या मर्यादेत ठेवण्याचा निर्धार केला जाणार आहे. गेली अनेक वर्षे हवामान
बदल टाळण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
पण त्यात फार काही निष्पन्न झालेले नाही. आयपीसीसीने म्हटले आहे की, प्रदूषण कमी करण्यासाठी पैसे
लागतील, पण त्याचा परिणाम जागतिक आर्थिक वाढीवर होणार नाही याचाही
विचार करावा लागेल. या शतकात दरवर्षी कार्बन उत्सर्जन ०.०६ टक्के कमी करण्याची गरज
आहे. जर पृथ्वीचे तापमान ३ अंश वाढले तर भूक, बेघर होणे, हिंसक संघर्ष होणे, प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती
नष्ट होणे यासारखे परिणाम होतील. आयपीसीसीच्या २६ वर्षांंच्या इतिहासातील हा पाचवा
अहवाल आहे. किमान ८०० तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला असून त्याचे विश्लेषणही केले
आहे.
ही शेवटची संधी-
पचौरीआयपीसीसीचे प्रमुख राजेंद्र पचौरी यांनी सांगितले की, हवामान बदल रोखण्यासाठी अतिशय
अग्रक्रमाने कृती करण्याची गरज आहे. २ अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढीची मर्यादाराखण्यासाठी ही संधी
आहे. तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या खाली असायला हवी व तेही कमी खर्चात करता आले
पाहिजे. आपले कार्बन उत्सर्जन २०१० ते २०५० या काळात ४० ते ७० टक्के तर इ.स. २१००
पर्यंत शून्य किंवा कमी पातळीवर आणता आले पाहिजे.
ऋणनिर्देश
:
“ जागतिक तापमान वाढ ” हा माझा विषय आहे ,महाराष्ट्र
उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे आम्ही सर्व आभारी आहोत ,करण
त्यांनी २०१६ २०१७ ह्या शेक्षणिक वर्षापासून आम्हा सर्वं ११वि आणि 12 वि च्या
विद्यार्थ्यांसाठी हा विषय आमलात आणला ,वेगवेगळ्या
प्रकाशनातील “पर्यावरण –शिक्षण “पुस्तक बोर्डाने मंजूर केले .या पुस्तकाना विध्यार्थ्यांनी व
प्राध्यापक वर्गांनी उदंड प्रतिसाद दिला .यामुळे आपले आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू
शकलो. आम्हाला शाळेतील पर्यावरण ह्या विषयाची ओळख आम्हाला कऋण दिली त्या बद्दल ,तसेच हा
विषय तयार करून देण्यात माझ्या वर्ग विषय शिक्षिका
यांचे मला म्हत्वाचे अनमोल सहकार्य मिळाले तसेच माझ्या मित्रांनी/माय्त्रीनिनी ,पालकांनी
,सहकार्य
दिले ,पर्यावरण विषयाची ओळख मला या माध्यमातून करून दिली त्याबद्दल ,
तसेच आम्हाला 11 वी आणि 12 वि या नवीन वर्षाचे पर्यावरण पुस्तकाचे आणि त्याच्या बरोबर
प्रायोगिक भूगोल इयत्ता 12 वि या पुस्तकाचे सहकार्य मिळाले .विशेष आभार मानायचे तर
ते ,आमच्या शाळेच्या
प्राध्यापकाचे तसेच प्रच्याय श्री आर.बी.पाटील सरांचे कारण त्यांच्याच प्रयत्नांनी
आम्हा सर्व मुलाना पर्यावरण विषय करण्यास संधी देऊन ,आम्हा सर्वांना स्वतःला
सिद्ध दाखविण्याची संधी दिली त्या बद्दल फार आभार .
विश्लेषण :
परिणाम - गेले वर्षभर कधी कडक उन्हाळा, कधी पाऊस, कधी उन्हाळा येता येता परत थंडीचा व गारपिटीचा तडाखा असे आठवडयाला रंग आणि ढंग
बदलणारे हवामान देशाला हुलकावण्या देत आहे. या बदलत्या हवामानाचा झटका शहरी
भागातील नागरिकांना व आर्थिक नुकसानीचा फटका ग्रामीण भागातील शेतक-यांना
बसतो आहे. २०-२५ दिवसांपूर्वी सुरू झालेला उन्हाळा अकस्मात गायब झाला व उत्तरेत
बदललेल्या हवामानामुळे येथे दक्षिणेत पुन्हा थंडी अवतरली. महाराष्ट्राच्या अनेक
भागांना अभूतपूर्व गारपिटीने झोडपले व शेतक-यांची शेती आणि बागायती उत्पादने
मातीमोल होऊन गेली. राज्यातील शेतक-यानी हाय खाल्ली. अनेक शेतक-यांनी आत्महत्या
केल्या. पूर्वी महाराष्ट्रात गारपीट होत नव्हती असे नव्हे; पण, ती अगदी मर्यादित काळ व मर्यादित भागापुरतीच असे. तिचा शेतक-यांना बसणारा
फटकाही मर्यादित असे. पण यंदाच्या हवामानाप्रमाणेच ही गारपीटही विचित्र होती. हा
एप्रिल महिना. आताच संपलेल्या मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवडयात सुरू झालेल्या
उन्हाळ्यानेही आल्याआल्या आपला प्रताप आणि ताप दाखवायला सुरुवात केली आहे. अवेळी
पडलेली थंडी आणि गारपीट यामुळे गायब झालेल्या उन्हाळ्याने ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणायला सुरुवात केली
आहे. मुंबईतील तापमानाचा पारा वर चढत असून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होत
आहेत. लोक कामधंद्यानिमित्त बाहेर असोत की, की घरात पंख्याखाली असोत, वाढत्या उकाडयामुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे ‘नको हा उन्हाळा, त्यापेक्षा थंडीच बरी,’ असे उद्गार लोकांच्या तोंडून
निघू लागले आहेत. अजून उन्हाळ्याचे किमान अडीच महिने तरी जायचे आहेत. गेले काही
दिवस शहरातील तापमान ३३ ते ३४ अंशावर स्थिरावले होते. आकाश निरभ्र असल्याने
तापमानातील चढउतार कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले
असले तरी हा चढउतार आता फार असेल, असे नाही. राज्यातील
तापमानाचा आलेख चढताच असणार आहे. राज्यात तापमानाचा पारा सर्वाधिक असणारे भाग
म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूर
हे होत. हे भाग पारंपरिकदृष्टया सर्वाधिक उन्हाळ्याचे होत. मुंबईत त्यामानाने
तापमान कमी असले तरी या महानगरीतील लक्षावधी लोक कामधंदा व व्यवसायानिमित्त आणि
शाळा-महाविद्यालयात जाण्याच्या निमित्ताने बाहेर असल्याने या दिवसात बस वा लोकलने
प्रवास करणे, हे अत्यंत त्रासदायक आणि अक्षरश ‘घाम काढणारे’ असते. या उन्हाचा मोठा फटका दुपारच्या वेळी कामानिमित्ताने
बाहेर पडणा-या लोकांना बसतो. उन्हामुळे जवळचे अंतरही लोकांना चालवत नाही. उन्हातून
पाच-दहा मिनिटे चालल्यावर डोळयासमोर काळोखी येते. अगदी तरुणांनाही धाप लागते. बसने
प्रवास करणा-या प्रवाशांनाही त्याचा फटका बसतो. उन्हाच्या तडाख्यामुळे आरक्षित
आसने बसच्या दोन्ही बाजूस ठेवावीत, अशी मागणी महिला प्रवाशांनी
केली आहे. महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने बेस्ट प्रशासनाने गेल्या वर्षी
महिलांच्या आरक्षित आसनांमध्ये वाढ केली. परंतु ही आसने एकाच बाजूला असल्याने
महिलांना जाता-येता उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी ही आसने दोन्ही बाजूंना
असावीत, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी बसच्या सर्वच खिडक्यांना पडदे वा पारदर्शक
फिल्म लावावी लागणार आहे. रेल्वे तर मुंबईकरांची जीवनवाहिनी. रोज लाखो लोक
रेल्वेने प्रवास करतात. गर्दीमुळे लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणा-या
हजारो प्रवाशांना उन्हातून प्रवास करावा लागतो. अर्थात मुंबईच्या वाढत्या
गर्दीमुळे सध्या तरी याला पर्याय नाही. मात्र, खिडक्यांपाशी बसणा-या
प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्यांना काळ्या काचा वा काचांना रंगीत
फिल्म लावता येईल. हे सर्व उन्हाचा तात्पुरता बंदोबस्त करणारे उपाय आहेत. मुळातच
गेली काही वष्रे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. या जागतिक तापमानवाढीमुळे जगातील
बर्फाचे साठे वितळण्यापासून तो ऋतू बदलण्यापर्यंत व त्याचा फटका शेतीला
बसण्यापर्यंत अनेक अनर्थ घडत आहेत. वातावरणातील कार्बन वाढल्याने पृथ्वीच्या
तापमानात झपाटयाने वाढ होत आहे. कार्बनचे प्रमाण वाढण्यास अमेरिका व युरोपीय
औद्योगिक राष्ट्रे प्रामुख्याने जबाबदार असली तरी ही राष्ट्रे हे मान्य करण्यास
तयार नाहीत. तसे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्या औद्यागिक विकासावर
परिणाम होईल. परंतु जागतिक तापमान वाढीमुळे ऋतूबदल, बर्फ वितळणे, नद्यांना पूर येणे, वादळे व चक्रीवादळे यांचे
प्रमाण वाढणे, भारतासारख्या देशात अतिवृष्टी होणे व पर्जन्यमान अनियमित होणे, अशी संकटे येत आहेत.