नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा ,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी ,
घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं ,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहण्यात मजाआहे .
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही ,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे ,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे ,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं ,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो ,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान ,
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता.
प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतो.पण प्रेम मिळत नाही म्हणुन प्रेमांच्या जगात जगा
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर ,
दोन असणाऱ्याला वाटतं , एक वाला मजेत,
मुलगी असली की , वाटतं
मुलगा हवा होता ,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते .
ज्याला मूल नसतं , तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात ,
कौतुक करणारे *रावणाचीही स्तुती करतात .
मिळून काय *?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही .
मी बरोबर आहे , पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे , तरी मजेत आहे .
किती गोंधळ रे देवा हा?
म्हणुन जे आहे ते स्विकार करा आणि आयुष्य आनंदात जगा आयुष्य खुप सुदंर आहे फक्त आपल्याला जगता आले पाहिजे...
म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान...!!