प्रस्तावना –
आज जगात प्रचंड प्रमाणात
वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक
आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे .एका दिवसात सामान्यत:
माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो. एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे. म्हणजे एका
दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत
रु.७,६६,५०० इतकी येते.सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच
किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला
असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो
आहोत.आजच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकचा वापर
टाळा. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळा. कापडी पिशव्याचा वापर करा. वृक्षतोड करू
नका
निसर्गाच्या
विरूद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे
लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण
आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा
वेळही. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण
भारताचे स्थान निर्माण करू शकतो. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे
लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण
करू शकू. अशोक, पिंपळ, शेंगा यांसारखी झाडे सर्वत्र
लावण्याची प्रामुख्याने गरज आहे.
सांगली जिल्ह्याची भौगोलिक
रचना आणि पश्चिमेकडील भागाला लाभलेली निसर्गसंपदा यामुळे जिल्ह्याची आगळी वेगळी
ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेले चांदोली अभयारण्य आणि
येथील घनदाट वृक्षवल्ली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. त्यातच भर म्हणजे राज्य
शासनाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात वृक्षारोपण आणि
वृक्षसंवर्धनासाठी दिलेली गती महत्त्वाची आहे. जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड
योजनेंतर्गत आतापर्यंत सव्वाशे कोटीहून अधिक झाडे लावण्यात आली असून यंदाच्या
पावसाळ्यात किमान 24 लाख झाडे लावण्याचा संकल्प
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांनी केला
आहे. तर मग चला करुया वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन.दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत:
नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू
लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय
म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची
भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज मानून जिल्ह्यात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनास
सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लागावीत
यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि
पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील भौगोलिक
परिस्थिती पाहता आतापर्यंत पूर्व भागात वृक्षारोपणामध्ये अडचणी निर्माण होत होत्या, पण सुदैवाने गेल्या काही
दिवसात जिल्ह्यात राबविलेला जलसंधारणाचा प्रभावी कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान आणि
जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागात साठविण्यात येत असलेले पाणी
यामुळे यंदा संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपणाला निश्चितपणे गती लाभेल. पावसाअभावी
पूर्व भागात वृक्षारोपणाच्या मोहिमेला मर्यादा आल्या मात्र पश्चिम भागात झाडांची
लागवड मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्यामुळे बऱ्यापैकी वृक्षारोपणाचे काम होऊ शकले.
यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात हाती
घेण्याचे नियोजन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले असून सर्व प्रशासकीय
यंत्रणांना अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा
जिल्ह्यात विविध नर्सरीमधून तयार करण्यात आलेली 24 लाख रोपे जिल्ह्यात
लावण्याबरोबरच आणखीन रोपे तयार करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये शैक्षणिक, सहकारी, सेवाभावी संस्थांबरोबरच
शासकीय कार्यालये आणि नागरिकांनीही सक्रिय योगदान देणे काळाची गरज आहे. जिल्ह्यात शतकोटी वृक्ष
लागवड मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 1 कोटी 26 लाख 37 हजार रोपे लावण्यात आली असून यंदाच्या
पावसाळ्यात 24 लाख रोपे लावण्याचे नियोजन
करण्यात आले आहे. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना वृक्षारोपन आणि
वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय केले आहे. जिल्ह्यास यंदाच्या पावसाळ्यात
अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासकीय विभागाबरोबरच जनतेनेही या कामी सक्रिय
योगदान देणे गरजेचे असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या शेतात आणि
परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यात पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर
गायकवाड यांनी केलेआहे. वृक्षारोपणाच्या या मोहिमेत
वन तसेच सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच कृषी विभाग,प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच
महसूल, पोलीस, जिल्हापरिषद, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, उद्योग विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा विभाग, सहकार विभाग, सर्व साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विकास सोसायट्या, बाजार समित्या,वृक्षप्रेमीसंस्था तसेच विविध औद्योगिक संस्था
या सर्वांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांच्याच सहकार्याने वृक्षारोपणाची
चळवळ यशस्वी करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास
महामंडळ विभागाच्या जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प, त्याअंतर्गत कालवे तसेच
पुनर्वसीत गावठाणामध्ये आणि कार्यालय परिसरामध्ये झाडे लावण्याची विशेष मोहीम
राबविली जाणार आहे. तसेच शेततळी, कंपार्टमेंट बंडीग, फलोत्पादन उपक्रमाबरोबरच
जिल्ह्यातील अन्य सर्वच शासकीय यंत्रणांनी आपापल्या कार्यालय परिसरात तसेच
कार्यक्षेत्रातील उपक्रमांमध्ये अधिकाधिक झाडे लावण्याचे नियोजन करुन कार्यवाही
सुरु केली आहे. वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत
जिल्ह्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि मुख्य
कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी केला
आहे. जिल्ह्यात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे काम अधिक गतीने आणि
लोकसहभागातून व्हावे यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात सुरु असलेली
वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करुन संपूर्ण जिल्हा नजिकच्या काळात वृक्षाछादित
बनविण्यात संपूर्ण जिल्हावासियांनी वृक्षारोपणाच्या या चळवळीत सक्रिय व्हावे.
विषय –
सदर विषय हा पाठ्य पुस्तकातील
अभ्यासक्रमावर आधारित असून ” वृक्षा रोपण काळाची गरज “ हा विषय माझ्या आवडीचा असलुयामुळे मी या विषयाची
निवड माझ्या सेमिनार करीता केलेली आहे कारण या माध्यमातून
मझ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यानावृक्षाची गरज
त्यापासून मिळणारा फायदा या विषयी माहिती मिळेल.त्याच
प्रमाणे परिसर कसा स्वच्छ ठेवावा याची जाणीव या माध्यमातून व्हावी .म्हणून मी सदर
विषयाची निवड केलेली आहे..
सदर सेमिनारच्या माध्यमातून आम्ही ६ मुलांचा
ग्रुप
बनविला व त्या ग्रुपला २ भागामध्ये वर्गीकृत केले वृक्ष लागवड या विषयी ठोस असा
कार्यक्रम आखला व पर्यावरणाच्या दृष्टीने काय करता येईल या विषयी आमच्या
शिक्षकांची भेट घेतली त्यात त्यांनी केलेल्या मार्गदर्शन नुसार आम्ही मानवी
कल्याणासाठी व पुढील पिढी करीता सर्वात महत्वाचे निर्णयाचा ठराव केला तो सर्वाना
आवडला ठराव असा आहे कि - ५ जून हा आंतर्राष्ट्रीय पर्यावरण दिवस म्हणून
साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून निसर्गा विषयी आपली
जबाबदारी समजून वृक्षा रोपण करण्याचे ठरावात मंजूर करण्यात आले या विषयी जन जागृती सोबत केलेले कार्य म्हणजेच
लोकांमध्ये जाऊन वृक्षा रोपणा विषयी जागृती करणे गावात येणारे अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला
करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल
वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते.त्या प्रमाणे आम्ही कार्य केले. आम्ही सदर वृक्षा रोपण करीता लागणारे
साहित्य – कुदळ,फावडे ,अनेक निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष ,खड्या चे माप घेण्या करीता
टेप ,दोरी ,झाडाला कुपन ,असे अनेक प्रकारचे लागवडी
करीता लागणारे साहित्य सोबत घेतले .
आज आपण हा परिसर बघायला कधीही
गेलो तर आपण केलेले वृक्षा रोपण व त्यामुळे झालेले येथील हिरवेगार वातावरण
आपल्याला आनंद देऊन जाईल यात शंका नाही
सेमिनारचे फलित –
वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्या
बरोबरच त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे रोपटे येते याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी पाणी कमी आहे तेथे कडूलिंब, चिंच, बाभूळ यासारख्या झाडांची लागवड केल्यास त्यांचे
संवर्धन होऊ शकते. पाणथळ भागात योग्य त्या रोपटय़ांची निवड करून त्यांची लागवड
केल्यास या वृक्षांचे संवर्धन होऊ शकते. मात्र, नियोजनबद्धतेच्या अभावी कोठेही आणि कोणत्याही
प्रजातीची रोपटी लावली तर ती बाद करण्यातच अधिकतर प्रशासन धन्यता मानत असते.
यामुळे अनेक ठिकाणी रोपटय़ांच्या संवर्धनातही दुर्लक्ष होते.
रोप लागवडीवेळी सर्वसाधारणपणे दीड फूट खड्डा खणून त्यामधील
दगड काढून शेणखत किंवा कंपोष्ट खत, कुजलेला पालापाचोळा, माती घेऊन रोप लागवड करावी. या बरोबरच
वाळवीपासून बचाव होण्यासाठी वाळवी प्रतिबंधक औषधांची मिसळण करावी. चार ते पाच फूट
उंच असलेल्या रोपांची निवड केल्यास आणि तीही जून महिन्यात त्याची लागवड केल्यास ते
यशस्वी ठरू शकते. मात्र, याकडे शासानाने पाठ फिरविल्याचेच दिसून येते.
उद्दिष्ट्ये :
राज्यात
आवर्षण, तापमान वाढ, क्लायमेट
चेंज, पाणी टंचाई, दुष्काळ
सासारखे संकट वाढत आहे किंबहूना वाढले आहे. याकडे त्वरीत गांभीर्याने न पाहिल्यास
येत्या काही वर्षात महाराष्ट्रात वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. वृक्ष आणि
वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे’ या
अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या
संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके
रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न
प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या वन विभागाने सकारात्मक पावले
टाकण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षापूर्वी
महाराष्ट्रातील डोंगरपट्यावर वृक्षलागवडी झाल्या असत्या आणि त्याच्या संवर्धन, संरक्षणाची
जबाबदारी आपल्या राज्यकत्र्यांनी घेण्याचे प्रयत्न केले असते तर आजची दुष्काळाची
परिस्थिती उद्भवली नसती. परंतू विकास आणि समृध्दतेची दृष्टी नसलेल्यामुळे आहे त्या
वनक्षेत्राचा भाग कमी होवू लागला आहे. वाढते औद्योगीक क्षेत्र आणि त्याच्या
अतिक्रमणामुळे आजून किती वृक्षतोड होवून वनक्षेत्राला आपल्याला मुकावे लागेल हे
सांगता येणार नाही. वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली
देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच
धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास
प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
गृहीतीके -
जंगलाची
उपयुक्तता :
झाडे हवेतील कार्बनडाय
ऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू हवेत सोडतात. अनेक झाडे ओझोनचेही प्रमाण
वाढवण्यास मदत करतात. दुर्मिळ प्राणी, वनौषधी यांचे जतन जंगलामुळेच होत असते. घनदाट
जंगलामुळे हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो. पावसाची
तीव्रता जंगल भागात अधिक असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन्
भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते. खोलवर रुजलेल्या मुळांच्या साहाय्याने
जमिनीची धूप थांबवली जाते अन् जमिनीची सुपिकता कायम रहाते.
वृक्षाचे
कार्य :
प्राणवायू (ऑक्सिजन)
उत्पादन हवेचे प्रदूषण थांबवणे भूमीची फलद्रूपता टिकवणे आणि भूमीची धूप
थांबवणे भूगर्भ पाण्याची पातळी
उंचावणे आणि हवेत आर्द्रता टिकवणे पशूपक्षी यांचे आश्रयस्थान, प्रथिनांत (प्रोटीनमध्ये) रूपांतर करणे.
एक वृक्ष तोडल्याने १७ लाख
रुपयांचा तोटा होतो. महापालिका मात्र वृक्ष तोडणार्यास १०० ते १००० रुपये दंड
आकारते. वृक्षारोपण केलेली ७०-८० टक्के झाडे मरतात.
निरीक्षण –
५ जून हा आंतर्राष्ट्रीय
पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. दुसर्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य
देशांमध्ये झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण आणि वेगाने झालेले शहरीकरण याचा परिणाम
म्हणून तिथली प्रदूषणाची समस्या गंभीर होत गेली. चंगळवाद, भौतिक सुखलोलुपता व त्यासाठी
लागणारी आधुनिक उपकरणे यांमुळे उर्जेची गरज वाढत गेली. त्यातूनच कार्बनडाय
ऑक्साईडचे उत्सर्जन वाढले. पृथ्वी भोवतालचा संरक्षक ओझोन थर विरळ होऊ लागला.
आंतर्राष्ट्रीय समुदायाला याची जाणीव झाल्यामुळे पर्यावरणविषयक चर्चांना गती
मिळाली. त्याचाच एक भाग म्हणून आपण हा दिवस साजरा करतो.पर्यावरणशास्त्राचा आवाका
फार मोठा आहे. अनेक खगोलीय, भौतिकीय व रासायनिक घटना, हवामानातील बदल, नैसर्गिक उलथापालथी
पर्यावरणावर परिणाम करत असतात. त्यासाठी सतत जागृत रहावे लागते. ऋग्वैदिक
काळातसुद्धा पर्यावरणसंबंधी चेतना विद्यमान होती असे अनेक मंत्रांमधून दिसून येते.
निसर्गाचे सारे वरदान लाभलेला मनुष्य हा सृष्टीचा सर्वोत्तम प्राणी आहे आणि
म्हणूनच त्याची जबाबदारीही मोठी आहे. धरती-आकाश आपले माता-पिता आहेत, कारण ते आपले संगोपन व
संरक्षण करतात. आपणसुद्धा सुपुत्र-सुपुत्री बनून त्यांचे संरक्षण करायला हवे. आज आपण
भूमातेशी असलेला आपला भावनात्मक व संवेदनात्मक संबंध विसरत चाललो आहोत. तिचा
सातत्याने जेवढा उपभोग घेता येईल तेवढा घेत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने विकास घडवता घडवता भूमातेला आपण भकास करत आहोत. ओरबाडून घायाळ करत आहोत.
म्हणूनच निसर्गचक्राचे संतुलन बिघडले असेल का ?
संशोधन पद्धती –
आज
पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळासारखी संकटे उभी राहात असल्याचे चित्र दिसत
आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांचे संगोपनही
तितकेच महत्वाचे आहे. हातनूरमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून हे शक्य झाले आहे.
हातनूरने राज्यात स्वत:चा असा एक पॅटर्न तयार केला आहे. ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम यासह दोन वेळा
वनश्री पुरस्कारही मिळविला आहे. मात्र, कोणतेही
अभियान केवळ पुरस्कारापुरते न राबविता त्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न या
गावाने केला आहे.सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका भीषण दुष्काळात होरपळत असतो.
गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु असतात. वाड्या-वस्त्यांवर लोक पाणी पाणी
करत असताना याच तालुक्यातील हातनूर (ता. तासगाव) गावाने दुष्काळा विरुध्दची लढाई
नेटाने लढली आहे. गावातील सांडपाणी गोळा करुन त्यावर तब्बल 12 ते 15 हजार झाडे जगविण्याचा प्रयत्न
केला आहे.गेल्या तीन चार वर्षात हातनूर येथे अत्यंत नियोजनबध्द रीतीने 30 हजारांवर झाडे लावली आहेत.
गावात आणि परिसरातील होनाई देवीच्या मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण
करण्यात आले आहे. मात्र, सलग दोन
वर्षे हातनूर आणि परिसर दुष्काळाला तोंड देत असल्याने जेथे माणसाला पाणी प्यायला
मिळत नाही, तेथे झाडे
कशी जगवायची? असा प्रश्न
निर्माण झाला. माणसांच्या पाण्याच्या प्रश्न सुटला आणि माणसाने झाडांच्या
पाण्याचाही प्रश्न सोडविला. गेली दोन वर्षे उन्हाळ्यामध्ये हातनूर ग्रामपंचायत
छोट्या टँकरने प्रत्येक झाडाला पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करते आहे. हा
प्रयत्न कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र हातनूरमध्ये पाहावयास मिळत
आहे.ग्रामपंचायतीने सांडपाण्याचा पुनर्वापर करुन झाडे जगविण्याचा प्रयोग केला आहे.
गावातील दोन मोठ्या गटारातील पाणी एका ठिकाणी एकत्र केले जाते, त्यातून त्या पाण्याचे तीन
वेगवेगळ्या टाक्यांमध्ये शुध्दीकरण करुन दहा हजार लिटरच्या एका टाकीत एकत्र केले
जाते. तेथून मोटारीने पाणी उपसून छोट्या टेंपोतील पाच हजार लिटरच्या टाकीमध्ये हे
पाणी टाकून ते पाणी पाईपव्दारे आवश्यक त्या झाडांना दिले जाते. दिवसभरात 15 ते 20 हजार लिटर पाणी झाडांना घातले
जाते. छोट्या टेंपोचा देखभाल आणि डिझेल खर्च ग्रामपंचायतीच्या खर्चातून केला जातो.
काही ठिकाणी हेच पाणी उंचावर एका टाकीतून ठिबकव्दारे झाडांना दिले जाते. गावापासून
जवळच असलेल्या होनाईच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे.
उंचावर नेवून एका टाकीतून पाईपलाइनव्दारे तेथील झाडांना पाणी दिले जात आहे.गेल्या
तीन वर्षात गावात रस्त्याकडेला, होनाई देवी
मंदिर परिसर, गावातील
रस्त्यांकडेला, दलितवस्तीमध्ये
अशी तब्बल 30 हजार झाडे लावण्यात आली आहेत.
या सर्व झाडांचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवण्यात आले आहे. परिणामी आज बहरलेली झाडे
पाहून मन मोहरुन जाते.
विश्लेषण –
वृक्षारोपण
करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर
पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै
सेंट्रल ऑफ स्कूलचे प्रमुख फ्रान्सिको फर्नाडिस यांनी नुकतेच वनमहोत्सव
कार्यक्रमात केले.
गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने
त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला
दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात
नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जोपासना
करण्याचा संदेश बॅ. नाथ पै स्कूलच्या सी. बी. एस.च्या मुलांनी वृक्षारोपण करून
केला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने घराकडून एक रोपटे आणून संस्थेच्या
प्रांगणात वनमहोत्सवांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.
झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये
घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. या वेळी
फर्नाडिस म्हणाले की, वृक्ष आपले सखेसोबती आहेत.
आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन
वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक
समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज
बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
निष्कर्ष –
शासनाचा महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम
राबवण्यात येत असून काही गावांनी या कार्यक्रमातून गावातील इ-क्लास जमिनीवर वृक्ष
लागवड करून पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे. मुक्ताइनगर तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदूर
रेल्वे तालुक्यातील आमला गावानेही हाच आदर्श ठेवत इ-क्लास जमिनीवर शतकोटी वृक्ष
लागवड करून यशस्वीपणे वृक्ष जिवंत ठेवून गावाला पर्यावरण समृद्धीचे नंदनवन केले
आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आमला विश्वेश्वर गावाने
शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत इ-क्लास जमिनीवर 5 हेक्टर
क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड केली असून सन 2011-12,
2013-14 या वर्षात एकूण 6 हजार 600 वृक्षांची
लागवड करण्यात आली आहे. हाच वसा प्रत्येक जिल्ह्याने राबविला तर प्रत्येक जिल्हाच
काय पण प्रत्येक गावही सुंदर वनराईने नटल्याशिवाय राहणार नाही.त्याबरोबरच समाजात
वृक्षाविषयी, वनाविषयी, जंगलाविषयी
आस्था निर्माण करणे व त्यांनी एक वृक्ष तोडला त्याऐवजी दोन वृक्ष लावले तर याचा
निश्चितच सर्वांना उपयोग होईल. हे कार्य केवळ कागदावरच ठेवून चालणार नाही तर
यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासूनच सुरुवात केली तर ही कल्पना सफल होईल यात
शंकाच नाही. यासाठी आपल्या घरातील सदस्यांना, वृक्षाचे
महत्व पटवून देऊन त्यांना प्रोत्साहित करणेही गरजेचे आहे. नुसते
वृक्ष लावून न थांबता त्याचे संवर्धनही तितक्याच काळजीने केले पाहिजे, ही तर
काळाची गरज आहे. हे पाऊल आपण आताच उचलले तरच पुढील भविष्य उज्ज्वल आहे. झाडेच नसली
तर हवा कुठून येणार आणि हवा नसेल तर माणूस गुदमरुन मरणार हे भाकित आजची दुष्काळी
परिस्थिती आपणास दाखवित आहे. याबरोबरच शासनस्तरावरही विशेषरित्या जनजागृती होणे ही
काळाची गरज आहे. यावर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाच्या भीषण परिस्थितीचे चटके आपण
भोगत आहोत. पाण्यासाठी वन वन भटकणारे स्त्री -पुरुष, चाऱ्यासाठी
जनावरांची केविलवाणी झालेली स्थिती पाहून काळजात चर्र होते. ही भीषणता टाळायची
असेल तर वृक्ष संवर्धनाबरोबरच प्लास्टिकसारख्या भयानक राक्षसाचाही नायनाट करायचा
आहे.